दिवाळीत मिळणाऱ्या बोनस, गिफ्ट्सवर सुद्धा टॅक्स भरावा लागतो?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भारतातील महासण म्हणजे दिवाळी. देशात बहुतेक राज्यात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा होतो. बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. भारताबाहेरही हा सण मुख्य भारतीय सण म्हणून ओळखला जातो.
याच कारणास्तव बहुतांश कंपन्या या सणाच्या निमित्तानं कर्मचार्यांना दिवाळी बोनस देत असते. मात्र हा बोनस खराच बोनस असतो का? जास्तीची रक्कम मिळाल्याचा आनंद इतका असतो कि या रकएवरही प्राप्तीकर भरावा लागतो हे अनेकजणांच्या गाविही नसतं..
दिवाळी म्हणजे नविन कपडे, गोडधोड फराळाचा, फटाक्यांचा, आनंदाचा सण आणि अर्थातच कंपनीकडून कर्मचार्यांना बोनस मिळण्याचा सण. मात्र कंपनीकडून पाच हजाराम्हून जास्त रकमेचे गिफ़्ट मिळाले तर ते गिफ्ट व्हाऊचर करचार्याच्या वेतनाचा भाग समजलं जातं आणि त्यावरही प्राप्तीकर स्लॅबनुसार तो आकारण्याची तरतूद आहे.
दिवाळीत कंपनीकडून मिळणारा बोनस हा बोनस आहे की नाही हे तो कोणत्या स्वरूपात मिळतो यावर अवलंबून आहे. अनेक कंपन्या रोख रक्कम, गिफ्ट स्वरूपात बोनस देत असते. मात्र कंपनीकडू पाच हजारांहून जास्त रकमेचं गिफ्ट व्हाऊचर मिळालं तर तो कर्मचार्याच्या वेतनाचा भाग होतो आणि त्यावरही त्याला प्राप्तिकर भरावा लागतो. तसेच कंपनीकडून कर्मचार्याच्या अकाऊंटमधे थेट जमा होणारी प्रत्येक रक्कम कर लागू असणारी असते.
यासाठी कर्मचार्यानं विवरण पत्रात ही रोख रक्कम दाखवायला लागते. अर्थात याबाबत काही नियमही आहेत आणि ते बरेचसे क्लिष्ट आहेत. दिवाळी बोनस देताना या गोष्टींचा विचार करावा लागतो अन्यथा कर्मचार्यांसाठी बोनस हा खर्या अर्थानं बोनस उरत नाही.
समजा तुमच्या कंपनीन तुम्हाला ४ हजार रुपये बोनस देण्याचं ठरविलं तर भारतीय प्राप्तीकर नियमानुसार नियोक्त्याकडून मिळणारी कोणतीही रक्कम ही वेतन समजत असल्यानं जरी ५ हजारांच्या स्लॅबमधे ही रक्कम येत नसली तरीही ती करपात्र ठरते. त्यामुळे या बोनसवर कर भरावा लागणार आहे.
–
- इन्कम टॅक्स, जीएसटी तसाच युट्युब टॅक्स…! हो आता युट्युबर भरणार एक नवा कर!
- आधी टॅक्स भरा आणि मग अत्यंस्कार करा, असा अजब नियम असलेल्या गावाची कथा ऐकून चक्रावून
–
तेच कंपनीन ही रक्कम सॅलरी हेडमधे भेट म्हणून दाखविली तर मात्र यावर कर भरावा लागणार नाही ,तसेच त्यातून टीडीएसही कापला जाणार नाही. मात्र जर ही रक्कम ५ हजार १ रुपये असेल तर मात्र ५ हजारावरच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे. तो करपात्र असेल.
कंपनीकडून बोनस जसा करपात्र असू शकतो तशाच दिवाळीनिमित्त नातेवाईक, आप्तेषांकडून मिळणार्या भेटवस्तूंवरही कर भरावा लागतो. ५० हजारांहून जास्त रकमेच्या भेटवस्तू या करपात्र स्लॅबमधे येतात.
आयकर कायद्याच्या कलम ५६ (२) नुसार मित्र आणि कुटुंबियांकडून मिळालेल्या सणावारी मिळालेल्या भेटवस्तू, वर्षभरात मिळालेल्या भेटवस्तू यांचे एकूण मूल्य रोख किंवा वस्तू स्वरूपात ५० हजारांपेक्षा जास्त असल्यास त्यावर कर भरावा लागतो. ५० हजारापर्यंत ही रक्कम करमुक्त आहे मात्र या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास संपूर्ण रक्कम करपात्र समजली जाते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.