Site icon InMarathi

चूक तरी किती व्हावी, बातम्यांच्या लाईव्ह बुलेटिनमध्येच टीव्हीवर सुरू झालं पॉर्न…

porn on live tv inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

मागच्या काही वर्षांमध्ये २४ तास सुरु असणाऱ्या न्यूज चॅनल्सची संख्या  वाढत गेली आणि पर्यायाने स्पर्धाही मोठ्या प्रमाणावर वाढली. सगळ्यात आधी ही बातमी आपल्या चॅनलवर झळकली पाहिजे या नादात मग अशा लाईव्ह चॅनल्सकडून होणाऱ्या चुकाही वाढू लागल्या.

कुठे ब्रेकिंग न्यूजच्या झळकणाऱ्या पट्टयांवर होणाऱ्या व्याकरणाच्या चुका, कुठे चुकीची लिहिली जाणारी नावं, कुठे बातमी देण्याची घाई करताना भलत्याच बातमीला भलताच फोटो, अशा गोष्टी अनेकदा झालेल्या पाहायला मिळतात.

 

 

मध्यंतरी एकदा तर, भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव झालेला असताना एका चॅनलवर चक्क भारताचा दणदणीत विजय अशी बातमी झळकली होती.

एकूण काय, तर बातम्यांची सुद्धा स्पर्धा फार मोठी आणि घातक होऊ लागली आणि सगळी गणितं बदलून गेली. कामाच्या अति तणावामुळे होणाऱ्या चुका हा तर एक भाग झाला. पण अमेरिकेतील एका न्यूज चॅनलवर चक्क पॉर्न सुरु झालं. तेदेखील हवामानाचा अंदाज देणाऱ्या बातम्या प्रसारित होत असताना. हवामानाचा अंदाज बांधताना वातावरणच दूषित झालं म्हणा ना!

न्यूज चॅनलवर नेमकं असं काय घडलं आणि पॉर्न कसं सुरु झालं, हा गमतीशीर प्रसंग कसा उद्भवला, जाणून घेऊयात.

ही घटना घडली अमेरिकेतील एका लोकल न्यूज चॅनलवर. वॉशिंग्टनमधील या न्यूज चॅनलवर रविवारी संध्याकाळच्या बातम्या सुरु होत्या, आणि निवेदिकेच्या मागे असणाऱ्या स्क्रीनवर अश्लील दृश्य दिसण्यास सुरुवात झाली. महिलेचे गुप्तांग मागच्या स्क्रीनवर झळकलं आणि प्रेक्षक गोंधळून गेले.

 

वातावरणात तापमान अधिक असणार आहे, याविषयी निवेदिका सांगत असतानाच मागच्या बाजूला असलेल्या स्क्रीनवर ते अश्लील दृश्य दिसू लागलं आणि प्रेक्षकांचा पारा चढला. अवघ्या १३ सेकंदांसाठी दिसलेली ही पॉर्न क्लिप चॅनलवाल्यांना मात्र फारच महागात पडली.

जनरल मॅनेजर जेफ्री मार्क्स यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचं नंतर बोललं गेलं. ही क्लिप ३ सेकंदांहून कमी वेळासाठी दिसली आणि बऱ्यचशा टीव्ही सेट्सवर ती स्पष्टपणे दिसली नाही, असं सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.

टीव्हीची स्क्रीन लहान असेल, तर लोकांना ती क्लिप स्पष्टपणे दिसली नसेल असं म्हणणंच मुळात चूक आहे, नाही का… कारण जे घडलं ते मात्र मान्य करावं असं नव्हतंच, यात काहीच शंका नाही.

 

 

अमेरिकेतील नॅशनल असोसिएशन ऑफ ब्रॉडकास्टर्स यांनी चॅनलला मोठा दंड सुद्धा ठोठावला. चॅनलकडून ही चूक नेमकी झालीच कशी, याविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चाही रंगल्या. ज्या घरांमध्ये लहान मुलं आहेत, त्या घरांनी हे चॅनल पाहण्याचा धसकाच घेतला असावा असं म्हणायला हवं.

ही अशी चूक पुन्हा होणार नाही, याची खात्री देत न्यूज चॅनलने माफी तर मागितली, मात्र ‘बंद सें गई वह हौद सें नहीं आती’ याचा अनुभव ही मंडळी नक्कीच घेणार…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version