Site icon InMarathi

स्वतःचाच आवाज तुम्हालाही विचित्र वाटतो का? सगळ्यांचाच बाबतीत हे घडतं, कारण…

recorded voice inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कुठल्याही व्यक्तीचा चेहरा, ही त्या व्यक्तीची ओळख असते. पण याच बरोबरीने आणखी एक गोष्ट त्या व्यक्तीची ओळख ठरू शकते, आणि ती म्हणजे त्या व्यक्तीचा आवाज! एखादा आवाज कानावर पडला, की नेमकं कोण आलंय हे आपण बरोब्बर ओळखू शकतो. कारण हा आवाज याच व्यक्तीचा आहे, हे आपल्या मेंदूला ठाऊक झालेलं असतं.

 

 

आपलाच आवाज ऐकताना मात्र आपल्याला काहीसं विचित्र आणि वेगळ वाटू लागतं. विशेषतः ज्यावेळी आपण रेकॉर्डेड स्वरूपात आपला आवाज ऐकत असतो, त्यावेळी असा अनुभव आपल्याला येतो. हे असं नेमकं का होतं असावं याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? यामागे विज्ञान असू शकतं असं तुम्हाला वाटतं का?

हा प्रश्न जर कधी तुम्हाला पडला असेल, तर मग आज त्याचं योग्य उत्तर तुम्हाला नक्की मिळेल… चला तर मग जाणून घेऊयात, आपलाच आवाज, आपल्यालाच वेगळा आणि विचित्र वाटण्यामागचं शास्त्रीय कारण…

 

 

आवाज कसा ओळखला जातो?

एखादी व्यक्ती ज्यावेळी बोलते त्यावेळी स्वरयंत्रात कंपनं निर्माण होत असतात. या कंपनांमुळे ध्वनी लहरी तयार होतात. मुखवटे बाहेर पडलेल्या य ध्वनी लहरी, हवेच्यामार्फत प्रवास करतात आणि आपल्या कानांपर्यंत पोचतात.

 

 

कानावर पडलेल्या या ध्वनीलहरी कानाच्या आतील भागात पडद्यापर्यंत जातात. पडद्यावर पडलेल्या ध्वनी लहरी म्हणजेच आपल्याला ऐकू येणारा आवाज! याच ध्वनी लहरी मेंदूत नोंदवल्या जातात आणि तीच मेंदूसाठी आवाजाची ओळख बनते.

स्वतःचाच आवाज ऐकताना काय होतं?

आपण ज्यावेळी बोलत असतो, त्यावेळी आपल्या स्वरयंत्रातून घशावाटे कंपने निर्माण होत असतात. याच ध्वनी लहरी हवेमार्फत कानावाटे सुद्धा ऐकू येत असतात. थोडक्यात काय, तर मेंदूकडे एकाचवेळी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनी लहरी पोचतात. मेंदूसाठी ही माहिती एकाचवेळी आलेली असते.

म्हणजेच आपल्या मेंदूमध्ये आपल्या आवाजाची नोंद दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनीलहरींच्या मिश्रणातून केली जाते.

सोप्या शब्दात सांगायचं झालं, तर मेंदूसाठी आपल्याच आवाजाची नोंद वेगळ्या प्रकारे केली जाते. तोच आवाज ऐकू येताना मात्र तशाच पद्धतीने ऐकू येण्याची कुठलीही शक्यता नसते.

 

 

रेकॉर्डेड आवाज ऐकताना काय घडतं?

ज्यावेळी आपण आपलाच रेकॉर्डेड आवाज ऐकत असतो, त्यावेळी आपल्यापर्यंत पोचत असलेल्या ध्वनी लहरी या केवळ हवेतून आलेल्या असतात. घशातून निर्माण होणारी कंपने, त्या ध्वनी लहरींमध्ये मिसळणार नसतात. कारण, त्यावेळी आपण तीच गोष्ट, त्याच पद्धतीने बोलत नाही.

कानावाटे मेंदूपर्यंत पोचणाऱ्या सूचना या एकाच ध्वनीलहरींच्या माध्यमातून गेलेल्या असतात. त्यानुसार मेंदूसाठी या आवाजाची एक नवी ओळख तयार होते.

आपण बोलत असताना ऐकलेला आवाज, हा वेगळ्या पद्धतीने नोंदवला जातो आणि तोच आवाज ऐकताना मात्र वेगळ्या पद्धतीने ऐकू येतो. आवाज तोच असला तरी त्याच आवाजाची मेंदूमध्ये असणारी ओळख ही वेगळ्या पद्धतीने झालेली असते.

 

 

तोच आवाज वेगळा असल्याचं आपल्या मेंदूला वाटतं. कारण त्याच्यासाठी आवाजाची ओळख वेगळी असते.

मेंदूने आपल्याला दिलेल्या सूचना आपण मान्य करतो आणि आवाजाची एक नवी ओळख निर्माण होते. तोच आवाज आपल्याला वेगळा वाटतो, कारण आपल्याच आवाजाची ‘खरी’ ओळख आपल्याला माहितच नसते.

मग काय मंडळी, या कोड्याचं उत्तर मिळालं ना तुम्हाला? हेच उत्तर इतरांना सुद्धा मिळालं तर तुम्हालाही छान वाटेल नाही का… चला मग पटापट शेअर करा. ही माहिती वाचून तुम्हाला काय वाटलं तेही कमेंट्समधून सांगा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version