हेमामालिनी ते कंगना.. या ६ अभिनेत्रींनी ‘का’ दिला किंग खानसोबत काम करण्यास नकार?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हटलं की रोमान्सचा बादशाह शाहरुख खान डोळ्यांसमोर येतो. शाहरुखसोबत काम करायला कोणाला नाही आवडणार? शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा प्रत्येक नवोदित कलाकाराची असते.
शाहरुखसोबत एका चित्रपटात छोटी भूमिका मिळाली, तरीही अनेक नवोदित अभिनेत्रींना आकाश ठेंगणं वाटेल. आता तुम्ही म्हणाल, की शाहरुखसोबत काम करायला कोण नकार देईल, पण आजवर अनेक अभिनेत्रींनी शाहरुखसोबत काम करायला नकार दिलाय.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
- चंकीने शाहरुखला बॉलीवूडमध्ये आणून स्टार बनवले; तो स्वतः मात्र मागेच पडला…
- जेव्हा शाहरुखने अबू सालेमला ठणकावले, “मी कोणत्या फिल्म्स करायच्या हे शिकवू नकोस”
—
अगदी हेमामालिनीपासून सोनम कपूरपर्यंत बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटातील अभिनेत्रींनी शाहरुखसोबत काम करायला नकार दिला होता, काय होती यामागची कारणं?
१. हेमामालिनी
बॉलिवूडच्या या ड्रीम गर्लने शाहरुखसोबत काम करायला नकार दिला होता. शाहरुखचा अभिनय म्हणजे ‘ओव्हर ऍक्टिंग’ आहे असं हेमामालिनी यांचं मत आहे. असं असलं तरीही शाहरुखचा पहिला चित्रपट ‘दिल आशना है’ याचं दिग्दर्शन आणि प्रॉडक्शन हेमामालिनी यांचं होतं.
तसं बघायला गेलं, तर हेमामालिनी यांनीच शाहरुखला लाँच केलं, पण हा चित्रपट प्रदर्शितच झाला नाही आणि ‘दिवाना’ चित्रपटातून शाहरुख रुपेरी पडद्यावर झळकला.
२. करिश्मा कपूर
‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील टिनाच्या भूमिकेसाठी राणी मुखर्जीच्या आधी करिश्माला विचारण्यात आलं होतं. ‘अशोका’ या चित्रपटातील भूमिकाही करिश्माला ऑफर करण्यात आली होती, पण तिने या दोन्ही चित्रपटांनाही नकार दिला.
३. कंगना राणावत
आमीर असो, सलमान किंवा शाहरुख.. कंगनाने आतापर्यंत बॉलिवूडच्या ‘खान’ मंडळींसोबत काम केलेलं नाही.
एका मुलाखतीत तिने असं म्हटलं आहे की, ‘खान मंडळींसोबत काम करून मला काही वेगळा फायदा होणार आहे का?’ याच कारणामुळे कदाचित तिने शाहरुखसोबत काम करायला नकार दिला असावा.
४. सोनम कपूर
‘माझी आणि शाहरुखची केमिस्ट्री ऑनस्क्रीन फार जुळणार नाही’ असं सोनमला वाटतं आणि म्हणूनच तिने आतापर्यंत शाहरुखसोबत काम केलेलं नाही.
५. श्रीदेवी
बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला ‘डर’ या चित्रपटातील भूमिकेबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळेस तिने काही विशिष्ट कारणांसाठी ही भूमिका करण्यास नकार दिला होता.
६. अमिषा पटेल
सोनमप्रमाणेच ‘माझी आणि शाहरुखची केमिस्ट्री ऑनस्क्रीन फार जुळणार नाही’ असं वाटून अमिषाने शाहरुखसोबत काम करण्यास नकार दिला होता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.