Site icon InMarathi

दोघांत तिसरा? नाना पाटेकरांमुळेच या जोडप्यामध्ये निर्माण झाला होता तणाव (?)

praksh jha nana patekar inamarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मराठी कलाकारांची नावं अदबीने घेतली जातात, त्यापैकीच एक महत्वाचं आणि मोठं नाव म्हणजे नाना पाटेकर. हातावर मोजता येतील इतकेच मराठी कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूड तसेच इतर चित्रपटसृष्टीतसुद्धा आपल्या अभिनयाची लोकांना दखल घ्यायला लावली.

त्यापैकीच एक प्रसिद्ध नाव म्हणजे नाना पाटेकर. नानाच्या अभिनयाची जेवढी चर्चा होते तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त चर्चा त्याच्या फटकळ स्वभावाची आणि त्याच्या कॉंट्रोवर्सीजची होते.

 

 

गेली काही वर्षं नाना सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर आलेला नसला तरी मध्यंतरी Me too चळवळीच्या निमित्ताने तो चांगलाच चर्चेत आला. तनूश्री दत्ता या अभिनेत्रीने बरेच गंभीर आरोप लावले आणि त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं.

आता Me too मुव्हमेंटचं वादळ शांत जरी झालेलं असलं तरी त्या सगळ्या काळात नानाची प्रतिमा मलिन झाली आणि त्याचा फटका नक्कीच नानाच्या करियरला बसला. आज यामुळेच कदाचित नाना कुठेच दिसत नाही, नुकताच तो टाटा स्कायच्या जाहिरातीत दिसला तेवढंच.

आज आम्ही या लेखातून नानाबद्दलची अशीच एक माहीत नसलेली गोष्ट सांगणार आहोत. या घटनेबद्दल कुठेच उघडपणे वाच्यता झालेली नसली तरी मीडिया रिपोर्टस आणि फिल्मी गॉसिपमधून या सगळ्या गोष्टी त्या काळात चांगल्याच चर्चेत होत्या.

ही गोष्ट आहे १९८५ सालची. नाना तेव्हा चांगलाच फॉर्ममध्ये होता. हिंदी इंडस्ट्रीत त्याच्या नावाला चांगलंच वलय निर्माण झालं होतं. याच दरम्यान दीप्ती नवल ही अभिनेत्रीसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर चांगलंच गारुड केलं होतं.

 

 

तिचं सिंपल दिसणं आणि मोहक हास्य यामुळे कित्येकांची ती फेवरेट झाली होती.

कथा, साथ-साथ, अंगूरसारख्या सिनेमातून तिने तिचं अभिनय कौशल्य दाखवलं तसेच Girl Next Door म्हणून ओळखसुद्धा निर्माण करण्यात दीप्ती नवल यांना यश मिळालं. याचदरम्यान प्रकाश झासुद्धा सिनेइंडस्ट्रीत स्ट्रगल करत होते.

१९८५ साली प्रकाश झा आणि दीप्ती नवल विवाहबंधनात अडकले, पण त्यांचं हे लग्न केवळ ३ वर्षंच टिकलं, १९८८ मध्ये त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. तेव्हा काही मीडिया रिपोर्टच्या म्हणण्यानुसार दीप्ती नवल या गरोदर होत्या आणि आठव्या महिन्यातच त्यांनी गर्भपात केल्याने त्यांच्या नात्यात ही दरी निर्माण झाल्याचं प्रकाश झा यांनी स्पष्ट केलं होतं.

 

याचदरम्यान दीप्ती आणि नाना यांची चांगली मैत्री झाली, दोघे एकमेकांसोबत वेळ घालवत असत, नाना यांनीसुद्धा आपल्या पत्नीपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता.

त्यावेळेस यांच्या दोघांमधली जवळीक बघता या दोघांना एक अपत्यसुद्धा झाल्याच्या अफवा तेव्हा पसरल्या होत्या, आणि तेव्हाच दीप्ती यांनी गर्भपात केला आहे अशी चर्चा झाली होती.

नाना आणि दीप्ती या दोघांना पेंटिंगची खूपच आवड असल्याने दोघे एकमेकांच्या चांगल्याच संपर्कात होते. दीप्तीच्या pregnant nun या पेटींग सिरीजने तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, तेव्हा दीप्ती नवल यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की हे पेंटिंग त्यांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेलं आहे.

 

 

लग्नबंधनात असूनसुद्धा दीप्ती नवलच्या पोटात मूल वाढत होतं, आणि ते नानाचं असून त्याने या मुलाला आपलं नाव देण्यास नकार दिला होता आणि म्हणूनच दीप्ती यांना गर्भपात करावा लागला होता अशा चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.

अर्थात यासंदर्भात प्रकाश झा आणि दीप्ती यांनी कधीच उघडपणे भाष्य केलं नाही, आणि नानानेसुद्धा यावर काहीच स्पष्टीकरण दिलं नाही. दीप्ती आणि प्रकाश झा यांनी विभक्त होऊनसुद्धा एका मुलीला दत्तक घेतलं आणि आज ते दोघे तिचा चांगला सांभाळ करतायत.

नाना पाटेकरचं नावसुद्धा नंतर आयेशा झुलका, मनीषा कोयरालाशी जोडलं गेलं ज्यातून पुढे काहीच निष्पन्न झालं नाही. मात्र तनूश्रीच्या एका ज्वलंत विधानामुळे नानाला चांगलीच किंमत मोजावी लागली.

 

 

दीप्ती नवलशी संबंध असो किंवा तनूश्रीसोबत झालेली घटना असो, दोन्हीबाबत कुठेच काही पुरावे उपलब्ध नसले तरी या दोन्ही प्रकरणात नानाचं नाव घेतलं गेलं आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्याचा परिणाम नानाच्या खासगी आणि प्रोफेशनल जीवनावरसुद्धा झाला.

दीप्तीने नंतर जरी दोघांशी संबंध तोडले असले तरी हे तिघेही आज चांगले मित्र आहेत. प्रकाश झा आणि नाना पाटेकर यांनी नंतर अपहरण आणि राजनीतिसारखे उत्कृष्ट सिनेमेसुद्धा केले.

जरी या विषयावर तिघांपैकी कुणीच काही उघडपणे बोललं नसलं तरी त्यांनी या सगळ्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होऊ दिला नाही, हेसुद्धा तितकंच खरं आहे.

 

 

असे प्रसंग बऱ्याच सेलिब्रिटीजच्या आयुष्यात येतात, पण या सगळ्याचं भांडवल न करता त्यातून आपल्याला बाहेर कसं पडता येईल हे या प्रकरणावरुन शिकण्यासारखं आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version