Site icon InMarathi

“जाहिरात मंगळसूत्राची की कामसूत्राची?” बॉलिवूडच्या फॅशन डिझायनरवर टीकेची झोड

sabya final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो? ओम शांती ओम मधला हा डायलॉग प्रचंड हिट ठरला, सुवासिनीचे कुंकू जसे तिच्यासाठी महत्त्वाचे असते तसे आणखी एक दागिना महत्त्वाचा असतो तो म्हणजे मंगळसूत्र!

हिंदू धर्मातील लग्न सोहळ्यात अनेक विधी केले जातात, त्यातलाच एक महत्त्वाचा विधी म्हणजे मंगळसूत्र, विवाहाची अर्थपूर्णता म्हणजे मंगळसूत्र हा दागिना मानला जातो.

आज या मंगळसूत्राचे वेगवेगळे प्रकार आपल्याला ज्वेलरीच्या दुकानात पहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘होणार सून मी या घरची’ मालिकेत जान्हवी या पात्राने घातलेल्या मंगळसूत्राची त्यावेळी बरीच हवा झाली होती.

 

 

सण समारंभ आले की हमखास दागदागिने खरेदी केले जातात, ज्वेलर्स मंडळी सुद्धा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, त्यांच्या भावनेला हात घालणाऱ्या जाहिराती करतात. मात्र आपल्याला जाहिरातीतून नेमके काय दाखवायचे आहे हे, काहीवेळा जाहिरातकर्त्याला कळत नसावे, कारण जाहिरातीतून वेगळाच अर्थ निघतो. अशीच एक जाहिरात सध्या प्रचंड प्रमाणात ट्रोल होत आहे, नेमकी काय आहे ती जाहिरात चला तर मग जाणून घेऊयात..

 

बॉलीवूडचे सिनेमे जितके हिट होत नसतील तितकी सिनेमातील फॅशन हिट ठरली जाते. सिनेमात फॅशन आणणारे फॅशन डिझायनर आपल्या कल्पक बुद्धीने प्रेक्षकांना भारावून टाकतात, मात्र हेच डिझायनर कधी कधी एखाद्याच्या धर्माला, संस्कृतीला धक्का पोहचवू शकतात.

सब्यसाची हा बॉलीवूडमधला एका फॅशन डिझायनर आपल्या नव्या मंगळसुत्राच्या जाहिरातीवरून चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे, आधी त्याने केलेली जाहिरात बघू आणि मग प्रेक्षकांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहू….

 

 

वरील जाहिरात पाहून तुम्हाला नक्की कशाची जाहिरात आहे हे कळले असेलच, मात्र फॅशन डिझायनारच्या मते ही बंगाली मंगळसूत्राची जाहिरात आहे. मंगळसूत्राची असणारी जाहिरात कामसूत्राच्या अँगलने जाताना दिसून येत आहे.

 

 

एक नामांकित संस्थेने तर सब्यसाची यांच्या पेजवर बंदी घाला अशी मागणी केली आहे. भारतीयांची दिशाभूल करण्याचा देखील हे प्रयत्न करत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

 

 

एका यूझरने तर थेट सब्यसाचीला सल्ला दिला आहे की, ‘आपल्या बायकोला मॉडेल म्हणून नको घेऊस ती योग्य नाही’, जाहिरातीतील मॉडेल चक्क सब्याची बायको आहे यावरून देखील अनेकांना आश्चर्य वाटले आहे..

 

 

मंगळसूत्राची जाहिरात आहे की स्तनांची, एक यूझरने संतप्त होऊन सवाल केला आहे.

 

 

अशी जाहिरात पाहुणे या यूजरने तर भडकून पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करतोस का? असा सवाल केला आहे.

 

 

हिंदू चालीरीतींची प्रतारणा करणं बंद कर, ब्राची जाहिरात आणि मंगळसूत्राची जाहिरात यात फरक असतो असं म्हणत ट्रोलर्सनी चांगलेच सुनावले आहे.

 

‘सेक्युलर विचारसरणीची असलेली ही जाहिरात कायम एकाच समुदायाला टार्गेट करते’, तसेच यूझरने मुस्लिम समुदायाला सुद्धा टार्गेट केले आहे. एकाने तर या जाहिरातीला खालच्या दर्जाची जाहिरात असा शेरा दिलाय.

गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडच्या कलाकृतींमधून फक्त एका समुदायाला टार्गेट केले जाते अशी ओरड तर होत असते. भारतीय स्त्रीच्या मांगल्याचं लेणं असलेल्या मंगळसूत्राची अशी विटंबना कलेच्या कोणत्या अभ्यासात बसते हे कदाचित फॅशन डिझायनरलाच ठाऊक असावे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version