' आईचा फिटनेस मुलाच्या तोडीसतोड; जाणून घ्या तिच्या दिसण्याचं, चिरतारुण्याचं रहस्य! – InMarathi

आईचा फिटनेस मुलाच्या तोडीसतोड; जाणून घ्या तिच्या दिसण्याचं, चिरतारुण्याचं रहस्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चिरतरुण राहण्यासाठी कसलं औषध नाही, किंवा कसलाही शॉर्टकट नाही, नियमित व्यायाम योग्य आहार आणि योग्य प्रमाणात झोप या तीन गोष्टीच तुम्हाला ताजतवानं आणि सदैव निरोगी ठेवू शकतात!

अमर होणे, वय वाढीस न लागणे, चिरतारुण्य प्राप्त होणे वगैरे गोष्टी आपण केवळ कथांमध्ये वाचल्या आहेत. प्रत्यक्षात या गोष्टी म्हणजे निव्वळ थोतांड आहे असचं आपण मानतो. जीवनभर सुंदर राहण्याचं काही सिक्रेट औषध कुठेतरी मिळतं अशी देखील एक बोंब मध्यंतरी उठली होती.

तेव्हा देखील आपण अश्या अफवांना केराची टोपली दाखवली होती. पण ती बातमी खरीच होती की काय याची शहानिशा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. का म्हणून विचारता?

जरा या फोटोमधल्या ललनेकडे पहा बरं, हिने देखील तेच औषध घेतलंय की काय अशी शंका येतेय.

 

liu-yelin-china-marathipizza01

 

काय वय असेल हीचं तुमच्या मते? तुम्ही म्हणाल १८,२० आणि फार फार तर २३ च्या आसपास हो ना? अहो, भानावर या तिच्या सौंदर्यापुढे तुमचे सगळे अंदाज चुकले. ही कोणी तरुणी नसून आहे ५० वर्षांची प्रौढ स्त्री!

सरकली ना पायाखालची जमीन?? यावर तुम्ही लगेच विश्वास ठेवणार नाही म्हणा! हा लेख पूर्ण वाचा आणि मग स्वत:चं ठरवा हे दिसतंय ते खरं आहे की खोटं??

या स्त्रीचं नाव आहे लियू येलीन! चीनमध्ये राहणारी ही महिला अगदी जेव्हा आपल्या मुलासोबत बाहेर पडते तेव्हा पाहणारे त्या दोघांना कपल्स समजतात, इतकी ही स्त्री तरुण दिसते.

 

liu-yelin-china-marathipizza02

 

चेहऱ्यावर कोणते डाग नाहीत की साधी सुरकुतीही नाही. फिगर देखील विशीतल्या तरुणीला लाजवेल अशीच!

जेव्हा लोकांचा गैरसमज दूर करताना लियू सांगते की,

गोंधळू नका, माझं वय ५० वर्षे आहे.

तेव्हा समोरचा चक्रावून जातो, मगाशी तुम्ही चक्रावलात ना तसे!

 

liu-yelin-china-marathipizza03

 

तसेच लियू सांगते की,

जेव्हा कधी मी शॉपिंगसाठी वगैरे बाहेर जाते आणि लोकांना माझं खरं वय कळतं तेव्हा ते मला एखाद्या सेलिब्रिटी सारखं ट्रिट करतात आणि माझ्या या सौंदर्यामागचं सिक्रेट विचारून मला भंडावून सोडतात.

माहित आहे मंडळी, तुम्हाला देखील तिच्या एवढ्या वयातही तरुण दिसण्याचं सिक्रेट जाणून घ्यायचं आहे, पण थोडा धीर धरा आणि तिच्या तारुण्याचे काही अजून जलवे पाहत स्वत:च गेस करा की काय आहे तिचं खरं सिक्रेट? नाही मिळालं तर आम्ही आहोतच सांगायला.

 

liu-yelin-china-marathipizza04

 

 

liu-yelin-china-marathipizza05

 

liu-yelin-china-marathipizza06

 

liu-yelin-china-marathipizza08

 

liu-yelin-china-marathipizza09

 

काय मिळालं का सिक्रेट? नाही म्हणताय? ठीक आहे चला जाणून घेऊया लियूचं सिक्रेट तिच्याचकडून… आपण अजूनही इतके तरुण आणि सुंदर कसे दिसतो हे स्पष्ट करताना लियू म्हणते की,

मी रोज न चुकता पोहायला जाते आणि वजन मेंटेन ठेवण्यासाठी व्यायाम करते. या दोन गोष्टी फिट राहण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे हिवाळ्यामध्ये बाहेर जाऊन थंड पाण्यात स्विम करणे.

मी चीनची यांगास्ती नदी आणि दक्षिण कोरीयाची हान नदी पोहून पार केली आहे. तसेच गेल्याच वर्षी मी मलेशिया ते मलाक्का हे ७.४५ मैलांचे अंतर केवळ ४ तासांमध्ये पार केले होते.

माझ्या मते पोहणे, उचित व्यायाम आणि व्यायामानुसार आहार या गोष्टी तुमच्या शरीराला फिट आणि तजेल राहण्यासाठी मदत करतात, याचं गोष्टी म्हणजे माझे सिक्रेट आहे.

 

liu-yelin-china-marathipizza07

 

चीनमधील प्रसिद्ध वियेबो या सोशल मिडिया साईटवर लियुला तब्बल ७५ हजार लोक फॉलो करतात. लियूच्या जगण्याचे बोधवाक्य आहे-

तुम्हाला वाटतं तुम्ही अजूनही रुक्ष आणि निस्तेज दिसता, याचा अर्थ तुम्ही अजूनही पुरेशी मेहनत घेऊन घाम गाळलेला नाही आहे.

चला मंडळी, लहान वयातच सुरु करा की पोहायला आणि व्यायाम करायला, मग तुम्ही देखील ६० व्या वर्षी विशीतले दिसाल अशी आशा करायला हरकत नाही, नाही तरुण दिसलात तरी शरीर मात्र नक्कीच फिट राहील याची १०० टक्के खात्री आहे!

सर्व इमेज स्रोत : boredpanda.com

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?