Site icon InMarathi

याआधी सुद्धा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडून वेगळा पक्ष स्थापन केला होता!!

amrindar inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

देशातलं वातावरण गेल्या वर्षीपासूनच बिघडले आहे, कोरोनाच्या साथीमुळे देशाची घडीच पूर्णपणे विस्कळीत झाली होती, सध्या कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसून येत आहे. दिवाळी सारखे सण तोंडावर आहेत त्यामुळे प्रत्येकानेच जबाबदारी घ्यायला हवी.

देशाची आर्थिक स्थिती जशी बदलत असते, तशीच राजकीय परिस्थितीसुद्धा अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून बदलताना दिसून आली आहे, आज देशात अनेक ठिकाणी भाजपची सत्ता आहे. २०१९ च्या निवडणुकांमध्ये आपल्या महाराष्ट्रात जी काही राजकीय उलथापालथ झाली ती सामान्य जनतेच्या स्वप्नात देखील आली नसावी.

 

 

आज देशात एका प्रबळ पक्ष म्हणून भाजपकडे बघितले जाते, हेच काही वर्षांपूर्वी काँग्रेसकडे बघितले जायचे मात्र मोदी लाटेमुळे आणि पक्षाच्या चुकीच्या भूमिकांनमुळे काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. आज त्याच पक्षाच्या अध्यक्षपदावरून देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेच.

काँग्रेस पक्षाचं जिथे सरकार आहे तिथे सर्वकाही आलबेल आहे असेही नाही, नुकतंच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, ४० आमदारांनि त्यांच्यावर नाराजीचा सुर लावला होता. अखेर त्यांनी पक्षातून देखील काढता पाय घेतला आता ते लवकरच स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहेत. मात्र त्यांचा राजकीय इतिहसा बघता याआधी देखील त्यांनी आपली वेगळी चूल मांडली होती मात्र ती फार काळ टिकली नाही.

 

कोण आहेत अमरेंदर सिंग?

अमरिंदर यांच्या नावामागे कॅप्टन का लिहतात हे अनेकांना कदाचित माहिती नसेल तर अमरिंदर हे १९६३ च्या NDA मधून पास झाले आहेत. पासआउट होऊन त्यांनी लगेचच भारतीय सेनेत ते दाखल झाले होते. नंतर त्यांनी राजीनामा देखील दिला होता. मात्र १९६५ च्या युद्धात त्यांना पुन्हा एकदा सेनेकडून बोलवणे आले.

७० च्या दशकात पंजाबमध्ये अकाली दल मोठ्या प्रमाणावर सक्रिय होता. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते, सरकार विरोधात अकाली दलाचा चांगलाच रोष होता. याच दरम्यान काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांनी अमरेंदर सिंग यां काँग्रेस मध्ये सहभागी होण्यासाठी राजी केले.

 

en.wikipedia.org

 

राजीव गांधी यांनी अमरिंदर सिंग यांना का राजी केले असेल असा प्रश्न तुम्हाला  पडला असेल ना? तर अमरिंदर सिंग हे पटियाला राजघराण्यातले आहेत आणि विशेष म्हणजे राजीव गांधी यांचे शाळेतले मित्र आहेत. त्यामुळे मित्राच्या सांगण्यावरून अमरिंदर यांनी पटियाला लोकसभेतून काँग्रेसच्या तिकिटावरून लढले आणि जिंकून देखील आले.

 

 

काँग्रेस पक्ष का सोडला?

सर्व काही आलबेल सुरु होते मात्र ८०च्या दशकांत एकूणच देशात राजकीय वातावरण तापले होते. खलिस्तानचे काही दहशतवादी लोक अमृतसरच्या  सुवर्णमंदिरात लपले आहेत अशी माहिती मिळाली. शीख समुदायाच्या पवित्र मंदिरात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली एक मोहीम आखली गेली जिला ऑपरेशन ब्लू स्टार म्हणून ओळखले जाते.

 

Darpan Magazine

भारतीय सैन्यांनी सुवर्णमंदिरात घुसुन खलिस्तानी लोकांचा खात्मा केला ज्यात कॅप्टन भिंडरवाले मारले गेले, शिखांच्या धार्मिक स्थळामध्ये रक्तपात झाल्याने शीख समुदाय प्रचंड प्रमाणवर नाराज होता.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना ही झालेल्या घटनेबद्दल वाईट वाटले आणि त्यांनी आपला राजीनामा देत काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणिअकाली दल या पक्षात त्यांनी प्रवेश केला. अकाली दल पक्षाच्या आधारावर पुढे त्यांनी विधानसभेत बाजी मारली आणि काही महत्वाची खाती सुद्धा मिळवली.

 

 

अकाली दल पक्षात ते आले तरी खरे मात्र काही वर्षात त्यांचा भ्रमनिरास झाला, आणि ते १९९२ साली ते अकाली दलातून सुद्धा बाहेर पडले. पक्षातून बाहेर पडून त्यांनी शिरोमणी अकाली दल या नावाने आपला स्वतःचा पक्ष काढला खरा मात्र १९९८ साली हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला.

ज्या पक्षातून आपण नाराज होऊन बाहेर पडलो एका नवी उमेद घेऊन स्वतःचा पक्ष काढला, मात्र शेवटी त्याच पक्षात यावे लागले. आज २०२१ साली सुद्धा त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली, एकीकडून भाजप त्यांना प्रस्ताव देत आहे असे बोलले जात आहे. मात्र ते कोणता निर्णय घेतील हे येत्या काही दिवसात कळेलच.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version