Site icon InMarathi

तुमचा मोबाईल नंबर १० आकड्यांचाच का आहे? जाणून घ्या यामागील खरी कारणं

10 digit mobile number inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपल्या सर्वांसाठी सध्याच्या काळातील फार जवळची आणि महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे मोबाईल! हल्लीच्या काळात तर, निम्म्यापेक्षा जास्त काम आपण मोबाईलवर करतो.

सुरुवातीला जेव्हा भारतात फोन आले, तेव्हा त्याचा वापर फक्त कॉलिंगसाठी केला जात होता. त्यावेळी कोणी विचारही केला नसेल, की पुढे जाऊन याच मोबाईलवर एवढी सगळी कामे करता येतील.

मोबाईलमधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिम कार्ड आणि त्या कार्डचा असणारा १० अंकी नंबर. हा १० अंकी नंबर म्हणजे त्या मोबाईल वापरणाऱ्याची जणू ओळखच बनते.

 

 

अनेकांना कायम हा प्रश्न पडतो की आपला मोबाईल नंबर हा दहा अंकीच का असतो. त्याहून कमी किंवा जास्त आकडे यात का बरे नसतात? तर याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सध्या जगभरात अनेक देशांमधील मोबाईल नंबर हे दहा किंवा अकरा अंकीच असतात. ब्रिटन आणि चीनमध्ये ११ अंकी नंबर पाहायला मिळतात. २००३ साली भारतात ९ अंकी मोबाईल नंबर होते, परंतु नंतर ही पद्धत बदलून नंबर १० अंकी करण्यात आले.

मोबाईल क्रमांक ‘दहाच अंकी’ असण्यामागचे कारण म्हणजे सरकारची राष्ट्रीय क्रमांक योजना म्हणजेच NNP.

 

 

लोकसंख्या सुद्धा महत्त्वाची…

मोबाईल नंबर १० अंकी असण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपली लोकसंख्या. समजा जर मोबाईल नंबर फक्त एक अंकी असेल तर शून्य ते नऊ पर्यंत फक्त १० नंबर तयार करता येतील. १० लोक ते १० नंबर वापरू शकतील. दुसरीकडे, जर फक्त दोन नंबरचा अंक हा मोबाईल नंबर असेल, तर शून्य ते ९९ पर्यंत फक्त १०० नंबर करता येतील, ज्याचा वापर फक्त १०० लोक करू शकतील.

सध्या आपल्या देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे. त्यानुसार ९ आकड्यांचा मोबाईल नंबर असेल, तर भविष्यात सर्व लोकांना मोबाईल क्रमांक देण्यात अडचणी निर्माण होतील.

दुसरीकडे १० अंकी मोबाईल नंबर बनवला तर गणनेनुसार एक हजार कोटी वेगवेगळे नंबर तयार होऊ शकतात. तसेच एक हजार कोटी लोकांना मोबाईल नंबर सहज देता येतील. त्यामुळे १० अंकी मोबाईल क्रमांक तयार करण्यात आले.

 

indiatimes.com

२००३ पर्यंत भारतात ९ अंकी मोबाईल नंबर होते. त्यानुसार भारतात फक्त १०९ कोटी मोबाईल नंबर तयार झाले असते. पण आता भारताची लोकसंख्या १३० कोटींपेक्षा जास्त आहे, त्यामुळे ९ अंकी मोबाईल नंबर सर्वांना पुरेसे पडणार नाहीत. देशाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे ९ अंकी मोबाईल क्रमांक बदलून १० अंकी करण्यात आला.

आपल्याला दुसरा एखादा १० अंकी क्रमांक आठवत असेल किंवा नसेलही, परंतु प्रत्येकाला स्वतःचा १० अंकी फोन नंबर आठवतो. आपण आपला फोन नंबर ५ सेकंदांपेक्षा कमी वेळेत एखाद्या व्यक्तीला सांगतो. हा नंबर आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवलेला असतो, की तो आपण कधीच विसरत नाही.

जेव्हा फोन नंबरमध्ये ९ अंकच असायचे, तर हे केवळ १०० कोटी ग्राहकांना ही सुविधा देण्यात येऊ शकत होती. म्हणून, १० अंकी मोबाईल क्रमांकाची निवड करण्यात आली.

१० अंकांमुळे १००० कोटी लोकांपर्यंत सुविधा पोहचवता येऊ शकते आणि जागतिक लोकसंख्येसाठी, ही क्षमता ओलांडण्याची शक्यता फारच कमी आहे.

 

 

भारतीय मोबाईल नंबरचे अंक काय दर्शवतात?

आपले मोबाईल नंबर हे नुसते काही असेच अंक एकत्र करून तयार केलेला नंबर नाही. सर्व मोबाईल नंबरमध्ये ३ गोष्टी समाविष्ट असतात. २ अंकी अॅक्सेस  कोड (AC), ३ अंकी प्रोव्हायडर कोड आणि ५ अंकी सबस्क्राइबर कोड (SC).

उदाहरणादाखल आपण एखादा मोबाईल नंबर पाहूया. ९८५-६७७-५६८३. AC = ९८ पीसी = ५६७, SC=७५६८३ प्रत्येक देशाचा कोड नंबर सुद्धा वेगळा आहे. चीनचा कोड नंबर +८६ असून तेथील फोन नंबर ११ अंकी आहेत. चीनमध्ये सर्व नंबर हे क्रमांक एकने सुरू होतात. अमेरिकेने त्यांचा देशाचा कोड ‘+१’ हा आधीच स्वतःसाठी राखून ठेवला आहे.

२०१९ मध्ये अशी बातमी आली होती, की भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) भारतात मोबाईल नंबर १० अंकांवरून ११ अंकांमध्ये बदलणार आहे. परंतु ट्रायने ही बाब नाकारली होती आणि अशा बातम्यांना अफवा म्हटले होते.

 

 

तथापि, TRAI ने शिफारस केली आहे की देशातील ग्राहकांची संख्या पाहता अपेक्षित वाढ पूर्ण करण्यासाठी सरकारने फिक्स्ड-लाइन आणि मोबाइल नेटवर्कसाठी नवीन ‘नॅशनल नंबरिंग स्कीम’ लागू करावी.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version