Site icon InMarathi

पाकिस्तानचा विजय साजरा करणं या ‘मुस्लिम’ महिलेला चांगलंच महागात पडलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गेल्या रविवारी बऱ्याच दिवसांनी भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा माहोल बघायला मिळाला, त्यातही वर्ल्डकपची मॅच असल्यामुळे तणावाची परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळाली. दीड वर्षं फारसे सामने एंजॉय न करता आल्याने यावेळच्या T-20 वर्ल्ड कपची भारत पाकिस्तान मॅच खास होणार हे तर विधीलिखितच होतं!

नेहमीप्रमाणेच रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळाला, ट्रॅफिक नव्हता, सगळे भारतीय टीव्हीसमोर फेविकॉल लावून बसले होते. अर्थात जे आजवर घडलं नाही ते त्या दिवशी घडलं, भारत ही मॅच हरला आणि त्याबद्दल सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ आपल्याला बघायला मिळाला.

 

 

काहींनी याचा दोष सर्वस्वी भारतीय संघावर टाकला तर काहींनी खिलाडू वृत्ती दाखवत आपल्या संघाचं मनोबल वाढवलं. एकंदरच भारत पाकिस्तानची ही मॅच ऐतिहासिक ठरली यात तर काहीच वाद नव्हता.

याच मॅचमुळे उदयपुरच्या एका शिक्षिकेला तिची नोकरी गमवावी लागेल असं कोणाला वाटलं होतं? पण अशी घटना खरंच चक्क भारतात घडली आहे, या सामन्यात पाकिस्तानचा विजय साजरा करण्यावरून एका शिक्षिकेला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे, नेमकं काय घडलं आहे ते जाणून घेऊयात!

राजस्थानच्या उदयपुर शहरात निरजा मोदी शाळेत शिकवणाऱ्या नफिसा अटारी नावाच्या शिक्षिकेला पाकिस्तानचा विजय साजरा केल्यामुळे शाळेतून काढून टाकण्यात आल्याची बातमी २ दिसवसापासून सोशल मिडियावर फिरत आहे.

भारताने मॅच हरल्यावर त्याबद्दल आनंद व्यक्त करत नफिसा यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आणि त्यामुळेच त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे असं म्हंटलं जात आहे.

 

 

असं स्टेटस आणि पाकिस्तानी खेळांडूचा फोटो शेअर केल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या पालकाने नफिसा यांना विचारलं की “तुम्ही पाकिस्तानला सपोर्ट करता का?” त्यावर त्यांनी होकारार्थी उत्तरसुद्धा दिलं!

यानंतर ही शाळा ज्या चॅरिटेबल ट्रस्टखाली काम करते त्या ट्रस्टच्या कमिटी मेंबर्सनी मीटिंग घेऊन नफिसा यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि तशी नोटिसही धाडली, पण त्या नोटिसमध्ये कुठेच यामागचं कारण स्पष्टपणे नमूद केलं नव्हतं.

नफिसा यांना नोकरीवरुन काढून टाकल्यावर त्यांनी एक व्हीडियो मेसेज रेकॉर्ड करून घडलेल्या घटनेबद्दल माफीसुद्धा मागितली आणि आपल्या स्टेटसचा लोकांनी चुकीचा अर्थ काढल्याचंही नमूद केलं.

 

ज्या पालकाच्या प्रश्नावर नफिसा यांनी होकारार्थी उत्तर दिलेलं त्याबद्दल स्पष्टीकरण देत नफिसाने स्वतःच्या देशभक्तीचा दाखलासुद्धा दिला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या कॅम्पसमध्ये जाऊन विरोधसुद्धा दर्शवला, आणि शाळेने यावर सक्त कारवाई करावी अशी भूमिका मांडली.

शिवाय कार्यकर्त्यांनी त्या शिक्षिकेच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्याचासुद्धा इशारा दिला आहे. कदाचित म्हणूनच दबावाखाली येऊन नफिसा यांना काढून टाकण्याचा निर्णय शाळेने घेतला असावा.

काश्मीरमध्येसुद्धा काही विद्यार्थ्यांवर आणि हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांवर पाकिस्तानचा विजय साजरा केल्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदवण्यात आलेली आहे.

एकंदरच या काही घटनांवरुन देशातल्या काही लोकांच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटते. भारत पाकिस्तान हा विषय बराच सेन्सीटीव्ह आहे आणि या दोन्ही देशात होणारे सामने हे खेळापेक्षा वरचढ असतात, पण शेवटी हा एक खेळ आणि याकडे खिलाडूवृत्तीनेच बघायला हवं.

 

 

भारताने नेहमीच प्रत्येक खेळात खिलाडू वृत्ती दाखवली आहे पण अशा काही घटनांमुळे लोकांच्या मानसिकतेवर आणि खिलाडू वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version