Site icon InMarathi

जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर भारतात नसून परदेशात आहे!

temple inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात सर्वात जास्त हिंदू लोक हे भारतामध्येच राहतात आणि भारतामध्येच सर्वात जास्त हिंदू धर्माची मंदिरे आहेत, याचा आपल्या सर्वांनाच सार्थ अभिमान आहे.

धर्म कोणाताही असो, प्रत्येकाला आपली श्रद्धा व्यक्त करण्याचा, प्रार्थनेचा पुर्ण अधिकार आहे. 

त्यामुळे ठराविक दिवशी देवळात जाऊन, पुजा करून आपलं मन शांत करण्यासाठी लाखो लोक देवळात जातात.

भारतात तर प्रत्येक गल्लोगल्लीत मंदिरं आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

प्रत्येक जातीधर्माची मंदिरं वेगळी असली, तरी प्रत्येक मंदिर आपल्या शहराची शोभा वाढवतं.

पण एक गोष्ट वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य होईल की, जगातील सर्वात मोठे हिंदू धर्माचे मंदिर भारतामध्ये नाही तर परदेशामध्ये आहे.

काय म्हणता? विश्वास नाही बसतं? चला तर मग जाणून घेऊया.

 

khanacademy.org

 

जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आहे हिंदू धर्म!

त्यामुळे हिंदू धर्माची पाळेमुळे केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगात विविध देशात आढळतात आणि ते साक्ष देतात हिंदू धर्माच्या महतीची!

त्याचेच उदाहरण म्हणजे हे कंबोडिया देशामधील अंगकोरवाट मंदिर होय.

 

whc.unesco.org

 

हे मंदिर कंबोडियाच्या अंगकोर शहरामधील मीकांग नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. या नगराचे पूर्वीचे नाव ‘यशोधरपुर’ होते.

 

nationalgeographic.com

 

या मंदिराची प्रसिद्धी एवढी आहे कि, या मंदिराला बघण्यासाठी परदेशातून लाखो माणसे येतात.

ह्या ऐतिहासिक वास्तूबद्दल त्या देश्यात किती आदर आहे,याचा अंदाज ह्या गोष्टीवरूनच येतो कि त्यांच्या राष्ट्रध्वजावर या मंदिराची आकृती निर्माण केलेली आहे.

परदेशात कंबोडिया देशाची ओळख अंगकोरवाट मंदिरावरूनच होते.

 

shutterstock.com

 

हे मंदिर देवाधी देव विष्णूंना अर्पित केले आहे, परंतु पहिल्यांदा हे मंदिर शंकरदेवांसाठी बनवले गेले होते.

अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि भव्य शिल्पकलांचा नमुना म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर मध्ययुगात ‘व्रह विष्णुलोक’ (गृह विष्णुलोक) म्हणून ओळखले जाई.

 

mmoss.ca

 

सुमारे इ.स. ८८९च्या काळात ख्मेर राज्यकर्ता यशोवर्मन पहिला याने येथे यशोधरापुर नावाची आपली राजधानी स्थापन केली.

या नगराच्या सभोवती त्याने खंदक खोदून नगराला सुरक्षित बनवले. कालांतराने या शहरालाच अंगकोर म्हटले जाऊ लागले.

त्यानंतर आलेल्या सर्व राजांनी आपापल्या परीने नगराची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारचे बांधकाम केले.

त्यापैकी एक राजा सूर्यवर्मन द्वितीय ( इ.स. १११३- इ.स. ११४५) यांनी अंकोरवाट मंदिराची स्थापना केली.

त्यांनी दिराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंना एक विशाल खंदक बनवले. ज्याची रुंदी ७०० फूट आहे. दूरवरून बघितल्यावर हे खंदक एखाद्या तलावाप्रमाणे दिसते.

खंदक पार करण्यासाठी मंदिराच्या पश्चिमेला एक पूल बनवला. मंदिराचे बांधकाम सुमारे ३७ वर्षे हे अखंडित सुरु राहिले. राजा सूर्यवर्मनच्या मृत्यूनंतर हे काम सततच्या युद्धांमुळे व आक्रमणांमुळे थांबून राहिले.

 

keywordsuggest.org

 

पुढे जयवर्मन सातवा ( इ.स. ११८१- इ.स. १२१९) याच्या काळात बांधकाम पुन्हा सुरु करण्यात आले.

परंतु या वेळेपर्यंत कंबोडिया देशामध्ये बौद्धधर्माचा वाढीस लागला होता आणि त्यामुळेच मंदिराच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या बांधकामामध्ये बौद्ध स्थापत्यशास्त्राचा प्रभाव देखील आढळतो.

सोबतच मंदिराच्या अनेक भागांत भगवान बुद्धांच्या मूर्ती देखील आढळतात. याच कारणामुळे हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माचे भाविक मंदिराच्या दर्शनासाठी येतात.

स्थापत्त्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून सुस्थितीत असणारे अंगकोर वाट ही एकमेव वास्तू आहे.

 

pinterest.com

 

या मंदिराचे बांधकाम हिंदू पुराणातील क्षीरसागराच्या मंथनाचा प्रसंग दर्शविण्यासाठी केले गेले आहे.

मंदिराची मुख्य इमारत मेरू पर्वताची प्रतिकृती मानली जाते तर सभोवतीचा पाण्याचा खंदक क्षीरसागर मानला जातो.

ह्या मंदिराच्या भिंतींवर भारताची झलक दिसते. मंदिराच्या भिंतींवर खूपच सुंदर प्रकारे अप्सरांची चित्रे कोरली आहेत.

राक्षस आणि देवांच्या मध्ये झालेले अमृत मंथनाचे दृश्य ही दाखवले गेले आहे. येथील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी पूर्ण जगातून लोक इकडे येतात.

 

dailymail.co.uk

 

काय मग? जाणार न मंदिर सौंदर्याची ही नयनरम्य उधळण पाहायला?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version