दादा कोंडकेंचं मूळ नाव आहे वेगळं, ‘या’ घटनेमुळे सगळेजणं म्हणू लागले ‘दादासाहेब’
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ‘दादा कोंडके’ कोणाला नाही माहित? ‘ढगाला लागली कळं’ हे गाणं कुठेही आठवलं, तरी त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो.
दादा कोंडके हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. केवळ एक उत्तम विनोदी अभिनेता म्हणूनच नाही, तर एक उत्तम दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, संवाद लेखक आणि या सगळ्यापलीकडे जाऊन एक कलासक्त माणूस अशी त्यांची ओळख आहे.
ते पडद्यावर कसे होते हे महाराष्ट्रातल्या घराघरांत ठाऊक आहे, पण पडद्यामागचे ‘दादा’ कसे होते, हे खूप कमी जणांना ठाऊक आहे. मुळात त्यांना ‘दादासाहेब’ हे नाव कसं पडलं? यामागे सुद्धा एक गोष्ट आहे.
—
- बॉलिवूडच्या मायलेकींनी एका कारणामुळे २० वर्षे एकमेकींशी संवाद साधला नाही
- चित्रपटसृष्टीतल्या दादामुनींनी ‘त्या’ घटनेनंतर कधीच स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही!
—
१९२८ साली दादासाहेबांचा जन्म मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये झाला. त्यांच्या जन्माआधी त्यांच्या आईने ४-५ अपत्ये गमावली होती, म्हणून त्यांना मूल नको होतं. दादासाहेबांच्या जन्माच्या वेळीही त्यांच्या आईला प्रचंड यातना झाल्या.
जन्मापासूनच दादासाहेब फार अशक्त होते. आजारी होते. ऊब मिळण्यासाठी त्यांना काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं होतं. वडिलांनी तर त्यांच्या जगण्याची आशाच सोडून दिली होती.
दादासाहेबांचे वडील – खंडेराव कोंडके बॉम्बे डाईंगमध्ये कामाला होते. मिलच्या आवारात सात नंबरच्या चाळीत त्यांच्या ११ खोल्या होत्या. दादासाहेबांची प्रकृती नाजूक असल्याने घरातील सगळेचजण चिंतेत असायचे.
दादसाहेबांचं मूळ नाव ‘कृष्णा’. कृष्णाष्टमीचा जन्म म्हणून त्यांचं नाव ‘कृष्णा’ ठेवण्यात आलं होतं. हे मूल जगेल की नाही याची खात्री नसल्याने या बाळाची कुंडली, जन्माची वेळ, भविष्य वगैरे कोणीही बघितलं नाही.
लहानपणी हा कृष्णा सतत आजारी पडायचा. त्यांना सशक्त बनवण्यासाठी सगळेजण विविध उप्पय करत होते. कसल्यातरी कडवट वनस्पतीचा रस या बाळाला पाजण्यास त्याच्या आजोबांनी सुरुवात केली होती.
कृष्णाला सशक्त करण्यासाठी लोकं विविध उपाय सांगायला लागले. असंच त्यांचा आईला कोणीतरी उपाय सुचवला, की ‘त्याला नावाने हाक मारू नका. रावसाहेब, दादासाहेब अशा कोणत्यातरी टोपणनावाने हाक मारा. नावाने खूप फरक पडतो, एकदा करून बघा’
म्हणून सगळ्यांनी कृष्णाला ‘दादासाहेब’ म्हणायला सुरुवात केली आणि त्यानंतर ते सुप्रसिद्ध ‘दादासाहेब कोंडके’ झाले हा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहेच.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.