छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल : काही माहित असलेलं, काही माहित नसलेलं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : ओंकार जोशी
===
इंद्र जिमि जृम्भा पर
बांडव सअंभ पर
रावण सदंभ पर
रघुकुल राज है
पवन बरिनाह पर
संभु रतिनाह पर
ज्यों सहसबाह पर
राम द्विजराज है
दावा दृमदंड पर
चिता मृगझुंड पर
भूषण वितुंड पर
जैसे मृगराज है
तेज तमअंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर
शेर शिवराज है!
काय सुरेख वर्णन केलंय कवी भूषण यांनी महाराजांचं !
छत्रपती शिवाजी महाराज…आपल्या मराठी बांधवांसाठी, आपलं “बंधुत्व” प्रस्थापित करण्यासाठी हे नावंच पुरेसं आहे.
अखंड महाराष्ट्रात असा कोणी सापडणार नाही, ज्याला, “काय रे? शिवाजी महाराज माहित आहेत का?” असं विचारल्यावर “नाही” उत्तर येईल असं – आमच्या अस्तित्वाशीच जोडलं गेलेलं नाव.
एरवी जातीपातीमधे विभागलेला महाराष्ट्र – तुम्ही जातीने कोणीही असा – कुणा समोरही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करा, एकसाथ, एकदिलाने स्फुरण चढल्याशिवाय राहणारच नाही.
चला तर मग, महाराजांविषयी थोडंसं जाणून घेऊया…!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या या मंदिरात रावण आणि त्याच्या पित्याने तपस्या केली होती!
===
छत्रपती शिवाजी महाराज…
जन्म :- १९ फेबृवारी १६३०
जन्मस्थळ :- किल्ले शिवनेरी
माता :- राजमाता जिजाऊसाहेब
पिता :- शहाजीराजे भोसले
अपत्य :- संभाजी, राजाराम, सखुबाई, रानुबाई, अंबिकाबाई, राजकुमारीबाई
प्रमुख शत्रु :- आदिलशाही, निझामशाही, कुतुबशाही, मोघलाई.
सैन्य विस्तार :- घोडदळ – ४००००, पायदळ – ५००००, पश्चिम तटावर आरमार बांधणी.
काही उल्लेखनीय बाबी :
- जनतेचा राजा – “जाणता” राजा
- मराठा साम्राज्याचे संस्थापक
- मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती
- अष्टप्रधान मंडळाचे संस्थापक
- भारतीय नौदलाचे जनक
- गनिमी काव्याचे जनक
- एकमेवाद्वितीय राजा ज्याने स्वतःचा महाल बांधला नाही
- शिवशक कालगणनेचे सुरुवात केली
- स्वराज्याची राजमुद्रा, स्वतंत्र नाणी
- शककर्ता, क्षत्रियकुलावंतस् इ. बिरुदे
महाराजांविषयीचे काही उल्लेखनीय उद्गार
“लाख मेले तरी चालतील, पन लाखांचा पोशिंदा जगलाच पाहीजे”
– बाजीप्रभु देशपांडे
“हा तानाजी जिवंत असताना महाराज स्वतः मोहिमेवर जाणार? आधी लगीन कोंढाण्याचं, अन् मंग माझ्या रायबाचं”
– तानाजी मालुसरे
“Shivaji is one of the greatest national saviour who emancipated our society & our HINDU dharma, when they were faced with threat of total destruction. He was peerless hero, a pious & God-Fearing King & verily a manifestation of all virtues of a born, Leader of men described in our ancient scriptures”
– Swami Vivekanda
शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप, भुमंडली।।
– समर्थ रामदास स्वामी
छत्रपतींनी उभं केलेलं “स्वराज्य”
स्मरणातील शिवाजी महाराज :
१७ एप्रिल १९६१ (स्त्रोत)
राज्याभिषेकाचं ३०० वं वर्ष (स्त्रोत)
२१ एप्रिल १९८० (स्त्रोत)
तर मग – होऊन जाऊ दे –
छत्रपती शिवाजी महाराजांचा…विजय असो…विजय असो…विजय असो…!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – जेव्हा स्त्री सैन्य शिवरायांच्या मावळ्यांना भिडतं, इतिहासातील एक अपरिचित लढाई
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.