डांबर गोळ्यांचा चुकीचा वापर म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण! असा करा योग्य वापर…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
पूर्वीच्या काळी रेशमी साड्या, लोकरीचे कपडे तसेच घरातील अंथरूण-पांघरूणे यांना वर्षातून एकदा कडक उन्हात ठेवले जायचे, त्यांच्या घड्या बदलल्या जायच्या. त्यानंतर त्यामध्ये लवंग, कापुर असे उग्र वासाचे पदार्थ ठेवले जायचे आणि त्यांची रवानगी पुन्हा ट्रंका किंवा कपाटामध्ये केली जायची.
आता लवकरच हिवाळा सुरू होणार आहे याची ती पूर्वसूचना असायची. काळ बदलत गेला तसा या सगळ्यात सुद्धा बदल होत गेला आणि लवंग, कापुर आणि ऊन यांची जागा घेतली क्रिस्टलसारख्या दिसणार्या डांबर गोळ्यांनी!
त्या बिचार्या ‘पांढर्याशुभ्र’ गोळ्यांना डांबर गोळ्या का म्हणत असावेत बरे? त्यांना सहज जरी हात लागला आणि त्यांचा वास घेतला तरी आपल्याला गरगरल्यासारखे का होते? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात त्यावेळी येत असतील.
या गोळ्या का वापरल्या जातात हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हीही जर तुमच्या कपाटात डांबराच्या गोळ्या ठेवत असाल तर त्या गोळ्यांचा उपयोग, त्यांचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती असेलच पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊ या गोळ्यांच्या वापराविषयी…
तुम्ही जर कधी mothball किंवा डांबर गोळ्या असे टाइप करून गुगलला शोधले तर नेप्थ्लान हा घटक वापरुन तयार केलेल्या क्रिस्टल सारख्या गोळ्या दिसतील. बरेच दिवस न वापरलेल्या कपड्यांना येणारा वास घालवण्यासाठी त्या कपड्यांमध्ये ठेवल्या जातात.
वाळवी, झुरळे, पाली, पतंग अशा कीटकांपासून आपल्या कपडे आणि घरातील वस्तू तसेच आपल्या किचन सिंकचा बचाव व्हावा म्हणून आपण या डांबर गोळ्या वापरतो.
–
- कीटकनाशकापासून टॉयलेट स्वच्छतेपर्यंत असे कोका कोलाचे १३ उपयोग आजमावून बघा
- उंदरांचा त्रास झटक्यात कमी करण्याचे ९ घरगुती, पण जालीम उपाय!
–
कपडे व्यवस्थित राहण्यासाठी…
बराच वेळ कपाटात ठेवलेल्या साड्यांना किड लागण्याची भीती असते, किंवा त्यांचा रंग उडतो. त्यासाठी तुम्ही डांबर गोळ्यांचा वापर करू शकता. साड्या, कापडाच्या किंवा प्लास्टिकच्या पाऊचमध्ये व्यवस्थित घडी करून ठेवाव्यात. डांबर गोळ्या ठेवताना साडीला चिकटणार नाहीत याची काळजी घ्यावी अन्यथा साड्यांचा रंग उडू शकतो.
आपले कपड्यांचे कपाट बंद असल्याने आत हवा जाणे अशक्य असते. अशा वेळी बुरशी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेषतः पावसाळ्यात अगदी थोड्या ओलाव्याने सुद्धा बुरशीला आमंत्रण मिळू शकते. या बुरशीमुळे कपड्यांना छिद्रे पडणे, काळे डाग पडणे अशा समस्या उद्भवू शकतात. अशावेळी कपाटात वाळवी आणि तत्सम कीटकांचा उपद्रव टाळण्यासाठी कपाटात डांबर गोळ्या ठेवणे देखील उत्तम पर्याय ठरू शकतो.
का आणि काय काळजी घ्यावी…
या गोळ्या ठेवताना कपाटात अशा जागी ठेवाव्यात, जिथे आपला किंवा आपल्या कपड्यांचा त्यांच्याशी थेट संपर्क येणार नाही. पतंग किंवा वाळवीसारख्या कीटकांच्या अळ्या प्राणिज प्रोटीनवर वाढतात. रेशीम, लोकर असे कपड्यांचे प्रकार याचे स्रोत असतात, त्यामुळे अशा प्रकारच्या कपड्यांवर वाळवी किंवा पतंग यांचा संसर्ग लवकर होऊ शकतो.
डांबर गोळ्या कीटकनाशक म्हणून काम करत असल्याने हिवाळ्यात कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवाव्यात. कपडे वापरण्याच्या किमान दोन दिवस आधी ते बाहेर काढून ठेवावेत. कपडे काढल्यावर त्याच्यातील गोळ्या काढून घ्याव्यात, यामुळे त्याच्यात निर्माण झालेला रसायनयुक्त वास कमी होईल.
या गोळ्यांच्या चुकीच्या वापरामुळे डोकेदुखी, मळमळ, नाकाची आणि डोळ्यांची आग, क्वचित प्रसंगी खोकला हे त्रास होऊ शकतात. तसेच कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे यांचा वापर करताना पुरेशी खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे.
–
- फिटनेस बॅंडचे कोणीही सांगत नाही असे ८ तोटे ठाऊक हवेतच!
- सकाळी जॉगिंगला जाण्याचा कंटाळा येतो? या “९” ट्रिक्स तुमचं जॉगिंग आनंददायी करतील
–
या गोळ्या हवेच्या संपर्कात आल्यावर त्यांची वाफ होऊन, ती वाफ विषारी वायु हवेत सोडते. त्यामुळे बर्याच दिवसांनी आपण हे ठेवणीतले कपडे बाहेर काढले तर लगेच न घालता थोडे झटकून आणि त्यातील गोळ्या बाजूला काढून थोडावेळ तसेच हवेवर मोकळे ठेवून मगच वापरावेत.
आपल्या गरजेसाठी बनलेल्या कोणत्याही वस्तूचे जसे फायदे असतात तसे तोटेदेखील असतात. हे फायदे-तोटे आपल्याला एकाच वेळी अनुभवावे लागतात.
डांबर गोळ्या या चांगल्या पद्धतीच्या कीटकनाशक आहेत. हा त्यांचा फायदा असला तरी त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत हा तोटा सुद्धा आहे. तेव्हा त्यांचा मर्यादित वापर करणे, त्यांना कमीत कमी हाताळणे, घरातील लहानग्यांच्या हाती लागणार नाहीत अशा ठिकाणी या गोळ्या ठेवणे यासारखी काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो.
डांबर गोळ्यांचा मर्यादित वापर करणे आणि त्यांच्या वापराने घर, कपडे आदि वस्तू सुरक्षित ठेवणे हे आपण करूच शकतो. तेव्हा डांबर गोळ्या जरी असल्या तरी योग्य काळजी घेऊन आपण त्यांचा सुरक्षित वापर करू शकतो आणि आपल्या कपड्यांचा टिकावूपणा वाढवू शकतो.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.