Site icon InMarathi

चुंबन आणि मिठीत घेऊन स्त्रियांचे आजार बरे करणारा’ किसिंग बाबा!

kissing final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आज आपल्या धावपळीच्या दोन क्षण निवांत बसायला वेळ नसतो. त्यात आता वर्क फ्रॉम कल्चरमुळे वाढलेले कामाचे तास, मुलांच्या ऑनलाईन शाळा, घरातले प्रॉब्लेम्स यामुळे अनेकांची मानसिक शांतता हरपली आहे. कुठेही फिरायला जावं तर वाढते ट्रॅफिक यामुळे लोक घरीच राहणं पसंत करतात.

मानसिक त्रास वाढत असल्याने अनेकजण आध्यत्मकडे वळत आहेत, अनेक प्रकारचे योगासन करून आपल्या मनावरील ताण हलका करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आज बाजरात अनेक आध्यत्मिक गुरुरू वाढत चालले आहेत. कोणतेही टीव्ही चॅनेल आपण सकाळी लावल्यास एकतारी असं बाबा दिसतोच.

 

food.ndtv.com

ढोंगीपणा, भोंदूगिरी, समाजात अंधश्रद्धेला खत घालणारे बाबा आज समजत खुलेआम फिरताना दिसून येत मात्र असा ही एक बाबा होऊन गेला आहे, ज्याच्या चुंबनाने आणि मिठीने स्त्रियांचे आजार बरे होतात असा दावा खुद्द त्या बाबानेच केला आहे, कोण आहे तो बाबा चला तर मग जाणून घेऊयात …

 

कोण आहे बाबा?

किसिंग बाबा या नावाने प्रचलित असलेला या बाबाचे खरे नाव रामप्रकाश चौहान आहे. त्याचा दावा असा आहे की, स्त्रियांचे मानसिक आणि शारीरिक आजार आपल्या चमत्कारिक चुंबाबाने बरे होऊ शकतात.

 

 

किसिंग बाबाचा असाही दावा आहे की भगवान विष्णूने स्वप्नात येऊन आपल्या ही दैवी शक्ती दिली आहे. केवळ स्त्रियांच्या समस्या नाहीतर कौटुंबिक समस्या, लग्न झालेल्या जोडप्यांच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या आपण सोडवू शकतो.

 

 

आसाममधल्या मोरगाव जिल्ह्यातील भोरालतूप गावात त्याने आपल्या राहत्या घरीच मंदिर देखील बांधले होते. त्याच्या या विचित्र पद्धतीमुळे तो मोठया प्रमाणावर प्रचलित झाला होता. आसपासच्या गावात त्याची ख्याती पसरली होती.

या बाबीची कीर्ती सर्वदूर पसरली होती, अगदी माध्यमांपर्यंत ही गोष्ट पोचल्यावर साहजिकच एका पत्रकाराने त्याची मुलख घेतली. मुलाखतीमध्ये आपल्या दैवी देणगीचे आणि उपायाचे महत्व सांगितले आणि त्यामागच्या विज्ञानाचा देखील खुलासा केला.

 

 

पत्रकाराने घेतलेल्या या वादग्रस्त मुलाखतीची माहिती स्थानिक पोलिसांना कळली, आणि पोलिसांनी तातडीने या ढोंगी बाबाला अटक केली असून यापुढे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

आज इतकी शतक उलांडून सुद्धा आपण केवळ धर्माच्या नावाखाली एकमेकांशी वाद घालत असतो. धर्माचे महत्व सांगून अनेक संधी साधू समस्यांनी विटलेल्या माणसांचे बळी घेतात. आजही देशातील काही भागात ढोंगी साधू बाबा लोकांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन आपली पोळी भाजत असतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version