Site icon InMarathi

लॉटरीच्या तिकिटांची विक्री, १ रुपया मानधनात केलेला चित्रपट.. लक्षात राहिलेला ‘लक्ष्या’

lakshya inmarathi5

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

विनोदी अभिनेता म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काही नावं येतात, त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे ‘लक्ष्या मामा’ आज प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिवस.

त्यांचं विनोदाचं टायमिंग इतकं अचूक होतं, की संपूर्ण सिनेसृष्टीत ‘विनोदाचा बादशाह’ म्हणून त्यांची ख्याती पसरली. या लेखातून त्यांच्या काही आठवणी जाग्या करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही करतोय :

 

 

१ रुपयात केलेला चित्रपट :

हेडिंग वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चक्क ‘१ रुपया’ एवढंच मानधन एका चित्रपटासाठी घेतलं होतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा मराठीतला सुपरहिट चित्रपट ठरला.

महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही त्याकाळची खूप प्रसिद्ध जोडी होती. या जोडीने मराठी सिनेसृष्टीला नवं रूप बहाल केलं. रुपेरी पडद्यावर तर ही जोडी हिट होतीच, पण वैयक्तिक आयुष्यातही त्यांचे संबंध खूपच जवळचे होते.

त्या दोघांच्या मैत्रीचा एक किस्सा आहे, जो खूप कमी जणांना ठाऊक असेल.

 

 

महेश कोठारे यांना हिंदीतील एका चित्रपटाचा रिमेक करायचा होता. ‘प्यार किये जा’ हे त्या चित्रपटाचं नाव. ते योग्य अभिनेत्याच्या शोधात होते.

त्यावेळेस, महेश कोठारे यांचे आईवडील ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे प्रयोग करत होते. या नाटकाचे हजारोंपेक्षा जास्त प्रयोग झाले होते, पण या नाटकातील ‘बबन प्रभुणे’ यांचं निधन झालं आणि त्याजागी लक्ष्मीकांत बेर्डे ती भूमिका करू लागले.

एकदा या नाटकाचा प्रयोग बघण्यासाठी महेश कोठारे गेले होते, लक्ष्मीकांत बेर्डे यांचं काम बघून त्यांनीच आपल्या चित्रपटात काम करावं, असं त्यांना वाटलं, पण दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयोग असल्याने त्यांच्याकडे फार पैसे नव्हते.

लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटाची कथा त्यांनी ऐकवली आणि त्यांनीही मानधनाचा विचार न करता चित्रपटासाठी होकार दिला. तेव्हा महेश कोठारे यांनी खिशातून १ रुपया काढून महेश कोठारे यांना दिला, आणि केवळ १ रुपयात केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला.

या चित्रपटाचं नाव ‘धुमधडाका’ नावाप्रमाणेच या चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला. या चित्रपटाने लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

 

 

या जोडगोळीने पुढे अनेक चित्रपट एकत्र केलं. झपाटलेला, पछाडलेला या चित्रपटांनीसुद्धा मराठी चित्रपटांना एक वेगळी दिशा दिली.

==

लॉटरीवर फोटो – 

 

 

कोणताही कलाकार एका रात्रीत कधीच प्रसिद्ध होत नाही, त्यामागे अनेक वर्षांची मेहनत असते. संघर्ष असतो. आपल्याला दिसताना त्यांच्या प्रसिद्धीचं वलय दिसतं, पण त्यामागचे कष्ट आपल्याला महित नसतात.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचीही अशीच संघर्षकथा आहे. करियरच्या सुरुवातीला त्यांनी हाताला मिळेल ते काम केलं आहे. अभिनयाची आवड तर त्यांना होतीच, पण त्यासोबतच त्यांनी अनेक कामं केली आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांना अनेक गोष्टींची हौस होती आणि ती हौस पूर्ण करण्यासाठी ते स्वतःच कष्ट घ्यायचे. दिवाळीत नवीन कपडे घेण्यासाठी ते उटणे विकायचे, फटाके विकायचे. स्वतःच्या कमाईने ते पैसे मिळवायचे आणि मग त्यातून कपडे घ्यायचे.

अनेकदा त्यांनी लॉटरीची तिकिटंही विकली आहेत. लॉटरी विकत असताना तेव्हा कधी त्यांना असं वाटलं नव्हतं, की दहा वर्षांनी त्याच लॉटरीच्या तिकिटावर त्यांचा फोटो येईल.

==

आईकडून प्रेरणा

लक्ष्मीकांत बेर्डे आणि विनोद हे जणू काही न बदलता येणारं समीकरण आहे. या विनोदाची निर्मिती त्यांच्या घरातूनच झाली. घरात गरिबी असूनही दुःखी चेहरा न करता नेहमी सगळ्यांना हसवणाऱ्या, हसत राहणाऱ्या त्यांच्या आईकडे बघून त्यांना कायम प्रसन्न वाटत असे.

आईकडे बघून त्यांनी लहानपणीच असं ठरवलं होतं, की जी दुःख असतील ती कायम मनात ठेवायची आणि चेहऱ्यावर हसू ठेवायचं. स्वतः हसायचं आणि लोकांनाही हसवायचं.

 

 

त्याकाळात लक्ष्मीकांत बेर्डे – महेश कोठारे – अशोकमामा आणि सचिन पिळगांवकर यांनी धूम मचवली. त्यांनी लोकांना भरभरून हसवलं, वेळप्रसंगी भावुक केलं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version