Site icon InMarathi

“आयुष्यात स्थैर्य हवंय, मग लग्न करा”… पालकांचे काही नियम ज्याला लॉजिकच नसतं!

anupam kher and ranbir kapoor inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पालक आणि मुलं यांच्यातील संबंध जसे खूप प्रेमाचे असतात, तशीच आणखी एक गोष्ट अगदी हमखास घडत असते, ती म्हणजे खटके आणि लुटुपुटुची भांडणं, वाद! या वादाची अनेक कारणं असू शकतात, ज्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण कुठलं ठरत असेल, तर ते म्हणजे पालकांनी मुलांना घालून दिलेलं काही नियम…

हे नियम वर्षानुवर्षं पाळले जातात, पालक सांगतात म्हणून त्यांचं इमानेइतबारे पालन केलं जातंय असंही पाहायला मिळतं. पण सगळ्याच नियमांच्या मागे असणारे तर्क मात्र अनेकदा रुचत नाहीत.

‘हे असं का करायचं?’ या प्रश्नाचं मोठ्या माणसांकडे उत्तरच नसतं… आज जाणून घेऊयात असेच काही गमतीशीर नियम… तर काही नियम हल्लीच्या काळाशी सुसंगतच वाटत नाहीत.

 

 

आज असेच काही गमतीशीर आणि पूर्वापार चालत आलेल नियम जाणून घेऊयात. बघा तुम्हाला पटतंय का?

१. पाहुणे येतायत, नवे कपडे घाल…

घरी पाहुणे येतायत म्हणून नवे कपडे घालणं, यामागचं कारण पालकांना विचारून पहा, यामागे काही विशेष किंवा खास कारण मात्र तुम्हाला कधीच सापडणार नाही. बरं दिसावं एवढंच कारण असेल, तर ते तर धुतलेल्या कुठल्याही कपड्यांमध्ये शक्य आहे, नाही का?

 

 

२. शाळेत मन लावून अभ्यास करा म्हणजे झालं…

शाळेत मन लावून अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा म्हणजे पुढे मग मजाच मज्जा आहे, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. शाळा सोडून जसंजसं आयुष्य पुढे सरकू लागतं, तसं आयुष्यात पुढेच मोठ्या परीक्षा द्यायच्या आहेत हे कळत जातं. सांगा बरं हो की नाही?

 

 

३. अभ्यासात चांगले नसणाऱ्यांशी मैत्री करू नका

मित्र हे शेवटी मित्र असतात नाही का… ते चांगला अभ्यास करत नसतील, म्हणून चांगले मित्र किंवा चांगली माणसं बनू शकत नाहीत, असं कधीही नसतं.

 

 

४. वयाने मोठी असणारी व्यक्ती चुकीची असेल तरीही ऐकून घ्यावं

‘मोठ्यांना उलट उत्तर देऊ नये’ असं अनेक पालक आपल्या मुलांना सांगताना दिसतात. यात तसं पाहिलं तर चुकीचं काहीच नाही. मात्र असं असलं, तरी व्यक्ती वयाने मोठी असेल तरीही तिची चुकीची गोष्ट चुकीचीच ठरते. मग, ती चूक दाखवून देणं यात अयोग्य काय, असा प्रश्न हल्लीची तरुणाई करताना दिसते.

 

५.  मोठ्यांचा मान ठेवा

वयाने मोठी असणारी व्यक्ती चुकीची असूच शकत नाही, हे मानणं योग्य नाही तसंच केवळ ती मोठी आहे म्हणून तिला मान दिलाच पाहिजे या नियमावर सुद्धा हल्लीच तरुणाई प्रश्न करताना दिसते. यावर, ते मोठे आहेत म्हणून एवढंच उत्तर देण्यापलीकडे पालकही काहीच बोलू शकत नाहीत.

 

 

६. राजकारणापासून दूर राहा

राजकारण म्हणजे वाईटच, असं सांगणारे संस्कार अनेक पालकांकडून मुलांवर केले जातात. राजकारण म्हणजे फक्त आणि फक्त भ्रष्टाचार असं म्हटलं जातं आणि म्हणूनच राजकारणापासून दूर राहावं असं सांगितलं जातं.

 

 

७. पोलिसांच्या भानगडीपासून लांब रहा

राजकारणापासून दूर रहा, असं सांगणारे पालक पोलिसांच्या कुठल्याही भानगडीत पडू नका, असंही आपल्या मुलांना शिकवत असतात.  पोलिसांशी संबंध आला, म्हणजे आयुष्यात वाईटच घडणार, असं समजणं यात तसं पाहिलं तर काहीच तथ्य नाही.

 

 

८. आयुष्यात स्थैर्य हवं असेल तर लग्न करा

मुलांचं लग्नाचं वय झालं, की प्रत्येकच गोष्टीचा योग्य उपाय म्हणजे लग्न करणं, असंच काहीसं प्रत्येक पालक सांगू लागतात, नाही का? आता यात तथ्य किती ते तुम्हीच ठरवा…

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version