कट्टरपंथीय मुस्लिमांच्या टीकेला कंटाळून राष्ट्रपतींच्या कन्येचा शेवटी हिंदू धर्मात प्रवेश
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आज जगभरात अनेक प्रश्न आ वासुन उभे आहेत मात्र तरीदेखील एक प्रश्न सतत खदखदत असतो तो म्हणजे धर्माचा. जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? यावर अनेक जणांचे वेगवगेळी मत आहेत. हिंदूंच्या मते हिंदू हा सर्वात जुना धर्म आहे तर ख्रिश्चनानांच्या मते ख्रिश्चन हा जुना धर्म आहे.
आपला इतिहास बघता आशिया खंडात प्रामुख्याने हिंदू धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होता. आशियातील जे देश आज बहुसंख्य मुस्लिम आणि बौद्ध धर्मीय आहेत तिथे एकेकाळी हिंदू धर्माचा मोठा प्रभाव होता. आज हिंदू धर्माची मंदिर अगदी अफगाणिस्तानपासून ते कंबोडिया, इंडोनेशिया सारख्या देशात देखील अस्तित्वात आहेत.
परकीय आक्रमणे केवळ आपल्या भारतातच झाली नाही, तर आशियातील इतर देशात ही झाली. त्यातीलच एक राष्ट्र म्हणजे इंडोनेशिया! मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या देशात राष्ट्रपतींची मुलगी हिंदू धर्माचा स्वीकार करत आहे. काय नेमकी भानगड आहे चला तर मग जाणून घेऊयात…
इंडोनेशियाच्या पूर्व राष्ट्रपती सुकार्णो यांची मुलगी सुकमावती सुकार्णो ,येत्या २६ तारखेला म्हणजे उद्या हिंदू धर्मात प्रवेश करणार आहेत. बाली मधल्या सिंगुरजा या शहरात औपचारिकरीत्या धर्मांतर करणार आहेत. मूळच्या त्या मुस्लिम धर्मीय आहेत.
हिंदू धर्मात प्रवेश करण्यामागचं कारण :
सूकमवती यांना मुस्लिम धर्मातील काही गोष्टींबद्दल राग होता, त्या संदर्भातील कविता त्यांनी शेअर केली होती. त्याच कवितेवर मुस्लिम कट्टरपंथीयांनी चांगलीच टीकेची झोड उठवली. कवितेच्या विरोधात त्यांनी तक्रार देखील दाखल केली होती. त्यांच्या टिकेमागचं कारण म्हणजे त्यांच्या मते कवितेतून इस्लाम धर्माचा अपमान केला आहे.
–
- पाकिस्तानात चक्क एक ‘हिंदू’ महिला बनली आहे नागरी प्रशासक अधिकारी!
- काबूलमधला ‘शेवटचा हिंदू पुजारी’ जीव धोक्यात घालून तिथेच थांबलाय, कारण…
–
वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सुकमावती यांच्या आजी हिंदू धर्मीय आहेत. सुकमावती अनेक हिंदू धर्मीय सणांमध्ये सहभागी झाल्या आहेत. हिंदू धर्माचा त्यांनी अभ्यासही केला आहे. धर्मांतराच्या निर्णयावर त्यांच्या घरच्या मंडळींनी देखील त्यांचे कौतुक केले आहे.
कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया यासारख्या देशात हिंदू धर्माची मंदिरे पर्यटक आवर्जून बघतात. प्रामुख्याने तिकडच्या मंदिरांची स्थापत्यशैली विलोभनीय असल्याने अनेकजण त्या मंदिरांना भेटी देतात. मध्यंतरी गणपतीची प्रतिमा इंडोनेशियाच्या नोटेवर छापली गेली होती. एकूणच गणपतीची महती त्या देशात देखील आहे हे दिसून आले.
–
- “हिंदू-मुस्लिम लोकांचा डीएनए एकच” च्या निमित्ताने: हिंदुत्वाच्या व्याख्येचा पुनर्विचार
- हिंदू धर्मद्वेष्ट्यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही या मंदिरातल्या बाप्पाला धक्का लावू शकले नाहीत!
–
आज आपल्या देशात अनेक ठिकाणी जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या बातम्या येत असतात. मध्यन्तरी एटीएसने उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला पकडले होते, अतिरेकी कारवायांसाठी अनेक तरुणांचे धर्मांतर करून त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये दाखल करायचे.
आज आपल्या देशातील धार्मिक वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. देशाची वाट आता हिंदुराष्ट्राकडे होत चालली आहे त्यामुळे अल्पसंख्यांक असेल्या लोकांचं देशातील भविष्य काय? अशी चिंता अनेकांना पडली आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.