Site icon InMarathi

एका कॉलवर संपूर्ण माहिती देणाऱ्या या कंपनीचा ताबा आता अंबानी ग्रुपकडे असणार!!

ambani final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जर आपण बिझनेस टू बिझनेस सर्च इंजिन बद्दल बोललो तर जस्टडायलचे नाव प्रथम येते, आजच्या तारखेमध्ये या कंपनीने इतकी प्रसिद्धी मिळवली आहे की देशातील प्रत्येक व्यक्तीला तिचे नाव माहित आहे.

‘जस्ट डायल लिमिटेड’ हे भारतातील ‘अग्रगण्य लोकल सर्च इंजिन आहे. जस्ट डायल वेबसाईट, अण्ड्रोइड, आयओएस यांसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे टेलिफोनवर आणि एसएमएसद्वारे स्थानिक शोधसंबंधित सेवा पुरवते. विशेष गोष्ट म्हणजे आता या नावाशी आणखी एक प्रसिद्ध नाव जोडले जाणार आहे.

 

 

होय, मुकेश अंबानींची कंपनी ‘रिलायन्स रिटेल लिमिटेडने’ जस्ट डायलचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स जस्टडायल कंपनीमध्ये ४०.९५ टक्के भागभांडवल धारण केला आहे. एवढेच नव्हे तर रिलायन्स कंपनीच्या ओपन ऑफरअंतर्गत अतिरिक्त २६ टक्के हिस्साही घेईल.

आता तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे की जर मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इतक्या जास्त टक्केवारीसाठी ‘Justdial’ विकत घेते, तर कंपनीचे मूळ मालक कोण असतील? आणि का जस्ट डायल ही कंपनी अंबानी यांना विकत घ्याविशी वाटली असेल?

जस्ट डायलचे मूळ मालक आहेत ‘व्हिएस मणी!’ किंबहुना, मुकेश अंबानींची कंपनीचा जरी जस्ट डायलमध्ये सर्वात मोठा वाटा असला तरी, ‘व्हीएस मणी’ हे जस्ट डायलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहतील.

 

 

या विषयावर दोन्ही कंपन्यांमध्ये आधीच चर्चा झाली आहे. जस्ट डायलची स्थापना व्हीएस मणी यांनी केली आहे. व्ही.एस.मणी यांनी आपल्या मेहनतीने ही कंपनी कशी सुरू केली आणि ती आजच्या ठिकाणी कशी आणली ते जाणून घ्यायची तुम्हाला उत्सुकता नक्कीच असेल.

कारण ही काही कुठल्या सामान्य गोष्टीची सुरवात नव्हती तर दूरदृष्टीने पाहिलेले एक स्वप्न होते जे कष्ट आणि सातत्याच्या मदतीने पूर्ण झाले. या जस्ट डायलच्या कहाणी मागची कहाणी काय असेल बरे? तुम्हाला जाणून घ्यायचीय ? मग वाचाच ही ‘जस्ट डायल’ आणि व्हिएस मणी यांची यशोगाथा..

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मणी यांनी वयाच्या २९ व्या वर्षी फक्त पन्नास हजार (५०,००० ) रुपये भांडवल जमा करून ‘जस्ट डायल’ सुरू केली. जस्ट डायल हेच नाव का असावे बरे? तर मणी यांनी एका गॅरेजमध्ये भाड्याने घेतलेले संगणक आणि ६ कर्मचारी घेऊन जास्त डायलची सुरवात केली होती.

 

या कंपनीने एक असे सॉफ्टवेअर तयार केले होते की जे काही सेकंदात कोणत्याही डाटा बेसमध्ये सर्वात महत्वाची माहिती शोधू शकेल म्हणून ‘ जस्ट डायल.’ आपल्या एका मुलाखतीदरम्यान व्हिएस मणी यांनी सांगितले होते की जस्ट डायल आणि गुगलमध्ये तुम्ही समानता पाहू शकता पण आमची कंपनी गुगलच्या आधीच लॉन्च झाली होती. यानंतर, अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे, आज ही कंपनी देशातील लाखो लघु आणि मध्यम उद्योगांसाठी जाहिरातीचे माध्यम बनली आहे.

सुरवातीला मणी ‘युनायटेड डेटाबेस इंडिया’ नावाच्या ‘येलो पेजेस’ कंपनीत काम करायचे, तेव्हाच त्यांच्या मनात या प्रकारच्या कामाबद्दल कल्पना आली. त्या काळात त्यांनी विचार केला की जर टेलिफोनवरच असा डेटाबेस उपलब्ध असेल तर किती सुविधा उपलब्ध होतील.

यानंतर, त्यांनी ग्राहक आणि व्यवसायांना समान आवडी आणि गरजांशी जोडण्याच्या संकल्पनेसह, आपल्या काही मित्रांसह ‘AskMe’ लाँच केले. तथापि, काही वर्षांनंतरच हा उपक्रम बंद करावा लागला कारण त्यावेळी टेलिफोन खूप कमी जणांकडे होते आणि व्यवसायातील अर्थव्यवस्था देखील फारशी सक्रिय नव्हती. ‘

 

 

AskMe’ बंद झाल्यानंतर थोड्याच काळात एका मुलाखतीत मणीने सांगितले की आम्हाला AskMe च्या वापरासाठी चुकीचा नंबर मिळाला होता. लोकांना ‘AskMe’ बद्दल माहिती होती, पण जेव्हा तुम्ही त्यांना त्या क्रमांकाबद्दल विचारले गेले , तेव्हा त्यांना तो नंबर आठवत नसे .

१९९६ मध्ये त्यांनी ‘AskMe’ च्या कल्पनेवर पुन्हा काम सुरू केले. आतापर्यंत त्यांना त्यांच्या सर्व चुका माहित होत्या. या वेळी नवीन व्यवसायासाठी, त्यांनी ब्रॅंड नावापेक्षा फोन नंबरवर विशेष लक्ष दिले. आणि प्रयत्नपूर्वक मिळवलेला तो नंबर होता..’88888888′.

डेटाबेस तयार करण्यासाठी, जस्टडायलने मुंबईत घरोघरी जाऊन माहिती गोळा केली. आता कंपनीसमोर आणखी एक मोठे आव्हान होते की लोकांनी हा डेटाबेस कसा वापरावा? कारण त्यावेळी या उपक्रमाकडे जाहिरात करण्यासाठी पैसेही नव्हते.

 

 

याच कारणामुळे जस्टडायलच्या सुरुवातीच्या कर्मचाऱ्यांनी काही ग्राहकांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांची सेवा वापरण्यास सांगण्यास राजी केले. अशाप्रकारे जस्टडायल ने आपले काम सुरू केले.

लोक कंपनीच्या उत्पादनांचा सहज वापर करू शकत होते, त्यामुळे कंपनीने आपल्या उत्पादनांची किंमत खूप कमी ठेवली होती. हे सर्व असूनही, काही अधिशेष प्रत्येक महिन्याच्या शेवटी जमा होत असत.

कंपनीने या अतिरिक्त पैशांचा वापर विक्री कर्मचारी वाढवण्यासाठी केला. काळाच्या ओघात कंपनीची रचनाही बदलत गेली. कर्मचारी आणि फोन डिरेक्टरी वाढल्याने कंपनीने इंटरनेट आधारित मॉडेल स्वीकारले.

आता जस्ट डायलची मोबाईल सेवा सुद्धा उपलब्ध आहे. लोकांना सुरवातीला फोन नंबर नोंदवताना अडचण येत असे. त्यावर उपाय म्हणून कंपनीने लोकांना एसएमएस आणि ईमेल द्वारे नंबर पाठवायला सुरवात केली. आज या कंपनीचे मूल्यांकन सुमारे ६ हजार कोटी इतके आहे.

 

 

जस्ट डायलची स्थापना होण्यापूर्वी मणी यांनी खूप संघर्ष केला आहे. जस्ट डायलच्या संकल्पनेपासून ते आजच्या ६ हजार कोटींच्या स्वरूपापर्यंत व्हिएस मणी यांनी अनेक चांगले वाईट अनुभव घेतले आहेत. खूप गोष्टी पाहिल्या आहेत. जस्ट डायल सुरू करताना मणी टेलिफोन एक्स्चेंज च्या मॅनेजरल भेटले आणि आपली भन्नाट कल्पना सांगून एक खास नंबर देण्याची विनंती केली.

मॅनेजरला ही कल्पना आवडली आणि १९९६ साली 88888888 हा विशेष नंबर घेऊन जस्ट डायल या स्वप्नाची वाटचाल सुरू झाली. मणी म्हणतात की पॅशन हे व्यक्तीच्या यशाची दारे उघडणारी गुरुकिल्ली आहे.

आपल्याकडे पॅशन असेल तर पैसा आणि इतर गोष्टींची कमतरता असूनही आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. भारत सरकारच्या बदललेल्या टेलिकॉम पोलिसिचा जस्ट डायल ल फायदा झाला. टेलिफोन संख्या वाढल्यामुळे जस्ट डायलची देखील वाढ होत गेली आणि मोबाइल फोन आल्यानंतर तर जस्ट डायलचा व्यवसाय कैक पटींनी वाढला.

 

 

१९९९ मध्ये एक भारतीय गुंतवणूकदार मणी यांना भेटला. त्याची कंपनी अमेरिकन स्टॉक एक्सचेंजवर एनलिस्टेड होती. त्याने मणींसमोर प्रस्ताव ठेवला जस्ट डायल मधील गुंतवणुकीचा.

तो जस्ट डायलचे शेअर्स घेणार होता त्याबदल्यात मणी यांनी त्याच्या कंपनीचे शेअर्स घ्यावेत असा तो प्रस्ताव होता, ज्याला मणी यांनी स्पष्ट नकार दिला आणि संगितले की मला रोख रक्कम हवी आहे, तुम्ही रोख रक्कम दिलीत तर मी माझ्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला देवू शकतो, तेव्हा तुम्ही किती रक्कम देवू शकता? यावर त्या गुंतवणूकदाराने रोख रक्कम देण्याचे मान्य केले.

मणी यांच्यासमोर एक समस्या होतीच की रक्कम किती सांगायची? कारण कंपनीचे मूल्यांकन त्या गुंतवणूकदाराला सांगणे अडचणीचे ठरले असते. तेव्हा त्यांनी गुंतवणूकदारालाच विचारले की तो किती रक्कम गुंतवू शकतो. यावर गुंतवणूकदाराने त्यांना अडीच कोटी डॉलर इतक्या मोठ्या रकमेची ऑफर दिली ज्याला नाही म्हणणे, मणी यांना शक्यच नव्हते आणि अवघ्या तीन वर्षात मणी करोडपती झाले.

 

स्मार्ट फोन आल्यावर तर जस्ट डायल लोकांची लाईफ-लाइन बनली. कोणत्याही वस्तूपासून व्यक्तिपर्यंतचा शोध घ्यायचा असेल तर लोक जस्ट डायल ची मदत घेतात.

रीलायन्स’ आणि ‘जस्ट डायल’ मध्ये करार झाल्यानंतर रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेडच्या संचालक ईशा अंबानी यांनी संगितले की, व्हिएसेस मणी हे पहिल्या पिढीतील व्यावसायिक / उद्योजक असून त्यांनी त्यांच्या क्षमता आणि चिकाटीने एक मजबूत व्यवसाय उभा केला आहे.

आज कंपनीकडे Justdial च्या वेबसाइटवर सुमारे ३०४ दशलक्ष सूची आहेत आणि प्रत्येक तिमाहीत, त्याच्याकडे एकूण १२९.१ दशलक्ष वापरकर्ते आहेत.

मित्रांनो पैशन असेल आणि स्वप्न पाहण्याची तयारी असेल तर आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणूस यशाची शिखरे गाठू शकतो हेच आपल्याला जस्टडायल च्या कहाणी मागच्या कहाणीतून समजते. तुम्हाला जस्ट डायल ची ही यशोगाथा कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा आणि इनमराठीचे असे लेख अवश्य वाचत रहा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version