' कामाचं ठिकाणं आणि राहतं घर सुरक्षित आहे का? फायर ऑडिट आहे खूप महत्त्वाचं… – InMarathi

कामाचं ठिकाणं आणि राहतं घर सुरक्षित आहे का? फायर ऑडिट आहे खूप महत्त्वाचं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आज शहरीकरणामुळे टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. जिकडे बघावं तिकडे सिमेंटची जंगल उभारताना दिसत आहे. शहरालगतच असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे वाढते वायू प्रदूषण यामुळे एकूणच आपण पर्यावरणाचा ह्रास करत आहोत.

आजच मुंबईमधील एका टॉवरच्या दोन मजल्यांवर आग लागली, टॉवरच्या १९, २० मजल्यावर आग लागल्याने साहजिकच अनेकांची तारांबळ उडाली असणार. प्राथमिक माहितीनुसार तिकडच्या माणसांनी, वृद्धांनी लहान मुलांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी पोहचले. जेणेकरून मनुष्यहानी टळली, मात्र एका माणूस आगीत अडकला शेवटी जिवाच्या आकांताने त्याने थेट १९ व्या मजल्यावरून उडी मारली.

 

fire inmarathi
the hindu

मुंबईत आगीच्या घटना या आजकाल वारंवार घडताना दिसून येत आहे, मागे एका हुक्का पार्लरला आग लागली होती ज्यात काहीजण गुदमरून मृत्यूमुखी पडले. हुक्का पार्लरला बंदी असताना देखील त्याला परवाना कसा मिळाला यावरून अनेक वाद निर्माण झाले होते.

वारंवार घडणाऱ्या या गोष्टींवर आपण मात्र सर्रास दुर्लक्षित करतो मात्र हेच आपण दुर्लक्षितपणा आपल्या जीवाशी येतो. म्हणूनच आपण राहतो त्या वास्तूचे फायर ऑडिट करणे गरजेचे असते. जेणेकरून आगीसारखी घटना घडण्याची शक्यता कमी असते. नेमकं फायर ऑडिट म्हणजे काय आहे ते कस करतात चला तर मग जाणून घेऊयात…

 

fire inmarathi

 

फायर ऑडिट म्हणजे काय?

आज अनेक छोटेमोठे व्यावसायिक, नोकरदार वर्ग मार्च एन्ड आला की त्यांच्या चक्रा CA कडे जास्त वाढतात. जसे आपण आपल्या जमा खर्चाचे, व्यवसायाचे ऑडिट करतो तसेच आपण ज्या वास्तूत, बिल्डिंगमध्ये राहतो त्या जागेला आगीपासून धोका आहे का? आगीशी संबंधित समस्या किंवा भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्यापासून सुरक्षित करते अथवा पूर्वसूचना देतात.

 

fire audit 1 inmarathi
lokmat.com

 

फायर सेफ्टी ऑडिट कसे करावे?

आज फायर ऑडिट कंपन्या अस्तित्वात आहेत. एखाद्या कंपनीला जर आपण फायर ऑडिटचे कंत्राट दिले तर त्यांच्याकडील अनुभवी आणि तज्ञ लोकांची टीम येते.

फायर ऑडिटची संकप्लना ही नियमीत पद्धतशीरपणे केली जाते. यात प्रामुख्याने आगीला कारणीभूत असणाऱ्या घटकांचा अभ्यास केला जातो. संस्थेच्या अथवा वास्तूच्या फायर सिस्टिमचा ऑडीटर मंडळी सखोल अभ्यास करतात. त्याचा भर हा त्या भागातील आगीपासून बचावात्मक करणाऱ्या गोष्टींवर जास्त असतो. भारतातील अग्नीसुरक्षा ऑडिट हे एनबीसी सारख्या संस्थांनी घालून दिलेल्या नियमाच्या आधारवर केले जाते.

 

fire audit 2 inmarathi
omkar firewise

 

या ऑडिटमध्ये अनेक गोष्टी समाविष्ट असतात जसे की, लोकांच्या मुलाखती घेतल्या जातात, त्या वास्तूला भेट दिली जाते, त्याक्षणी काही अपघात घडल्यास त्या संकटातून बाहेर येण्यासाठीचे प्रात्यक्षिक दिले जाते. वास्तूचा अभ्यास निरीक्षण करून एक अहवाल तयार केला जातो.

रिपोर्ट :

फायर ऑडिटच्या रिपोर्टमध्ये सामान्यतः वर नमूद केल्या गोष्टींची मांडणी केलेली असते. तसेच यात मनुष्याचा जीव वाचवता येईल यावर भर दिला जातो. भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्यांची पूर्वसूचना देखील दिली जाते.

 

report inmarathi
the group

आज आग लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. टोलेजंग इमारती नसूट्या बांधून उपयोग नसतो तर एखादा प्रसंग उदभवला तर त्याला सामोरे जाण्यासाठी सुसज्ज यंत्रणा देखील आपल्याकडे असायला हवी. म्हणूनच वेळच्या वेळी फायर ऑडिट करणं गरजेचं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?