Site icon InMarathi

बालपणात घेऊन जाणाऱ्या या १० कार्टून्सपैकी तुम्ही कोणतं कार्टून मिस करताय?

cartoons featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

“किती वेळ टीव्हीसमोर चिकटून बसणार आहेस, अभ्यास कर!” हे वाक्य प्रत्येकाने त्याच्या बालपणी आई वडिलांच्या तोंडी नक्कीच ऐकले असेल, खासकरून ९० च्या काळातल्या मुलांच्या हातात सध्याच्या पिढीसारखे स्मार्टफोन्स नव्हते.

तेव्हाच्या मुलांसाठी विरंगुळाचे एकमेव साधन होते ते म्हणजे टेलिव्हिजन, अर्थात तेव्हा टीव्हीसुद्धा आजच्यासारखे स्मार्ट नव्हते, भरमसाठ चॅनल्स नव्हती, डझनावारी मालिका नव्हत्या, रीयालिटि शोज नव्हते. त्या काळात जे जे प्रोग्राम्स टीव्हीवर लागायचे ते दर्जेदार होते आणि त्यांचा फॅनबेस तुम्हाला आजही बघायला मिळतो.

याच काळातल्या लहान मुलांसाठी करमणुकीचे एकमेव चॅनेल होते ते म्हणजे कार्टून नेटवर्क. पोगो वगैरे चॅनेल्स खूप नंतर आली, पण ९० च्या दशकातल्या मुलांचे बालपण अधिक सुसह्य करण्यात कार्टून नेटवर्कचा सिंहाचा वाटा आहे.

 

 

आज आपण या लेखातून त्या काळातल्या अशाच काही कार्टून्सची माहिती घेणार आहोत. ही कार्टून्स आजही कित्येक लोकं इंटरनेटवर बघणं पसंत करतात, कारण या सगळ्या कार्टून्समध्ये एक गोष्ट खूप कॉमन होती ती म्हणजे निरागसता, आणि हीच निरागसता सध्याच्या युगात दुर्मिळ झालेली असल्याने आपल्यालाही पुन्हा या कार्टून्सची उजळणी करायलाच हवी.

१. Dexter’s Laboratory :

 

 

हे कार्टून म्हणजे त्या काळातलं advance कार्टून होतं. डेक्स्टरची प्रयोगशाळा आणि त्यातले त्याचे अतरंगी प्रयोग आणि त्या प्रयोगात कायम काहीतरी अडथळा आणणरी त्याची बहीण यांना विसरणं केवळ अशक्य आहे.

साय-फाय हा विषय इतका उतमपणे तेव्हा लहान मुलांच्या मनावर कोरला गेला की या कार्टूनसमोर आजची advance कार्टून्स फिकीच पडतील!

२. Courage The Cowardly Dog :

 

 

९० ची मुलं या कार्टूनमधले इफेक्ट आणि संगीत बघून नक्कीच घाबरली असली तरी हे कार्टून तेव्हा सगळेच आवडीने बघायचे. हॉरर प्लॉट आणि त्यात courage या भीत्र्या कुत्र्याची गोष्ट बघताना आजही पोट धरून हसायला येतं.

यातले त्या कुत्र्यासोबत राहणारं म्हातारं दाम्पत्य आणि त्यांची या कुत्र्यासोबतची जुगलबंदी बघताना तेव्हा खूप मजा यायची, यामुळेच लहान मुलांना भीती वाटली तरी ते हे कार्टून  कधीच चुकवत नसत.

३. The Scooby-Doo Show :

 

 

एका भीत्र्या कुत्र्याचं कार्टून फेमस होतं तर एक कार्टून असंही होतं ज्यात कुत्रा अगदी शार्प दाखवला आणि गुन्हेगारांना पकडण्यात अगदी तत्पर होता, अगदी बरोबर ओळखलं, ते कार्टून म्हणजे स्कूबी डू.

यातला तो कुत्रा आणि त्यांची डिटेक्टिव टीम ही आपल्याकडेसुद्धा असावी असं प्रत्येक लहान मुलाचं स्वप्न असायचं. या कार्टूनवर नंतर चित्रपटसुद्धा निघाला पण त्याला कार्टूनची सर कधीच आली नाही, आणि येणारही नाही!

४. Popeye: The Sailor Man :

 

 

त्या काळात कार्टूनमधून दाखवली जाणारी लव्ह स्टोरीसुद्धा कशी असावी तर पॉपायसारखी. कुठेही ड्रामा नाही, कुठेही बीभत्सपणा नाही. गोड गोंडस ऑलिव्ह, तिला पीडणारा ब्लूटो आणि पालक खाऊन ऑलिव्हला वाचवणारा पॉपाय आजही लोकं आवडीने बघतात. 

या कार्टूनचं विशेष महत्व असं होतं की हे कार्टून बघून तेव्हाची लहान मुलं पालेभाज्या आवडीने खायला लागली. तेव्हाचया कार्टून्सनी फक्त मनोरंजनच केलं नाही तर आयुष्यातले मोलाचे धडेसुद्धा दिले!

५. Tom And Jerry :

 

 

आज कित्येक लोकांसाठी स्ट्रेस बस्टर बनलेल्या टॉम अँड जेरीसाठी त्या काळातली मुलं शाळेतून धावत लवकर घरी यायची, कारण दुपारी किंवा संध्याकाळी लागणारं टॉम अँड जेरी मिस करणं म्हणजे खूप मोठं पाप असायचं.

मानवी वृत्तीचं प्रतिबिंब टॉम अँड जेरीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना” या तत्वावर चालणाऱ्या टॉम आणि जेरीने एक पिढी घडवली आहे असं म्हंटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही.

यावरसुद्धा सिनेमे आणि आणखीन animated series आल्या पण या ओरिजिनल कार्टूनची मजा कशातच आली नाही.

६. Richie Rich :

 

 

त्या काळातल्या प्रत्येक मुलाचे दोनच आदर्श होते एक म्हणजे पॉपाय आणि दूसरा म्हणजे रीची रिच. श्रीमंत लहान मुलगा आणि त्याचे adventures बघून तेव्हा कित्येक मुलं मोठेपणी रीची रिच सारखं व्हायचं ठरवत असे.

शिवाय कुठेही श्रीमंतीचा गैरवापर न करणारा आणि आपल्या चुकांमधून शिकणारा रीची रिच हा आजही कित्येकांचा आदर्श बनू शकतो!

७. Ed, Edd n Eddy :

 

 

२ क्रॅक मित्र आणि एक त्यांच्यासारखीच क्रॅक मैत्रीण यांच्याभोवती कथानक फिरणाऱ्या या कार्टूनमध्ये तुम्हाला या तिघांचे भन्नाट किस्से बघायला मिळतील.

अतरंगी विचित्र मित्रांची गोष्ट बघताना प्रत्येक एपिसोडच्या शेवटी आपल्या मनात प्रत्येकाबद्दल सहानुभूती निर्माण व्हायची.

८. Jungle Book (Mowgli) :

 

 

जंगल बुक म्हंटलं की गुलजारचे ते शब्द “जंगल जंगल बात चली है” आणि समोरून धावत येणारा मोगली हेच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.

जागतिक आकर्षणाचा विषय बनलेल्या या कथेवर भन्नाट सिनेमे आले आणि त्यांनी रेकॉर्डब्रेक कमाईसुद्धा केली. पण तरीही जंगल बुकच्या जुन्या कार्टूनच्या कित्येक आठवणी आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत.

पुस्तक, सिनेमे, सिरिजपेक्षाही जंगल बुक हे कार्टून स्वरूपात जास्त लोकांच्या लक्षात आहे हे त्रिभुवनातलं सत्य आहे!

९. पोकेमॉन :

 

 

कार्टून् जेव्हा डेवलप झाली, तेव्हाच्या काळातलं प्रत्येकाला वेड लावणारं कार्टून म्हणजे पोकेमॉन. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला या कार्टूनने वेड लावलं होतं. जंगलात वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी म्हणजे पोकेमॉन कैद करणारा एश आणि त्याची टीम आणि त्या पोकेमॉनची फाईट हे तेव्हा सगळेच टक लावून बघत असत.

यातला सर्वात लाडका पोकेमॉन म्हणजे पिकाचु, याच्या क्युटनेसवर लहान पोरं आणि तरुणीसुद्धा आजही फिदा आहेत.

नंतर या कार्टूनवरसुद्धा सिनेमा आला, तो तितका काही चालला नाही, पण याच कार्टूनवर आधारतीत स्मार्टफोनवर पोकेमॉन गो नावाचा गेम आला ज्यामुळे कित्येकांनी स्वतःचे प्राण गमावले, पण या गेमपेक्षाही अधिक मजा हे कार्टून बघताना येते हे कुणीही मान्य करेल!

१०. नॉडी, ओसवल्ड, पिंगू :

 

 

९० च्या दशकाच्या शेवटी जेव्हा बरीचशी कार्टून्स बंद झाली तेव्हा नॉडी, ओसवल्ड किंवा पिंगूसारख्या काही मजेशीर आणि निरागस कार्टून्सनी तेंव्हाच्या लहान मुलांचं बालपण तारलं.

सुंदर देखावे, श्रवणीय संगीत, कसलीही हिंसा नसलेलं आणि काहीतरी शिकवणारी ही कार्टून्स आजही लोकं प्रचंड आवडीने बघतात.

या कार्टून्सनंतर जणू या विश्वात एक पोकळी निर्माण झाली जी आजतागायत भरून निघालेली नाही, आज स्मार्टफोनच्या विश्वात सगळेच पबजीसारखे हिंस्त्र गेम्सकडे वळले आहेत, पण जीवनातील मूल्यं शिकवणारी निरागस कार्टून्स बघायला मिळणं दुर्मिळच झालंय!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version