हा “गायक” एकेकाळी फाटक्या चपलेने फिरायचा, एकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
प्रीत की लत मोहे ऐसी लागी … या ओळी कानावर पडताच, पुढचा ओळी तुम्ही गुणगुणायला सुरवात करताल. कैलाश खेरच्या मोहक आवाजाचा हा प्रभाव आहे.
आज कैलाश खेरचा मित्र नसता ज्याने त्याचा जीव वाचवला तर अल्लाह के बंदे बाहुबली मधील कोन हे वो, कहासे वो आया सारख्या अनेक हिट गाण्यांना संगीत पारखे झाले असते.
हिंदुस्थान टाईम्स च्या वृत्तानुसार, संगीत क्षेत्रामध्ये येण्या आधी कैलाश खेर ला नैराश्याने ग्रासले होते आणि खूप मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे जीव देण्याचा निर्णयापर्यंत आला होता.
जवळपास एक वर्ष तो नैराश्यामध्ये होता. जेव्हा कोणताच मार्ग दिसत नव्हता तेव्हा आत्महत्येचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात एका नदी मध्ये उडी देखील मारली, पण त्याच्या एका मित्राने त्याचा जीव वाचवला.
जाणून घेऊया त्याच्या आयुष्याबद्दल,
कैलाश खेर चा जन्म ७ जुलै १९७३ ला उत्तर प्रदेश मधील मेरठ मध्ये झाला. आज त्याचा आवाज तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालाय मात्र एकेकाळी हा आवाज कुणी ऐकायला तयार नव्हते.
कैलाशला संगीताचा वडिलांकडून वारसा मिळालेला आहे. त्याचे वडील पुजारी होते आणि त्यांच्या घरी होणाऱ्या कार्यक्रमात नेहमी पारंपारिक लोकगीते गायचे. कैलाश ने वडिलांकडूनच संगीत शिक्षण घेतले होते.
–
- ‘प्रति लता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गायिकेचा आवाज ‘लता’युगात दडपला गेला!
- वडिलांचा विरोध, गच्चीवर सराव ते एका कार्यक्रमाचे २२ लाख, संघर्ष दांडिया क्वीनचा!
–
कैलाशला संगीत आवडत असले कधीही बॉलीवूड गीते(SONGS) ऐकायला आणि गायला आवडत नव्हते. कैलाश १३ वर्षांचा झाला तेव्हा शास्त्रशुद्ध संगीत शिक्षणासाठी घरच्यांशी भांडून दिल्लीला गेला .
तिथे जाऊन संगीत शिक्षणा बरोबरच पैसे कमवण्यासाठी लहान मोठी कामे सुरु केली, शिवाय परदेशी लोकांना संगीत, गायन शिकवून पैसे मिळवत होता.
दिल्ली मध्येच असताना १९९९ मध्ये एका मित्रा सोबत निर्यात व्यवसाय(EXPORT BUSINESS) करायला सुरवात केली.
त्याच वर्षात या व्यवसायात एवढे आर्थिक नुकसान झाले की आपली सगळी पुंजी त्यात घालवली. या मुळे कैलाश ला नैराश्याने ग्रासले. त्याने एक जमिनीचा तुकडा (प्लॉट) विकत घेतला ज्या वेळी त्याचे आई वडील भाड्याच्या घरात राहत होते.
पण त्याने प्लॉट खरेदी केला कारण त्याला वाटले भविष्यात हा प्लॉट खूप पैसे मिळवून देईल आणि आपण मोठे होऊ. प्लॉट विकत घेतल्यावर मला स्वतः विषयी खूप गर्व वाटत होता. मात्र या प्रकरणात त्याला २२ लाख रुपयांचे नुकसान झाले.
यानंतर त्याला वाटले आपण वडिलांचा व्यवसाय करावा मात्र त्यातूनही तो नैराश्यातून बाहेर येऊ शकला नाही.
यातून कसे तरी बाहेर पडून पैसे कमवायला सिंगापूर आणि थायलंड ला गेला. सहा महिन्यांनी भारतात आला. परत आल्यावरही आत्महत्येचे विचार डोक्यातून जात नव्हते.
नंतर ऋषिकेश ला जाऊन काही दिवस राहिला तिथे त्याला समोर गंगा नदी दिसली आणि गेल्या वर्षभरात घडलेल्या गोष्टींचे विचार त्याचा मनात आले आणि त्याने नदीत उडी मारली.
बाजूलाच त्याचा मित्र काठावर उभा होता त्याला वाटले कैलाश पाय घसरून पडला आणि त्याला वाचवायला त्याने नदीत उडी मारली आणि त्याचा जीव वाचवला.
`त्या नंतर तो तिथेच राहून साधू संतांसाठी गाणे म्हणू लागला. कैलाश चे गाणे ऐकून संत नाचायला लागायचे यामुळे त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला आणि तो मुंबईला गेला.
–
- जुहू बीचवर, एका रात्री, सिगरेटच्या पाकिटावर लिहिलं गेलं देवआनंदचं सुप्रसिद्ध गाणं…
- ‘भिगे होठ तेरे’ या गाण्यानंतर, आपलं करियर संपणार, असं या गुणी कलाकाराला का वाटलं?
मुंबई ला गेल्यावर देखिल गरीबीचे दुष्टचक्र संपले नाही, तिथेही खूप दिवस गरिबीत काढले .
त्याच्याकडे पायात घालायला चप्पल ही नसायची. बऱ्याचदा अनवाणी अथवा फाटकी चप्पल घालून वेग वेगळ्या स्टुडिओच्या चकरा मारायचा याच उद्देशाने कुणीतरी त्याचा आवाज ऐकून गाण्याची संधी देईल.
एके दिवशी संगीतकार राम संपत ने कैलाश खेर ला एका जाहिराती चे जिंगल गाण्यास बोलावले आणि त्या कामाचे त्याला ५००० रु दिले . त्या वेळी ५ हजार रूपये त्याच्यासाठी खूप मोठे होते आणि काही दिवस त्याचे काम चालून गेले.
त्या नंतर किती तरी वर्ष त्याचे स्ट्रगल सुरु राहिले आणि अंदाज सिनेमात त्याला गाण्याची संधी मिळाली. त्यामध्ये रब्बा इश्क ना होवे हे गाणे त्याने गायले.
कैलाश चे नशीब तेव्हा फळफळले जेव्हा त्याला “वैसा भी होता हे” सिनेमात अल्लाह के बंदे हे गाणे गायले. हे त्याचे आजवर चे सर्वात हिट गाणे ठरले.
कैलाश खेर ने त्या नंतर मागे वळून पहिलेच नाही, त्याने आजवर अठरा भाषात गाणे गायले. तर बॉलीवूड मध्ये ३०० पेक्षा जास्त गाणी गायली. कैलाश ने २००९ साली लग्न केले आणि आज त्याला मुलगा आहे. ज्याचे नाव कबीर ठेवले.
आज आत्महत्येच्या प्रयत्नाला जवळपास १८ वर्ष उलटून गेल्यावर चक दे फटटे गायक सांगतो की आयुष्य संपविण्याचा निर्णय हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती.
आज जर मी माझ्या २८ वर्षांच्या स्वतः ला भेटायला गेलो जो आयुष्य संपवायला निघालाय, तर मी त्याला थांबवेल आणि सांगेल माझा जीव घेण्याचा तुला काहीही अधिकार नाहीये.
मला भविष्यात काय घडणार हे ठरविण्याचा अधिकार नसेल तर मला माझा जीव देण्याचाही अधिकार नाही. माझी नियती आणि माझी जाण्याची वेळ हा सर्व शक्तीमान परमेश्वरच ठरवू शकतो.
आज कैलाश ला कित्येक पारितोषिके मिळाली, फना सिनेमातील चांद सिफारिश या गाण्यासाठी त्याला उत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला तर २०१७ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले .
तर मित्रांनो यावरून आपण एक बोध घेऊ शकतो, कितीही वाईट परिस्थिती आली तरी डगमगून जाता कामा नये.
चार्ली चाप्लीन चे एक प्रसिद्ध वाक्य आहे जगात कोणतीही गोष्ट कायम नसते, अपयश सुधा नाही (nothing is permanent in the world, not even failures) परिस्थितीला धीराने तोंड दिले तर आपणही एक ना एक दिवस यशस्वी होणारच.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.