' ‘फूड’ नुसार बनतो तुमचा ‘मूड’! हे पदार्थ खा आणि आनंदी राहा… – InMarathi

‘फूड’ नुसार बनतो तुमचा ‘मूड’! हे पदार्थ खा आणि आनंदी राहा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

उत्तम आयुष्य जगायचं असेल, तर अधिकाधिक काळ आनंदी असणं गरजेचं आहे. आनंदी राहायचं म्हणजे मूड ठीक हवा. कुठल्याही व्यक्तीचा मूड हा काही फक्त त्याच्यावर अवलंबून नसतो. आयुष्यातील अनेक बाबी मूड कसा राहील यावर नियंत्रण ठेवत असतात.

आजूबाजूला काय घडतंय, आजूबाजूचे लोक कसे आहेत, वातावरण कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम मूडवर हमखासपणे होतो. पण जर तुम्हाला कुणी असं सांगितलं, की तुम्ही काय खाताय त्यावरही तुमचा मूड अवलंबून असतो, तर काय वाटेल तुम्हाला? पण मंडळी हे खरं आहे. आज जाणून घेऊयात की आपल्या आहारातील गोष्टींचा मूडवर कसा आणि काय परिणाम होऊ शकतो?

 

indian-girl-with-junk-food-inmarathi

 

‘फूड’ आणि ‘मूड’ यांचा परस्पर संबंध…

पचनसंस्था आणि मेंदू यांचा परस्परांशी संबंध आहे असं म्हटलं जातं. याचं कारण असं, की पचनसंस्थेच्या माध्यमातून बॅक्टेरिया आणि व्हायरससारखे सूक्ष्मजीव शरीरात प्रवेश करतात. याचा परिणाम मेंदूपर्यंत जाणाऱ्या सूचनांवर होतो. परिणामी मेंदूचं कार्य नीट होत नाही. आता मेंदू नीट काम करत नाही, म्हणेजच तुमच्या मूडवर परिणाम होणार हे नक्की आहे ना?

अन्नामुळे काय होतं?

योग्य अन्नग्रहण केल्यामुळे शरीराला आवश्यक असणारे बॅक्टेरिया निर्माण होतात. ज्यामुळे मेंदूचे कार्य उत्तमरित्या सुरु राहू शकते. थोडक्यात काय, तर तुम्ही काय खाताय यावर तुमचा मूड अवलंबून असणार हे तर नक्की… चला तर मग बघूयात, की कुठले पदार्थ मूडवर कशाप्रकारे परिणाम करू शकतात.

 

happy mood with food inmarathi

 

१. फळं आणि भाज्या

फळं आणि भाज्या यांच्यामधून मोठ्या प्रमाणात फटीवर मिळतं. ज्यामुळे आतड्याचे कार्य योग्यरितीने चालण्यास मदत होते. शरीराला आवश्यक असणारे बॅक्टेरिया निर्माण होतात. म्हणजेच, वर म्हटल्याप्रमाणे मेंदूचे कार्य उत्तमरीतीने चालते.

फळांमधून मिळणारी व्हिटॅमिन्स, मिनरल्स यामुळे मेंदू ताजातवाना राहण्यासही मदत होते. म्हणूनच तुमचा मूड उत्तम राहातो.

 

fruits inmarathi

 

२. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दही हे अनेक गोष्टींसाठी उत्तम औषध आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. दह्यामुळे पचनप्रक्रिया चांगली राहते, हे तर सगळ्यानांच ठाऊक असते. दह्यात असणारे बॅक्टेरिया हे शरीराला हवे असणारे चांगले बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत होऊन मूड छान राहतो.

 

curd inmarathi

३. मशरूम

‘व्हिटॅमिन डी’चा मुख्य स्रोत सूर्यप्रकाश हा असला, तरीही मशरूमसारख्या काही खाद्यपदार्थांमधून ‘व्हिटॅमिन डी’ मिळू शकते. ‘व्हिटॅमिन डी’ पुरेशा प्रमाणात मिळालं तर मूड छान राहण्यास मदत होते.

 

mushroom inmarathi
snaped.fns.usda.gov

 

४. डार्क चॉकलेट, कोको, ड्राय फ्रुट्स

मिनरल्सची कमतरता हे नैराश्याचं महत्त्वाचं कारण ठरू शकतं. डार्क चॉकलेट, कोको, ड्राय फ्रुट्स अशा गोष्टी मिनरल्सचा उत्तम स्रोत आहेत. अशा पदार्थांचा आहारात समावेश असणं, नैराश्यापासून दूर राहण्यास मदत होते.

 

girl eating dark chocolate

 

५. मासे आणि मांस

मांस आणि मासे हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. प्रथिनांचा पुरेसा पुरवठा झाला, तर मेंदूला हवी असणारी गरजेची रसायनं मुबलक प्रमाणात मिळतात. हे घडल्यामुळे मेंदू फ्रेश आणि पर्यायाने तुमचा मूड फ्रेश!

 

fish 4 inmarathi

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?