Site icon InMarathi

रिमिक्स-रिमेकचा ट्रेंड सुरु होण्याआधी आलेल्या या ८ गाण्यांनी सर्वांना लावलं होतं वेड

remake inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

२०२० या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवलं. जुन्या गोष्टींचं महत्त्व या काळात नव्याने पटलं. घरी सगळे एकत्र होते, त्यामुळे जुन्या गोष्टी नव्याने पहिल्या गेल्या. टीव्हीवर सुद्धा जुन्या मालिका दाखवण्यास सुरुवात झाली आणि सगळ्यांनाच ‘नॉस्टॅल्जिक’ वाटलं.

आपला मूड कोणताही असला, तरीही काही गाणी ही एव्हरग्रीन असतात. ती गाणी काळाच्या ओघात नष्ट होत नाहीत. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात.

९०चं शतक सुद्धा अशाच काही पॉप साँग्सनी गाजवलं. पॉप साँग्स म्हटली की डोळ्यांपुढे काही ठराविक इंग्लिश गाणी येतात, पण काही हिंदी गाण्यांनी देखील लोकांना अक्षरशः वेड लावलं.

रिमिक्स आणि रिमेकच्याही आधी या १२ नॉन फिल्मी गाण्यांनी ९० ची अख्खी पिढी घडवली, वाढवली! बघूया अशीच एव्हरग्रीन हिंदी पॉप सॉंग्स.. 

मैने पायल हैं छनकाई –

 

 

फाल्गुनी पाठक हे नाव म्हटलं, की डोळ्यांपुढे येतो केसांचा बॉबकट असलेला, जॅकेट घातलेला आणि हातात माईक धरलेला उत्साही चेहरा. नवरात्रीत फाल्गुनी पाठकच्या गाण्यांची धूम सगळीकडे असते.

पण ही गाणी एवढी लोकप्रिय झाली, की फक्त नवरात्रीतच नाही, तर घराघरांत कॅसेट स्वरूपात स्वरूपात ही गाणी पोहोचली आणि ऐकू येऊ लागली.

तुनुक तुनुक तू ..-

 

 

जगात कुठेही जा, कितीही फॅन्सी, पॉप गाणी ऐका, पण शेवटी नाचण्यासाठी पंजाबी गाणीच बेस्ट. नव्व्वदच्या शतकात लंडनमध्ये देखील अनेक पंजाबी राहायला गेले आणि तिथेही पंजाबी गाण्यांनी धूम मचवली.

दलेर मेहदी या गायकाने पंजाबी गाण्यांना नवीन तडका दिला. तुम्हीही या गाण्यात त्याने केलेल्या स्टेपची प्रॅक्टिस केली असेलच, हो ना?

मुझको भी तू लिफ्ट करा दे –

 

 

अदनान सामीला इतक्या प्रचंड स्पीडने पियानो वाजवताना बघून संपूर्ण तरुणाईला अक्षरशः वेड लागलं. या गाण्यात गोविंदाच्या एंट्रीनेही धमाल उडवली होती. एव्हाना तुम्हीही त्या काळात जाऊन हे गाणं गुणगुणायला लागले असाल.

मेड इन इंडिया – 

 

 

अलिशा चिनाई हे नाव आठवतंय? ९०च्या शतकातल्या प्रत्येकाची ही आवडीची पॉप सिंगर असेल. तिच्या ‘मेड इन इंडिया’ या गाण्याने अनेकांची मनं जिंकली. आणि या गाण्याची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या गाण्यामुळे मिलिंद सोमण तरुणींमध्ये पॉप्युलर झाला.

तन्हा दिल –

 

 

या गाण्यात रस्त्यावरून एकटाच चाललेला, आठवणींमध्ये रमलेला ‘शान’ आठवतोय? या गाण्याने तरुणाईला एक चार्मिंग आवाज दिला. आजही हे गाणं आपल्या सगळ्यांच्या मनात वसलंय.

परी हूं मैं –

परी हूं मैं, हे खरंतर सुनीता राव यांनी गायलेलं आहे. पण फाल्गुनी पाठक यांच्यामुळे ते ‘गरब्याचं गाणं’ म्हणून फेमस झालं, असं म्हणता येईल.

 

 

फाल्गुनी पाठक यांनी गरबा नाईट्समध्ये सादर केलेली गाणी नवरात्रीतून घरातील रेडिओपर्यंत कधी पोहोचली हे कळलंच नाही. हिंदी पॉप गाण्यांमध्ये हे गाणं ‘टॉप थ्री’मध्ये नक्की असेल.

तुम तो ठेहरे परदेसी –

 

 

त्या काळातलं हे प्रसिद्ध ब्रेकअप सॉंग असेल. या गाण्याहूची तेव्हा एवढी क्रेझ होती, की कोणत्याही ट्रिपला किंवा मित्र- मैत्रिणी एकत्र भेटले, तरीही या गाण्याचा उल्लेख व्हायचाच.

या गाण्याच्या लोकप्रियतेमुळे अल्ताफ राजाने या गाण्याचे पुढे व्हर्जनदेखिलप आणले, पण ते एवढे सुपरहिट ठरले नाही.

ओ सनम –

 

 

९०चा काळ लकी अलीचा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लकी अलीच्या गाण्यांची तरुणाईला चांगलंच वेड लावलं. ‘ओ सनम’ हे गाणं त्याचंच उत्तम उदाहरण आहे.

तुम्हालाही अशी कोणती गाणी आठवतायत का? लगेच कमेंट करून आम्हालाही सांगा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version