जिलेबी आणि दूध या भन्नाट कॉम्बिनेशनचे हे फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
मित्रानो दिवाळी जवळ आली आहे, प्रत्येकाच्या घरी दिवाळीच्या तयारीसाठी लगबग असेल. दिवाळीच कशाला आपल्या देशात कोणताही सण किंवा कार्यक्रम गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. काहीना काही गोड बनवायचं किंवा विकत आणून आधी देवाला नैवेद्य दाखवून मगच खायचं ही आपल्या देशाची जुनी परंपरा आहे.
मिठाई सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट आहे. जिलेबी ही आपल्याकडची अतिशय चवदार, मूड ताजातवाना करणारी मिठाई आहे. त्यात थंडीच्या दिवसात गरमा गरम जिलेबी खायला मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणायला हवं.

आपल्याकडे दूध हे पूर्ण अन्न समजल जात.म्हणूनच बाळ जन्माला आल्यावर सहा महिने फक्त दुधावर पोसले जात असावं. दुधामध्ये कॅल्शिअम आणि प्रोटीन खूप प्रमाणात असल्यामुळे हाडांना मजबुती देतं. शिवाय दुधाच्या सेवनामुळे शारीरिक प्रकृती उत्तम रहाते.
काही लोकांना गार दूध पिण्याची सवय असते,पित्ताचा त्रास होत असेल तर,किंवा पोटात रखरख होत असेल तर कधी कधी गार दूध प्यायल्याने आराम मिळतो पण नेहमीच्या सेवनासाठी दूध गरम असायला हवे कारण तेच जास्त फायदेशीर आहे, अस काही तज्ञांच म्हणणं आहे.त्यामुळे रोज रात्री गरम दूध पिऊन झोपणे शरीरासाठी चांगले असते,तसा सल्ला डॉक्टर सुद्धा देतात.
–
- नुसतं दूध नव्हे तर दुधात ‘हे’ १० पदार्थ घालून प्याल तर “इम्युनीटी” कित्येक पटींनी वाढेल!
- या ७ टीप्स वापरल्यात तर गॅसवर ठेवलेलं दूध कधीही ऊतू जाणार नाही
–
जिलेबी म्हणल की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आल्यावाचून राहणार नाही. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील जेठालाल मुळे जिलेबी फाफडा सगळ्यांच्या घरा घरात पोहचला आहे. पण खूप लोकांना हे माहीत नसेल की जिलेबी ही फक्त मिठाई नसून अनेक फायदे देणारी, तसेच काही आजारांसाठी उपयुक्त ठरणारे औषध आहे. वाराणसी अलाहाबाद शहरातील लोकांच्या नाश्त्यामध्ये दूध आणि जिलेबीचा समावेश असतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जिलेबी आणि गरम दुधाच्या सेवनामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊयात याचे फायदे..

डोकेदुखीला उत्तम पर्याय :
कोणत्याही प्रकारची डोकेदुखी जिलेबी आणि दुधाच्या सेवनामुळे दूर होते. विशेषतः मायग्रेन म्हणजेच अर्धशिशी (अर्ध डोकं दुखणं) याचा ज्यांना त्रास होतो. अशा लोकांनी रोज नाश्त्याच्या वेळी जिलेबी आणि दूध घेण्याने डोकेदुखी कायमची बरी होते. त्यांच्यासाठी हे रामबाण औषध आहे. तसे एकाग्रता वाढण्यास सुद्धा मदत होते.
वजन वाढण्यास मदत होते :
जिलेबी मध्ये साखर असल्यामुळे काही लोक वजन वाढेल या भीतीपोटी गोड खाणे टाळतात,पण जिलेबी मध्ये साखरेबरोबर खूप कॅलरीज,चरबी जन्य पदार्थ असतात ज्या वजन वाढीसाठी मदत करतात. त्यामुळे ज्यांची तब्येत किरकोळ आहे, किंवा प्रयत्न करूनही ज्याचं वजन वाढत नाही अशा लोकांनी रोज एक ग्लास दुधा सोबत जिलेबी खावी त्यामुळे वजन वाढीसाठी मदत होते.

ताण तणावातून मुक्तता :
जिलेबी आणि दूध खाण्याने ताण तणाव दूर होण्यास मदत होते.जिलेबी मध्ये ताण कमी करणारे प्रथिने असतात, त्यामुळे तणाव निर्माण करणारे हॉर्मोन्स कमी करण्यास जिलेबी मदत करते. शारीरिक ताण,थकवा दूर करते.
श्वसना संबंधीत आजारांवर फायदेशीर :
श्वसन संबंधी सगळ्याच आजारांवर जिलेबी उत्तम औषध आहे. दमा,सर्दी,खोकला यासारख्या आजारांवर दूध आणि जिलेबी खाल्ल्याने आराम मिळू शकतो.

मधुमेहींसाठी फायदेशीर :
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे असे लोक गोड खाणे टाकतात पण तज्ज्ञांच्या म्हणाण्यानुसार मधुमेह असलेल्या लोकांसाठी दूध आणि जलेबी हे “सुपरफुड” च काम करते, कारण त्यामध्ये साखरे सोबत कॅलरीज पण मिळतात. पण याच अतिरिक्त सेवन त्रासदायक ठरू शकते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने च याच सेवन करावं.
–
- ही १२ लक्षणे म्हणजे मधुमेहाची सुरुवात असू शकते, नक्की वाचा आणि मात करा!
- सर्दी खोकल्यापासून मधुमेहापर्यंतच्या व्याधींवर गुणकारी अशा “ह्या” तेलाचे १० फायदे वाचा!
–
तर अशी ही जिलेबी आणि दुधाची अफलातून मिलाप खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे तर होतातच शिवाय मन ताजेतवाने, टवटवीत राहते. मग वाट कसली पाहताय तुम्ही खा, इतरांनाही खाऊ घाला आणि मस्त रहा,निरोगी राहा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.