आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
स्टारकिड्स म्हटलं की हल्ली अनेकांचा संताप अनावर होतो. केवळ पालकांच्या पुण्याईमुळे प्रसिद्ध होणारी, खऱ्याखुऱ्या गुणवंत नवख्या कलाकारांना केवळ आपल्या आडनावाच्या बळावर मागे टाकणारी, प्रसिद्धी, पैसा यांचा ‘माज’ असणारी आणि अजाणत्या वयातच मिळालेल्या सत्तेचा उपभोग घेणारी स्टारकिड्स हेच चित्र सध्या बॉलिवूडमध्ये अधोरेखित होत आहे.
काही स्टारकिड्स या अपवाद आहेत यात शंका नाही, मात्र या स्टारकिड्सच्या नेपोटिझमने भल्याभल्यांना हरवलं, नमवलं हे ही नाकारता येणार नाही.
ड्रग्सच्या विळख्यात अडकलेला आर्यन खान असो वा यापुर्वीच नेपोटिझमचा शिक्का बसलेले आलिया भट, वरुण धवन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांसारखी बॉलिवूडची पिल्लावळ… प्रत्येक स्टारकिडने काही ना काही राडा घालत बॉलिवूड गाजवलं.
२ ऑक्टोबरपासून गजाआड असलेल्या आर्यन खानमुळे आता अनेक स्टारकिड्स एनसीबीच्या गळाला लागणार का? अशी शंका व्यक्त केली जात आहे, कारण खान कुटुंबापाठोपाठ आता ‘पांडे’ कुटुंबाच्या घरीही एनसीबीने धाड टाकून अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावले आहे.
ड्रग्स प्रकरणाबाबत ही चौकशी होणार असली तरी दारू, व्यसन, ड्रग्स, अश्लिल चाळे या सर्वांमध्ये रमणारे स्टारकिड्स बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये असा काही धिंगाणा घालतात की सिनेमांमध्ये आदर्श भूमिका करणाऱ्या पालकांची हीच ती मुले का? असा प्रश्न पडावा.
खरं वाटतं नाहीये? मग स्टारकीड्सच्या पार्ट्यांचे हे फोटोज तुमची झोप उडवतील. वय, ठिकाण अशा कशाचीही तमा न बाळगता केवळ पैसा, प्रसिद्धी, सत्ता यांच्या नशेच बुडालेल्या या स्टारकिड्सच्या पार्ट्यांचे हे काही क्षण…
१. आर्यन खान
मुंंबई-गोवा क्रूझवरील पार्टीत तो प्रमुख पाहूणा म्हणून गेला आणि तिथेच फसला. रेव्ह पार्टीतील त्याच्या सहभागामुळे तो गेले १७ दिवस तुरुंंगात आहे, मात्र ड्रग्स आणि आर्यन हे कनेक्शन काही नवं नाही.
यापुर्वीच्या अनेक पार्ट्यांमध्ये तो नशेत तर्र झालेल्या दिसून आलाय.
व्यसनांसह तरुणींमध्ये रमणारा आर्यन प्रत्येक पार्टीत नव्या मुलींसोबत दिसतो.
२. सुहाना खान
भावाचा आदर्श समोर ठेवत बहिण सुहानाही प्रत्येक पार्टीत टल्ली होते. स्टारकिड्च्या पार्ट्या सुहाना नसली तर मजा नाही असंही अनेकजण म्हणतात. कारण दारू पिऊन बेधुंदपणे नाचणारा सुहाना अनेकांनी पाहिली आहे.
एरवी नाईट पार्ट्यांमध्ये दंग असलेली सुहाना दिवसा पूल पार्टीत बिकीनी घालूनही मिरवते.
३ अनन्या पांडे
आर्यन पाठोपाठ अनन्याही आता एनसीबीच्या रडारवर आहे. मात्र यापुर्वीही अनन्याचा जलवा अनेक पार्ट्यांमध्ये दिसून आला आहे. घरापेक्षा पार्ट्यांमध्ये रमणारी अनन्या वेगवेगळ्या वेशभुषांसह पार्ट्यात दाखल होते.
मैत्रिणींसह धिंगाणा करणारी अनन्या टकीला शॉट्स हाती घेऊनही मिरवते.
–
फाजील आत्मविश्वास नडला: १८०० जणांमध्ये NCB ने आर्यनलाच पकडलं कारण…
NCB चे काम काय असते? रेड टाकण्याची नेमकी पद्धत काय आहे? जाणून घ्या
–
४. नव्या नवेली नंदा
बिग बी अर्थात अमिताब बच्चन यांची कन्या श्वेता नंदा हिची मुलगी नव्या नवेली नंदा! दिल्लीतील प्रसिद्ध उद्योगपती कुटुंबातील लाडकी लेक! एकीकडे बीग बी आपल्या भुमिकांतून आदर्श व्यक्तीमत्वाचे दाखले देत असताना दुसरीकडे त्यांची ही नात दिल्लीच नव्हे तर मुंबईतील पार्ट्यांमध्ये दंग असते.
वयाच्या सोळाव्या वर्षापासून हातात ग्लास आणि पार्टीतील म्युझिकवर थिरकणारी नव्या दिसून आली आहे.
कधी मित्र, कधी बॉयफ्रेन्ड तर कधी सारा अली खान सारखे इतर स्टारकिड्स… नव्या अनेकांसोबत पार्टीत धुंद असताना यापुर्वीही दिसली आहे.
५, शनाया कपूर
संजय कपूरची मुलगी शनाया कपूरही पार्ट्यांमध्ये व्यस्त असते. कपूर खानदानातील अनेक स्टारकिड्ससह प्रत्येक विकेंडला हमखास पार्टी करणारी शनाया कधी तोकडे कपडे तर कधी समुद्रावरील बीच पार्टीत बॉयफ्रेन्डसह रमलेली दिसते.
६. अलाया एफ
अभिनेत्री पुजा बेदीची लाडकी कन्या अलाया एफ हिने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र एरवी अलाया बी टाऊन पार्ट्यांमध्ये आपला जलवा दाखवते.
केवळ मित्रांसह नव्हे तर आई पुजा बेदीसह अनेकदा हातात ग्लास धरून आलाया दिसली आहे. पालकांकडूनच अशा प्रकारची शिकवण मिळत असेल तर मग मुलांबाबत काय बोलणार?
७. सिद्धांत कपूर
आर्यन खान तर सुटला पण आता शक्ति कपूरचा मुलगा सिद्धांत कपूर या ड्रग्सच्या विळख्यात सापडला आहे. एका रेव पार्टी गेला असून तिथे त्याची ड्रग्सची चाचणी पॉजिटिव आली आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सिद्धांत कपूरचं तसं पहायला गेलं तर अजून करियर सुरू ही नाही झालं आणि तो अडकला. श्रद्धा कपूरचा भाऊ आणि शक्ति कपूरचा मुलगा एवढीच त्याची ओळख आहे.
एकंदिरत चित्रपटातून कलाकार आदर्श व्यक्तीमत्व, सद्गुणी व्यक्ती, चांगले चारित्र्य यांचे धडे देतात. अनेकजण त्यांना आपला आदर्शही मानतात. मात्र दिव्याखाली अंधार याप्रमाणे स्वतःच्या घरात नेमकं काय चाललंय? आपली मुलं काय करत आहेत? ते कोणत्या वाईट संगतीत आहेत का? याकडे पहायला पालकांना वेळच नसतो. किंबहूना अशा पार्ट्या करणा-या मुलांचं पालकांकडूनच कौतुक होत असेल, त्यांना पाठींबा दिला जात असेल तर यात चुक नक्की पालकांची की मुलांची?
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.