Site icon InMarathi

१२ व्या वर्षीच देशाच्या क्रिकेट संघाला तिने दिली नवी ओळख! जगभर सुरु आहे चर्चा…

rebecca downie and scotland team inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बारा वर्षं हे तर खेळायचं आणि मजा करण्याचं जग वय! दुनियादारी समजून घेण्याची नुकतीच सुरुवात झालेली असते, असंच म्हणायला हवं. जगाचा कारभार कसा चालतो हेदेखील कळलेलं नसतं, असं ते कोवळं वय…

अशा या कोवळ्या वयात स्कॉटलंडच्या एका मुलीने चक्क देशाच्या क्रिकेट संघाची एक नवी ओळख निर्माण केली आहे. ओळख निर्माण केली म्हणजे काय, असं म्हणत असाल तर थांब की जरा, त्याबद्दलच सांगतोय.

 

 

निळा रंग म्हणजे भारत, हिरवा म्हणजे पाकिस्तान, पिवळा म्हणजे ऑस्ट्रेलिया, काळा म्हणजे न्यूझीलंड, बरोबर ना मंडळी? थोडक्यात काय, तर क्रिकेट संघाची जर्सी ही त्या संघाची ओळख असते. १२ वर्षाच्या रिबेका डाऊनी हिने स्कॉटलंड क्रिकेट संघाची वर्ल्डकप जर्सी डिझाईन केली आहे.

स्कॉटलंडच्या संघाने वर्ल्डकपची दमदार सुरुवात केली. पात्रता फेरीत बांगलादेशचा धुव्वा उडवत पहिल्याच दिवशी वर्ल्डकपमध्ये अपसेट घडवला. या स्कॉटलंडच्या संघाची आकर्षक जांभळी जर्सी तुम्हाला नक्की आठवत असेल ना?

ही जर्सी बघून खरंच असं वाटतंय का, की ती एका १२ वर्षीय मुलीने बनवली असेल? नाही ना? पण हे खरंय… स्कॉटलंडच्या क्रिकेट संघानेच हे जाहीर केलंय.

 

२०० शालेयवयीन विद्यार्थ्यांकडून या जर्सीच्या डिझाईनसाठी एंट्री आल्या होत्या. हा जांभळा रंग म्हणजे स्कॉटलंडच्या नॅशनल एम्ब्लेमचा भाग आहे. या रंगांचा उत्तम वापर करून रिबेकाने एक छान जर्सी तयार केली, जी २०० जणांमधून सर्वोत्तम ठरली आणि तीच जर्सी परिधान करून आज स्कॉटलंडचे खेळाडू मैदानावर उतरलेले पाहायला मिळतात.

स्कॉटलंडमधील हेडिंग्टन या छोट्याश्या शहरात राहणारी रिबेका ही क्रिकेटची चाहती आहे. तिच्या हस्ते क्रिकेट संघाला ही नवी जर्सी प्रदान करण्यात आली. देशाचा संघ बांगलादेश विरुद्ध पहिला सामना खेळत असताना रिबेका संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सामना पाहत होती.

स्कॉटलंडची जर्सी परिधान करून ती सामना बघत होती आणि बांगलादेशच्या संघाची स्कॉटलंडने फॅफॅ उडवली हे मात्र नक्की! याला योगायोग म्हणा, किंवा तिचा पायगुण म्हणा पण संघाने जबरदस्त कामगिरी केली हे तर अवघ्या जगाने पाहिलं आहे.

 

 

क्रिकेट स्कॉटलंडने या रिबेकाचं सोशल मीडियाचा वापर करून कौतुक केलं आहे. वयाच्या १२ व्या वर्षीच तिने मिळवलेलं हे यश तिला पुढच्या आयुष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल यात शंकाच नाही.

रिबेकाच्या या यशाबद्दल तिचं अभिनंदन! स्कॉटलंडचा संघ सुद्धा उत्तम खेळ करतोय. त्यांनी असाच दर्जेदार खेळ सुरु ठेवावा आणि वर्ल्डकपमध्ये अधिकाधिक चांगली कामगिरी करावी यासाठी शुभेच्छा…

या जर्सीबद्दल आणि मुलीच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं, हेदेखील आम्हाला नक्की कळवा. अशाच मनोरंजनपूर्ण माहितीसाठी पेजवरील इतर आर्टिकल्ससुद्धा नक्की वाचा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version