Site icon InMarathi

थिएटर तर सुरु होत आहेत मात्र घरातलं हक्काचं मनोरंजन होणार आणखीनच महाग!

tv final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

मागच्या वर्षीपासून जे आपण घरात अडकले गेलो त्यामुळे आपल्या मनोरंजनाचे साधन म्हणून एकमेव पर्याय होता तो म्हणजे टीव्ही. आज नुसत्या चॅनेलचा टीव्ही राहिला नसून तो स्मार्ट टीव्ही बनला आहे. सिरियल्सच्या बरोबरीने आपण याच टीव्हीवर जुनी नाटक, ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या वेबसिरीज पाहू शकतो.

आज वर्षभराचं अनेक सिमकार्ड कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे वर्षभराचे सबस्किपरशन त्यांच्या रिचार्जेवर फुकटात देतात. मात्र घरातील D2h साठी आपल्याला वेगळे रिचार्ज करावे लागते. आता हेच रिचार्ज १ डिसेंबर पासून महाग होणार आहे, नेमकं काय आहे यामागचं कारण चला तर मग जाणून घेऊयात….

 

 

आधीच लोक महागाईने, कोरोनामुळे त्रस्त आहेत. रोजच्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात आता हक्काच्या मनोरंजनाचे भाव वाढल्याने लोकांच्या खिशाला चाट पडणार आहे. टीव्ही चॅनेल महाग होण्यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे देशातील बड्या चॅनेल मंडळींनी पॅकेजमध्ये येणाऱ्या चॅनेल्सना काढून टाकले आहे. यामुळे टीव्ही पाहणाऱ्यांना अतिरिक्त ५०% खर्च करावे लागणार आहे.

 

झी, सोनी आणि वायकॉम१८, सोनी या मंडळींनी हा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) यांच्या नव्या ऑर्डरमुळे हा पर्याय निवडला गेल्याच कंपनीचं म्हणणं आहे.

TRAI च मुख्य काम म्हणजे देशातील प्रसारण आणि मोबाईल सेवा नियंत्रित ठेवणे, २०१७ साली TRAI चॅनेलच्या बाबतीत एक निर्णय घेण्यात  आला ज्यात चॅनेलच्या किंमती निश्चित केल्या गेल्या. त्याला टॅरिफ ऑर्डर म्हणून घोषित केले. त्यानंतर २०२० साली पुन्हा एक नवी ऑर्डर काढण्यात आली ज्यात प्रेक्षकांना आपल्या हव्या असलेल्या चॅनेलना निवडण्याचा पर्याय त्यात ठेवला गेला होता.

 

Gizbot

 

साहजिकच कंपन्यांनी या विरोधात कोर्टात धाव घेतली. तसेच या निर्णयावर स्टे आणावा अशीही कोर्टाला विनंती केली होती. या प्रकारणाची सुनावणी २० नोव्हेंबरला असणार आहे. मात्र TRAI दर वाढीवर ठाम आहे असे बोलले जात आहे.

TRAI जरी केल्या नव्या दरांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चॅनेलचा अख्खा गुच्छा पाहणायसाठी १२ रुपये लागतील जे आधी १५ ते २५ रुपयांपर्यंत असायचे. आधीच तोट्यात असणारी चॅनेल्स, त्यात ओटीटी प्लॅटफॉर्मची वाढती स्पर्धा यामुळे कंपनीने आपापल्या गुच्छांमधून काही लोकप्रिय चॅनेल्स काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र पैसे मोजावे लागतील, अशी अट घातली आहे. म्हणजे एखादे लोकप्रिय चॅनेल पाहायचे असल्यास तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील.

 

 

जे ग्राहक सोनी चॅनेल बघत असतील त्यांना आता ३९ ऐवजी ७१ रुपये खर्च करावे लागणार आहेत. प्रेक्षकांच्या लाडक्या झीचॅनेलला आधी ३९ रुपये द्यावे लागत होते आता ४९ रुपये द्यावे लागतील. झी, सोनीला टक्कर देणारे वायकॉम १८ चॅनेल सुद्धा आता २५ ऐवजी ३९ रुपये आकारणार आहे.

 

smartprix

 

सध्या नाना पाटेकर यांची टाटा स्कायची जाहिरात टीव्हीवर खूप गाजत आहे. त्यात ते असं म्हणतात की केवळ २३८ रुपयात सगळी चॅनेल्स तुम्हाला पाहायला मिळणार. मात्र चॅनेल्सच्या या निर्णयामुळे आता प्रेक्षकांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version