ओडीसा मध्ये सापडली बुद्धांची १४०० वर्षे जुनी मूर्ती, ज्यावर आहे ७ फणांचा साप!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
जगातील अतीप्रचीन आणि प्रसिद्ध धर्म म्हणून बौद्ध धर्माची ख्याती आहे. एका आगळ्यावेगळ्या मानवतावादी तत्वज्ञानाचा संदेश देणारा हा या धर्माला महान इतिहास आहे. इ.स. पूर्व ६ व्या शतकामध्ये तथागत बुद्धांच्या मार्गदर्शनाने या धर्माची स्थापना झाली.
पुढे राजा अशोकाने आणि इतर अनुयायांनी संपूर्ण विश्वभर या धर्माचा प्रसार केला. आज या धर्माची व्याप्ती प्रचंड मोठी आहे.
अश्या या महान धर्माविषयी आजही संशोधन सुरु आहे, अनेक अनुत्तरीत प्रश्न सोडवण्याचे काम संशोधक करीत आहे.
याच संशोधनातून बौद्ध धर्माविषयीच्या प्राचीन गोष्टी जगापुढे येत आहेत आणि या धर्माची महती अधिकच वाढवीत आहेत.
अश्याच एका संशोधनाच्या माध्यमातून भुवनेश्वरच्या उत्कल विश्वविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने १४०० वर्षापूर्वीची मूर्ती शोधली आहे. जिच्यावर सात फणे असलेल्या सापाची छत्री बनलेली आहे.
ही मूर्ती ओडीसाच्या खुर्दा जिल्ह्यात बानापूर जवळ गोविंदपूर मध्ये मिळाली आहे.
पाच फूट असलेल्या या मूर्तीचा ८० टक्के भाग जमिनीच्या खाली गाडलेला आहे. फक्त बुद्धांच्या मूर्तीचे शीर आणि सात फणे असलेल्या सापाचा भाग जमिनीच्या बाहेर आहे.
विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्याने अजून शोध घेण्यासाठी भारतीय पुरातन विभागाला आणि राज्य संग्रालयाच्या अधिकाऱ्यांना बोलावले.
ह्या मूर्तीबद्दल पहिल्यांदा विश्वविद्यालयाच्या प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्व विभागाचा विद्यार्थी दक्षिणेश्वर जेना याला माहिती पडले. त्याच्यानंतर त्याने असिस्टेंट प्रोफेसर अनाम बेहेरा यांना ह्याबद्दल सांगितले.
ह्या मूर्तीविषयी जून माहिती शोधण्यासाठी एक तुकडी तयार केली आहे, ज्यांनी गोविंदपूरला जाऊन खोदून बघितले. तीन फुट खोदल्यानंतर त्यांना सात डोके असलेला साप सापडला त्यानंतर पूर्ण मूर्ती बाहेर काढण्यात आली.
प्रोफेसर बेहेरा यांनी सांगितले की,
ज्या मूर्तीला काढले आहे ती कमीतकमी १४०० वर्ष जुनी आहे. रत्नागिरी आणि ललितगिरी मध्ये आताच मिळालेल्या मुर्त्यांसारखीच ही मूर्ती आहे. या संशोधनातून असा निष्कर्ष निघतो की बौद्ध धर्माचे अनुयायी खुर्दा जिल्ह्यातील बानापूर येथे राहत होते.
वीस वर्षापूर्वी ह्याच मूर्तीला एका शेतकऱ्याने शोधले होते, नांगर चालवत असताना नांगराचा खालील भाग जमिनीखाली असलेल्या सापाच्या डोक्याला लागला होता, त्यावेळी त्याने त्याला दगड समजून दुर्लक्ष केले होते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.