MP3 फॉरमॅट “बंद” झालाय – म्हणजे नक्की काय झालंय? – वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
सर्वांनाच आठवतं असेल आपण ९० च्या, २००० च्या दशकात इंटरनेट वरून भरपूर mp3 गाणी डाउनलोड करुन भर भरून cd कलेक्शन केलं असेल. आज ही आपण कित्येक वेळा नवीन सिनेमाची गाणी mp3 मध्ये डाउनलोड करतो पण आता इथून पुढे mp3 चं अस्तित्व राहणार नाही.
जर्मन स्थित “फ्राउनहॉपर इन्स्टिट्युट फॉर इंटिग्रेटेड सर्किट “ या संस्थेने mp3 ह्या ऑडिओ फॉरमॅट ची निर्मिती केली होती, आणि त्याच्या पेटंटचाही परवाना ह्याच संस्थेकडे होता, त्यांनी २३ एप्रिल २०१७ रोजी mp3 परवाना बंद केल्याची घोषणा केली आहे.
याबाबत कंपनीने जाहीर केलेले ऑफीशीयल स्टेटमेन्ट येथे वाचू शकता.
MP3 म्हणजेच (MPEG-1 OR MPEG-2 AUDIO LAYER III) हि एक ऑडिओ कोडींग फॉरमॅट आहे, ज्यामध्ये मोठ्या साईज चे ऑडिओ फाईल कॉम्प्रेस करून बसवले जातात. मूळ फाईल च्या जवळ पास ७५ ते ९०% फाईल साईज ह्या कोडींग मुळे कमी होते. हे करताना ऑडिओची प्रत कमी होते पण कमी स्टोरेज असलेल्या उपकरणात भरपूर ऑडिओ समावू शकतात.
MP3 फॉरमॅट अस्तित्वात राहणार नाही याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे संग्रहित असलेले mp3 काम करायचे बंद होतील, तर इथून पुढे ज्या नवीन उत्पादने येतील, त्याला हा फॉरमॅट सपोर्ट करणार नाही. जसे windows xp च्या बाबतीत झालं, कंपनीने नवीन अपडेट देणे बंद केले, म्हणजेच काही वर्षे mp3 फॉरमॅट चालेल , पण नंतर तो काळाच्या ओघात नष्ट होईल.
सध्या बाजारात mp3 ला पर्याय म्हणून AAC , MPEG-H असे चांगले पर्याय आहेत, जे कमी साईज मध्ये असून ही mp3 पेक्ष्या चांगल्या प्रतीची ऑडिओ क्वालिटी देतात. आज इंटरनेट वरील ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग होणारे सर्व मीडिया हे नव्या प्रणाली वापरत आहेत. तरीही बाजारात आज mp3 खूप प्रसिद्ध आहे.
80च्या दशकात जेव्हा ऑडिओ कॅसेट चा जमाना होता तेव्हा mp3 बनवण्याचे काम सुरु झाले होते. जेव्हा mp3 मनोरंजनाच्या दुनियेत आली तेव्हा जगभरातील लोकांनी याला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.
दोन दशके संगीत रसिकांचे आयुष्य मधुरमय केल्याबद्दल , धन्यवाद MP3!! आणि भारतीय रसिकांकडून शेवटचा अलविदा !!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.