आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
दूरदर्शनवर खूप पूर्वी एक जाहिरात लागत असे, त्या जाहिरातीची सुरुवात ‘हे सुंदर डोळे एका सुंदर स्त्री आहेत’ या वाक्याने होत असे. या जाहिरातीत फिकट हिरव्या रंगाचे डोळे स्क्रीनवर येत आणि सगळ्यांना मोहवून टाकत.
यानंतर टीव्हीच्या छोटयाश्या स्क्रीनवर नाजूक साजूक ऐश्वर्या राय येत असे. कोणत्याही सौंदर्य स्पर्धेत वेगवेगळे प्रश्न जातात. सौंदर्यासोबत तुमच्या बुद्धीचाही कस तिथे लागतो. ‘जाता जाता तुम्ही जगाला कोणती गोष्ट देऊन जाल?’ असा प्रश्न ऐश्वर्याला विचारला असता, “माझे डोळे” असं उत्तर ती देते. “मी गेले तरीही माझ्या डोळ्यांनी कोणीतरी हे सुंदर जग बघू शकेल, म्हणून मी माझे डोळे दान करणार आहे” असं ती म्हणते.
आपल्याकडे नेत्रदान हे श्रेष्ठ आहेच, पण या जाहिरातीत नेत्रदानापेक्षा ऐश्वर्याचे डोळे लक्षात राहतात. तिच्या डोळ्यांच्या प्रेमात कोणी पडलं नाही तरच नवल!
आता तुम्ही म्हणाल, की ऐश्वर्याच्या डोळ्यांमुळे कोण घायाळ होत नाही? पण आज आम्ही तुम्हाला या डोळ्यांशी निगडित एक गंमत सांगणार आहोत.
२२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाने ऐश्वर्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय अशी कमाल स्टारकास्ट या चित्रपटाची होती.
इटलीहून संगीत शिकायला भारतात आलेला ‘समीर’ त्याच्या शिक्षकाच्या मुलीच्या ‘नंदिनी’ च्या प्रेमात पडतो. त्यांची प्रेमकथा ही हळूहळू सुरेल गाण्यांनी पुढे सरकत जाते. या चित्रपटाचं आणि ऐश्वर्याच्या डोळ्यांचं एक कनेक्शन आहे.
१९९६ सालची ही गोष्ट आहे. आमिर खानच्या ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाचं स्क्रीनिंग होतं. नेहमीप्रमाणे चित्रपटाच्या स्क्रिनींगला बॉलिवूडमधले मोठमोठे अभिनेते, दिग्दर्शक उपस्थित होते. यामध्ये संजय लीला भन्साळीदेखील होते. चित्रपट संपल्यानंतर सगळेजण चित्रपटगृहाच्या लॉबीमध्ये गप्पा मारत उभे होते.
तेव्हा अचानक एक मुलगी भन्साळी साहेबांजवळ आली आणि म्हणाली, “नमस्कार, मी ऐश्वर्या, मला ‘खामोशी’ मधलं तुमचं काम खूप आवडलं. त्यांनी आनंदाने तिच्याशी हात मिळवला. त्यांनी नजर मात्र तिच्या डोळ्यांवर खिळून राहिली.
हा प्रसंग घडला तेव्हा संजय भन्साळी ‘हम दिल..’च्या संहितेवर काम करत होते. यातील मुख्य पात्र ‘नंदिनी’साठी त्यांना एका अभिनेत्रीची गरज होती. ऐश्वर्याच्या डोळ्यांकडे बघून त्यांना असं वाटलं, की हीच आहे नंदिनी!
“काही डोळ्यांमध्ये दैवी शक्ती असते. हेमामालिनी, लता मंगेशकर यांच्या डोळ्यांकडे पाहिलं, की ती दैवी शक्ती जाणवते. ऐश्वर्याच्या बाबतीतही तसंच काहीसं आहे. हे डोळे सामान्य नाहीयेत. ऐश्वर्याला एकही संवाद दिला नाही, तरीही तिचे डोळेच खूप काही सांगून जातात”, असं भन्साळी सर एका कार्यक्रमात म्हणाले होते.
१९९४ मध्ये ऐश्वर्याने ‘मिस वर्ल्ड’चा ‘किताब जिंकला होता. भन्साळींना नंदीच्या रोलसाठी ऐश्वर्या खूपच आवडली होती, पण निर्माते मात्र जरा चिंतेत होते.
मिस वर्ल्डच्या प्रतिमेमुळे नंदिनीच्या भूमिकेत ती योग्य बसेल की नाही याचा त्यांना अंदाज येत नव्हता, पण ऐश्वर्याने या भूमिकेवर खूप मेहनत घेतली आणि त्या भूमिकेला योग्य न्याय मिळवून दिला.
–
- लॅपटॉपवर डोळे रोखण्याचे परिणाम टाळा! आजपासूनच हे घरगुती उपाय कटाक्षाने पाळा!
- केवळ ऐश्वर्याच्या प्रेमाखातर सलमान या सिनेमाचा क्लायमॅक्स बदलणार होता पण….!
–
या चित्रपटात ‘निंबोडा निंबोडा’ हे गाणं खूप गाजलं होतं. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्याच्या पायाला दुखापत झाली होती, मात्र पायाला सूज आलेली असतानाही तिने चित्रीकरण पूर्ण केलं.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.