Site icon InMarathi

‘कुछ कुछ..’ मधील लॉजिक गुंडाळून ठेवलेल्या या १० चुका माहित आहेत का?

kkhh inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

दोन दशकांपूर्वी आलेला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट शाहरुख खानला ‘रोमान्स का बादशहा’ ही पदवी देऊन गेला, राणी मुखर्जीला पहिला हिट देऊन गेला. काजोलच्या अभिनयाची आणि मेकओव्हरची दखल घेणारा तसेच करण जोहर नावाच्या बीटाऊन फ़िल्मी स्कूलची सुरवात असणारा हा चित्रपट.

लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या या चित्रपटात काही प्रसंग असे आहेत, की बनवाबनवी स्टाईलमधे सांगायचं तिथे लॉजिक वारलं आहे.

‘कुछ कुछ होता है राहूल तुम नहीं समझोगे’, ‘कुछ कुछ होता है अंजली तुम नहीं समझोगी’ किंवा ‘हम एक बार जिते है, एक बार मरते है और प्यार भी एक बार होता है’ असे मधाळ डायलॉग अजरामर करणारा ‘कुछ कुछ होता है’ बॉलिवुडसाठी माईलस्टोन चित्रपट मानला जातो.

 

 

बादशहा किंग खानची रोमान्स का बादशहा अशी ओळख पक्की करणारा हा सिनेमा. करण जोहरचा डेब्यू आणि बॉलिवुडचं भविष्य लिहिणारा असा चित्रपट.

या चित्रपटाला अलिकडेच तब्बल तेवीस वर्षं पूर्ण झाली. इतकी वर्षं वेड लावणार्‍या या चित्रपटातले काही सीन मात्र वेड्यासारखे लॉजिक गुंडाळून ठेवलेले आहेत. बघूया तर मग ते कोणते सीन आहेत ते-

१- ती आठ पत्रं 

 

 

जी कॉन्सेप्ट लोकांनी डोक्यावर घेतली तीच मुळात कहर गंडलेली आहे. एक आई आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी आठ पत्रं ठेवून जाते.

दरवर्षी वाढदिवसाला त्यातलं एक पत्र वाचून या बाळाला म्हणजेच टिना आणि राहूलच्या मुलीला, अंजलीला आईच्या मनातल्या गोष्टी कळत जातात.

बरोबर आठव्या वर्षी तिला सगळ्यात मोठं रहस्य कळतं, की खरंतर आपल्या वडिलांचं प्रेम अंजली नावाच्या मुलीवर होतं आणि आता मेलेल्या आईने या दोघांना एकत्र आणण्याची जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे.

पण आठव्या वर्षी जर आठवं पत्र वाचलं असेल, तर पहिल्या वर्षी पहिलं पत्र वाचलेलं असणार. म्हणजे अगदी किंगखानची मुलगी असली म्हणून काय झालं? पहिल्या वर्षीच वाचता येऊ शकणं हा चमत्कारच आहे नाही का?

२-  बास्केट बॉल कोर्ट कहां है?

मध्यांतरानंतर जेव्हा राहूल आणि अंजली समर कॅम्पमधे भेटतात, तेव्हा तिथे तो सुप्रसिध्द बास्केट बॉल सामना होतो. पहिल्या सीनमधे पाहिलं असेल तर कोर्टच्या दोन्ही बाजूला हिरवळ आहे, मात्र जेव्हा राहूल बास्केटमधे बॉल टाकतो, तेव्हा क्लोजअप मध्ये या दोघांच्या मागे तळं दिसतंय. हिरवळीवर तळं कधी बरं तयार झालं असावं?

 

 

३-  रग्बी की बास्केटबॉल?

राहूल आणि अंजली हे बास्केटबॉल खेळतायत हे जरी दाखवलं असलं, तरीही प्रत्यक्षात मात्र बहुदा ते रग्बी खेळत असावेत, कारण या दोघांना dribbling करताना दाखवलेलंच नाही.

४-  टीना कब आयी?

 

 

टिनाचे बाबा कॉलेजमधे सांगतात, की टिना आजच लंडनहून परत येतेय आणि टिना आल्यावर सांगते, की ती आदल्यादिवशीच लंडनहून परत आली आहे. वडिलांना न सांगता टिना एक दिवस कुठं गायब असेल बरं?

५- अंजलीला टिना कशी माहित?

टिना भारतात कधीच आलेली नसताना, त्याकाळात इन्स्टा, फेसबुकसारख्या सोयी नसतानाही पहिल्यांच आलेल्या टिनाला अंजली बरोबर कशी काय ओळखते?

६-  स्केटबोर्डचा घोळ

 त्या त्या काळातलं जे जे फ़ॅन्सी ते ते करण जोहरच्या सिनेमात हटकून दिसतंच. स्केटबोर्ड ही त्या काळातली अशीच फ़ॅन्सी गोष्ट होती. राहूल आणि टिना एकमेकाला धडकतात, तेव्हा स्केट बोर्ड टिनाच्या मागे असतो, मात्र राहूल उभा रहाताना तो स्केटबोर्ड टिनाच्या तोंडासमोरून घेतो. कसं काय बरं?

७-  मैं तो हिल गया

 

 

मान्य आहे, की राहूल, टिना आणि अंजली हे प्रचंड हुशार विद्यार्थी आहेत, पण म्हणून काय रिहर्सलविनाच स्टेजवर ‘कोई मिल गया’ वर नाचतील?

बरं तेही एकवेळ मान्य, पण आधीच्याच सीनमधे राहूल आणि अंजलीला प्रेक्षकांनी सडके टोमॅटो फ़ेकून मारलेले असतात त्याचं काय? नंतर संपूर्ण गाणं स्टेज एकदम स्वच्छ दिसतं. हे फेकलेले टॉमॅटो स्वच्छ कोणी केले?

८-  मरते है स्टाईल से

टिनाला प्रसुती दरम्यान झालेल्या अंतर्गत रक्तस्त्रावामुळे तिचा जीव धोक्यात असतो.  इतकी गंभीर परिस्थिती असताना टिना मात्र टकाटक दिसते. ती अजिबातच मृत्यू शय्येवरची पेशंट दिसत नाही. उलट आपल्या सासूशी ती छान गप्पा मारताना दिसते.

९- अंतर्यामी टिना

 

 

टिना न जन्मलेल्या बाळासाठी पत्रं लिहिते. डिलिव्हरी दरम्यान आपण मरणार आहोत हे आधीच माहित असल्यासारखी एक दोन नाही, तर तब्बल आठ पत्रं लिहिते. इथंपर्यंत लॉजिक अर्धमेलं झालेलं, असतंच पण पुढे जाऊन टिना चक्क अंतर्यामी टिनामाता बनते.

लग्नानंतर अंजलीला एकदाही न भेटता अंजली आठ वर्षं बिन लग्नाची राहुन राहूलसाठी वाट बघेल हे तिनं कसं काय ओळखलेलं असतं? टिना-राहूल पाठोपाठ अंजलीचं लग्नही झालेलं असण्याची शक्यता नसते का?

१०-  टिना माता की जय

मुलीला लिहिलेल्या पत्रात टिना राहूल-अंजलीमधल्या अशा काही घटनाही लिहिते, ज्या तिच्या समोर घडलेल्याही नाहीत. कुठून कळल्या टिनाला या घटना?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version