Site icon InMarathi

“आम्हाला फक्त ‘श्रीमंत पर्यटक’ हवेत”, गोव्यातील भाजप मंत्र्यांचा अजब दावा!

manohar final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गोवा म्हटलं की तरुणाईच्या समोर येतो तो म्हणजे दिल चाहता हैं सिनेमा, तमाम तरुणाईला वेड लावणारा हा सिनेमा दोन दशकं होऊन गेली तरी अनेकांच्या लक्षात आहे. दिल चाहता हैं सिनेमा बघून अनेकजण गोवा ट्रिप प्लॅन करतात आणि आवर्जून त्या किल्याला भेट देतात. आठवणीने तिथे फोटो काढतात.

 

 

अथांग पसरलेला समुद्र, माश्यांची रेलचेल, मद्यप्रेमींसाठी दारू, शांत जनजीवन यामुळे अनेकजण गोव्याच्या प्रेमात पडतात. मित्रांच्या ग्रुपमध्ये हमखास ठरलेला प्लॅन म्हणजे वर्षातून एकदातरी गोव्याला जाणे. मात्र आता कदाचित गोव्याला जाणे खिशाला थोडे जड जाऊ शकते .

कारण गोव्याच्याच पर्यटन मंत्र्याने असे जाहीर केले की, ‘आम्हाला फक्त श्रीमंत पर्यटक हवेत’, गोव्यात सध्या दोन दिवसाचे अधिवेशन सुरु आहे त्यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना पर्यटन मंत्री महोदय असं म्हणाले, ते नेमकं काय म्हणाले आहेत चला तर जाणून घेऊयात…

 

 

नेमकं काय म्हणाले मंत्री महोदय?

गोवा राज्य हे खरं तर पर्यटनावर अवलंबून आहे, याच राज्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी असे विधान केले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “आम्हाला गोव्याची नासधूस करणारे, अमली पदार्थ सेवन करणारे, गोंधळ घालणारे, गाडीत बसून जेवण करणारे असे कोणतेच पर्यटक नकोत. आम्हाला श्रीमंत पर्यटक हवेत.”

 

the hans india

 

गोव्याच्या संस्कृतीचा, जुन्या वारसा असेलेल्या वास्तूंचे आदर करणारे पर्यटक हवेत. अशा लोकांचे आम्ही नक्की स्वागत करू पण त्यांनी आपली मर्यादा राखत गोव्यात पर्यटनाचा आनंद घ्यावा. तसेच काही दिवसात चार्टर फ्लाईट्स चालू होतील त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना याचा फायदा होईल’. कारण गोव्यात बहुतांश पर्यटक हे बाहेरून आलेले असतात. त्यामुळे साहजिकच राज्याच्या तिजोरीत चांगलीच भर पडत असणार.

 

Herald (Goa)

मागच्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते, आज कुठेतरी अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या राज्यांचे मोठया प्रमाणावर हाल झाले आहेत.

हिमाचल, गोवा, काश्मीर, केरळ यासारखी राज्य पर्यटनावर अवलंबून आहेत. कोरोनामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांचे रोजगार गेले. अनेक ट्रॅव्हल कंपन्यामध्ये लोकांचे पैसे अडकले आहेत. सगळं सुरळीत झाल्यावर कंपनी त्यांना सहलीवर पाठवणार आहेत असे खुद्द कंपन्यांनी दावा केला आहे.

 

 

गोव्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे बंगाल गाजवणारा तृणमल काँग्रेस पक्ष आपले बस्तान बसवत आहे तर दुसरकीड़े भाजप मैदानात उतरले आहे. अमित शाह, देवेन्द्र फडणवीस सध्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करत आहे.

निवडणुका तोंडावर असताना अशा प्रकारे विधान करून हे प्रकारे नक्कीच जनमानसात याची चर्चा होईल. कारण गोव्यात आज देशभरातून पर्यटक येत असतात. येणारे सगळेच पर्यटक हे गोंधळ घालणारे नक्कीच नसतील. अमली पदार्थांच्या बाबतीत गोवा आधीपासून कायम चर्चेत असते म्हणूनच मंत्री महोदयांनी अमली पदार्थांच्या विरोधात सरकार आहे हे स्पष्ट केले आहे.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version