' हे मराठी सेलिब्रिटी आडनाव लावायचं का टाळतात? जाणून घ्या त्यांची खरी आडनावं! – InMarathi

हे मराठी सेलिब्रिटी आडनाव लावायचं का टाळतात? जाणून घ्या त्यांची खरी आडनावं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नावात का आहे? असं शेक्सपिअर जरी म्हणाला असला तरी प्रत्येकासाठी आपलं संपूर्ण नाव ही अभिमानाची बाब असते. आपल्या नावासह वडीलांचं नाव तसेच आडनाव लावण्याची परंपरा आजही अविरत पाळली जाते. मात्र या प्रथेला, नियमाला छेद देणा-यांची संख्या काही कमी नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हल्ली अनेकांच्या नावामागे आडनाव दिसत नाही, तर काहीजण नावासह आडनावाचं केवळ आद्याक्षर लावणं पसंत करतात. अनेकजण आडनावाऐवजी केवळ वडिलांचं नाव लावणं पसंत करतात, तर मातृसत्ताक पद्धतीचा पुरस्कार करणारे वडिलांसह आईचंही नाव लावण्यात समाधान मानतात.

 

sridevi rekha jaylalita inmarathi

 

हिंदी चित्रपटसृष्टीत रेखा, हेमामालिनी, श्रीदेवी या अभिनेत्रींची आडनावं आजही फारशी कुणाला ठाऊक नाहीत. मात्र मराठी सेलिब्रटींमध्येही आता हेच चित्र दिसून येत आहे. असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे चेहरे प्रसिद्ध आहेत, मात्र त्यांच्या नावापलिकडे इतर फारशी माहिती प्रेक्षकांना मिळत नाही.

जाणून घेऊयात अशाच काही सिलेब्रिटी आणि त्यांच्या ठाऊक नसलेल्या आडनावांविषयी…

१. ललित प्रभाकर

मराठीतील चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा ललित प्रभाकर! सध्या त्याचा झोंबिवली सिनेमा गाजतोय, जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून त्याने पदार्पण केलं आणि अनेक तरुणींसाठी तो ‘स्वप्नातील राजकुमार’ ठरला.

 

lalit prabhakar inmarathi

 

ललितचं हासणं, सहजसाधा अभिनय, विनोद बुद्धी यांमुळे मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांतून रसिकांच्या मनातील ताईत झालेल्या ललितचे ‘प्रभाकर’ हे आडनाव नाही हे तुम्हाला ठाऊक आहे का?

ललितचं खरं आडनाव भदाणे असून ललित हे आडनाव न लावणं पसंत करतो. याउलट ललित प्रभाकर याच नावाने त्याने आपली ओळख निर्माण केली आहे.

२. अमृता सुभाष 

संवेदनशील अभिनेत्री म्हणून आपली ओळख जपणारी अभिनेत्री अमृता सुभाष हिचं खरं आडनाव तुम्हाला ठाऊक आहे? गेली अनेक वर्ष मराठीसह हिंदी सिनेमा गाजवणारी या अभिनेत्रीचं खरं नाव आहे, अमृता ठेंबरे!

 

amruta subhash inmarathi

 

मात्र आजपर्यंत या अभिनेत्रीने हे आडनाव कधीही लावलं नाही. अमृता सुभाष या नावाने मिरवणा-या या अभिनेत्रीने दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र त्यानंतरही तिने आपले नाव बदलले नसून ती अमृता सुभाष या नावाससह चित्रपटसृष्टी गाजवत आहे.

३. रसिका सुनिल

माझ्या नव-याची बायको या मालिकेतून आपल्या नखरेल अदांनी भुरळ घालणारी अभिनेत्री रसिका सुनिल!

 

rasika sunil inmarathi

 

आडनावापेक्षा वडिलांचं नाव लावण्याला ती प्राधान्य देते. मात्र तिचं मुळ नाव फार कमीजणांना ठाऊक आहे. रसिका धबडगावकर हे तिचं मुळ नाव, मात्र आजपर्यंत तिने कधीही आपलं आडनाव उघडपणे लावलेलं नाही.

४. सायली संजीव 

हसरा, सोज्वळ चेहरा आणि तितकाच संयत अभिनय यासाठी ओळखली जाणारी सायली संजीव हिता प्रेक्षकवर्ग मोठा आहे. ‘काहे दिया परदेस’मधून तिने पदार्पण केलं, आणि त्यानंतर तिचा यशाचा प्रवास भरधाव सुरुच आहे.

 

sayali sanjeev inmarathi

 

मात्र संजीव हे तिचं आडनाव नाही, कारण सायली आडनाव लावतच नाही. सायलीचं खरं आडनाव चांदसारकर असून यापेक्षा ती सायली संजीव याच नावाने आपली ओळख निर्माण करणं पसंत करते.

५. अजय अतुल 

समस्त भारतीयांना ‘सैराट’ ही नवी भावना देणारी संगीतकार जोडी म्हणजे अजय-अतुल! या भावंडांनी मराठी संगीतसृष्टीत राजा घातलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या एकाहून एक दर्जेदार गाण्यांनी मराठी चित्रपट सजले आहेत. मात्र हे भाऊ कायम आपलं नाव लावणं पसंत करतात.

 

ajay atul inmarathi

 

त्यांच खरं आडनाव गोगावले असून ते आडनाव न लावता केवळ अजय आणि अतुल या नावासह ते चित्रपटसृष्टीत वावरतात.

६. भाग्यश्री

‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून आपल्या लाडीक आवाजाने हिंदी चित्रपटसृष्टीत ती दाखल झाली खरी, मात्र जास्त काळ रमली नाही. भाग्यश्री या अभिनेत्रीचं मुळ नाव भाग्यश्री पटवर्धन!

 

bhagyashree inmarathi

 

सांगलीच्या राजघराण्यातील ही लाडकी कन्या, मात्र प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर तिने लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीला रामराम केला. तिनेही आपलं पटवर्धन हे आडनाव न लावण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?