Site icon InMarathi

वाहनांवर राष्ट्रीय ध्वज लावण्याची परवानगी नेमकी कोणाला असते? कायदा काय सांगतो?

flag on government vehicle inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सिनेमागृहात गेल्यावर सिनेमाच्या आधी जेव्हा राष्ट्रगीत सुरु झालेलं असतं, त्यावेळी एकतरी व्यक्ती अशी दिसते जी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभी राहत नाही. अगदी एवढंच नाही, तर तुम्ही सुद्धा आठवून पहा की रस्त्याने जात येताना कुठेही राष्ट्रध्वज फडकताना दिसला, तर त्याला सलाम ठोकणारी व्यक्ती तुम्हाला सहसा दिसते का? असं घडलेलं तुम्हाला फारसं पाहायला मिळत नसेल.

हीच मंडळी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला मात्र बाईक, कार्स, सायकल्स, रिक्षा अशा सगळ्या वाहनांवर राष्ट्रध्वज लावून फिरतात. हा राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने वाहनांवर मिरवतात.

वर्षातले हे दोनच दिवस लोकांना राष्ट्रध्वज प्रेमाचं भरतं येतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, पण हे असं राष्ट्रध्वज गाड्यांवर लावून फिरणं योग्य आहे का? भारतीय कायद्यानुसार याला परवानगी आहे का? जाणून घेऊया…

 

 

या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं, तर ‘प्रत्येक भारतीयाला देशाचा राष्ट्रध्वज आपल्या गाडीवर लावून मिरवण्याची परवानगी नाही.’

कायदा काय सांगतो?

भारतीय संविधान आणि कायद्यानुसार प्रत्येक भारतीय व्यक्ती आपल्या वाहनावर राष्ट्रध्वज गाड्यांवर लावू शकत नाहीत. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही व्यक्तींना ही परवानगी असते. मोजक्या व्यक्तींना याची परवानगी असली, तरी त्यांनी नेहमीच राष्ट्रध्वज वापरणं सुद्धा योग्य ठरत नाही.

वाहनावर राष्ट्रध्वज लावणं, खरोखर गरजेचं आणि विवेकपूर्ण वाटत असेल, त्याचवेळी या व्यक्तींनी आपापल्या वाहनावर राष्ट्रध्वज लावावा असं म्हटलं जातं आणि तीच प्रथा पाळली सुद्धा जाते.

२००२ साली अस्तित्वात आलेल्या ‘द फ्लॅग कोड ऑफ इंडिया’ या कायद्यानुसार केवळ खालील यादीतील व्यक्तीच आपल्या वाहनांवर राष्ट्रध्वज लावू शकतात.

 

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर…

१. देशाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती

२. राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपाल

 

 

३. परराष्ट्रातील भारतीय वकिलात मुख्यालय

४. भारताचे पंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्री

 

 

५. केंद्रातील राज्यमंत्री आणि उपमंत्री

 

६. लोकसभेचे सभापती आणि उपसभापती

७. राज्यसभेचे उपसभापती

राज्य स्तरावर…

१. राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्री

 

 

 

२. राज्य आणि संघराज्याचे राज्यमंत्री आणि उपमंत्री

३. राज्यांच्या विधानपरिषदांचे अध्यक्ष

४. विधानसभांचे सभापती

५. राज्यांच्या विधानपरिषदांचे उपाध्यक्ष

६. राज्य आणि संघराज्य प्रदेशांच्या विधानसभांचे उपसभापती

न्यायालयीन पदावरील व्यक्ती

राष्ट्र्र आणि राज्य पातळीवरील कारभार पाहणाऱ्या व्यक्तींना वाहनावर तिरंगा लावण्याची परवानगी आहे, तसेच भारतीय कायद्यानुसार चालणाऱ्या न्यायव्यवस्थेतील काही व्यक्तींना सुद्धा याची मुभा आहे. या गटातील नेमक्या कुठल्या व्यक्तींना ही परवानगी आहे, हेदेखील बघूया.

भारताचे सरन्यायधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश या मंडळींचा या यादीत सहभाग असतो.

 

 

राष्ट्रध्वज कुठल्या बाजूला लावला जावा, यासाठी सुद्धा प्रोटोकॉल आहे. परदेशी सन्माननीय व्यक्ती सरकारी वाहनातून प्रवास करत असेल, त्यावेळी वाहनाच्या उजव्या बाजूला आपल्या देशाचा आणि डाव्या बाजूला परदेशाचा ध्वज लावला जातो.

आता लक्षात आलं असेल, की तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कुणीही मंडळी थेट उठून आपल्या वाहनावर राष्ट्रध्वज लावू शकत नाही…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version