' अगदी महासंकट आलं तरी वाचणार ओरिओ बिस्किटं? बघा का आणि कशी ते… – InMarathi

अगदी महासंकट आलं तरी वाचणार ओरिओ बिस्किटं? बघा का आणि कशी ते…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कोरोनाने सगळ्यांनाच साठवणीचं महत्त्व शिकवलं आहे. अचानक कोणतंतरी संकट आलं, तर त्या संकटाच्या सामना करून त्यातून पुढे जाण्यासाठी आपल्याकडे अन्नाचा साठा असणं गरजेचं आहे.

अचानक तिसरं महायुद्ध झालं किंवा भूकंप आला तर अशा संकटातून वाचलेल्या लोकांना जेवण कसं मिळेल.. तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय का? किंवा उल्कापात झाला, तर काय करायचं?

आपल्याकडे अवकाळी पाऊस पडला, तरीही शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा पावसाने किंवा गारांनी वगैरे संपूर्ण धान्यच नष्ट झालं, तर पुढे पिकांसाठी बी- बियाणं कुठून आणायचं?

गेली काही वर्ष आजूबाजूच्या गोष्टी- वातावरण इतक्या घाईने बदलतंय, की वर लिहिलेल्या घटना अगदीच होण्यासारख्या आहेत, पण सामान्य माणसांना पडणाऱ्या या सगळ्या प्रश्नांवर वैज्ञानिकाकडे एक सॉल्लिड उत्तर आहे.

आता तुम्ही म्हणाल, की जगच नष्ट झालं किंवा प्रलय आला तर बियाणं वाचणार कशी? पण या सगळ्यावर शास्त्रज्ञांनी एक शक्कल लढवली आहे.

आर्कटिक सर्कलजवळ नॉर्वे येथे शास्त्रज्ञांनी एक बीज भांडार बनवले आहे, पण हे भांडार आपल्या घरी असलेल्या सामानाच्या खोलीसारखं नाहीये, इथे असलेली सुरक्षितता खूप उत्तम दर्जाची आहे.

 

seed bank inmarathi

 

याला ग्लोबल सीड वॉल्ट म्हटले होते, इथे सुमारे १० लाख विविध बियाणं आहेत. भारतानेसुद्धा इथे आपली बियाणे पाठवली आहेत. भारत- चीन- अमेरिका अशा सगळ्याच देशांमध्ये हल्ली शेतीचे प्रमाण खूप कमी झालंय, त्यामुळे धान्यावरून युद्ध होण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.

नॉर्वे ही जागा यासाठीच निवडण्यात आली आहे. उद्या पुढे मागे युद्ध झालं, तरीही ही जागा नक्कीच वाचेल. जगातील शेती नष्ट झाली, तरीही या बियाणांवर प्रक्रिया करून त्यांचा वापर होऊच शकतो.

पण या सगळ्यामुळे तुम्हाला धान्य मिळेल, पण तुम्हाला कुकीज खावेसे वाटले तर?

 

oreo inmarahi

 

उद्या जगाचा नायनाट झाला, तर आपली कुकीज वाचली पाहिजे म्हणून आपल्या लाडक्या ओरिओने सुद्धा नॉर्वेला जागा घेऊन इमारत उभारली आहे. बीज भांडारापेक्षा ही जागा लहान आहे. इथे ओरिओची रेसिपी आणि ओरिओ बिस्किटांचा साठा ठेवण्यात आला आहे.

 

oreo inmarathi 1

 

या ओरिओ वॉल्टची विशेषता म्हणजे, उल्कापात किंवा अवकाशातील गोष्टींचाही धोका या इमारतीला नाही. ओरिओने त्यांचं मार्केटिंग करतांना Asteroid proof असे केले होते.

 

oreo inmarathi 2

 

कोणत्याही तापमानात आणि परिस्थितीत या कुकीज फ्रेश राहतील याची दक्षता इथे घेण्यात आली आहे. जगाचा नाश झाल्यानंतर एकवेळ तुम्हाला दूध मिळणार नाही, पण ओरिओ नक्की मिळेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?