Site icon InMarathi

युवराज सध्यातरी जामीनावर सुटलाय; पण पुन्हा कारवाई होऊ शकते, कारण…

yuvraj and chahal inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सोशल मीडियावर बोलताना सुद्धा काळजी घ्यायला हवी, बोलण्याचं भान असायला हवं ही गोष्ट बऱ्याचदा आपल्या लक्षात  राहत नाही. याचं भान राहिलं नाही, तर काय होऊ शकतं याचा अनुभव सध्या माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला आला आहे.

काल रात्री घडलेल्या घटना युवराज सिंग नक्कीच विसरण्याचा प्रयत्न करेल. अनुसूचित वर्गातील जातीबद्दल अयोग्य शब्द वापरले म्हणून युवराजला अटक झाली. हायकोर्टाच्या आदेशानुसार त्याला लगेचंच जामीन तर मिळाला. पण तरीही त्याच्या नावे गुन्हा दाखल झालाय, हे सत्य कायम राहणार आहे.

 

 

ही घटना घडली मागच्या वर्षी. युवराज आणि रोहित शर्मा हे दोघेही इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून गप्पा मारत होते. गप्पांच्या ओघात युझवेंद्र चहलचा विषय निघाला आणि युवराजचा मस्कऱ्या स्वभाव जागृत झाला.

चहलची मस्करी करत असताना मात्र युवराजला भान राहिलं नाही. त्याच्या बोलण्यात जातीबद्दल चुकीचं विधान निघून गेलं, हेदेखील त्याला जाणवलं नाही.

 

खरं तर, कुणाच्याही भावना दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता. घडलेल्या चुकीबद्दल युवराजने माफीसुद्धा मागितलेली आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये युवराजच्या या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्याचमुळे काल युवराजला अटक झाली. अटक झाल्यावर काही वेळातच त्याला जामीन मिळाला असला, तरी ही गोष्ट सगळ्यांना पटलेली दिसत नाही.

जो समाज दुखावला गेला आहे, त्या समाजाचा भाग असलेले रजत कालसन यांनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं आहे. युवराजला जामीन मिळू नये आणि तुरुंगात जायला लागावं यासाठी आम्ही पूर्ण काळजी घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या काळात नेमकं काय होईल, ते कळेलच; मात्र युवराजला येता काळ कठीण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version