Site icon InMarathi

“लेडीज, रोज एक पेग घेऊन झोपत जा’, एका महिला मंत्र्यांचा अजबच सल्ला

anila inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नुकताच जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन होऊन गेला, आज एकूणच जगभरात लोकांच्या मानसिकतेबद्दल अनेकजण चिंता व्यक्त करत आहेत. नोटबंदी, जागतिक मंदी, उद्योगक्षेत्रातील वाढते ऑटोमेशन त्यात मागच्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे तर अनेक लोकांच्या नोकरीवर गदा आली. त्यामुळे अनेकजण डिप्रेशनमध्ये गेले होते.

भारतासारख्या देशात जिथे अनेक उद्योगधंदे चालतात तिथे कोरोनामुळे ते बंद पडले. पर्यटन क्षेत्र, मनोरंजन क्षेत्र पूर्णतः ठप्प झाले होते. निर्बंध कमी झाल्यांनतर हळूहळू ही क्षेत्र सुरु होणार तितक्यात दुसरी लाट आली आणि पुन्हा एकदा सर्व ठप्प झाले. आता तिसऱ्या लाटेची शंका अनेकजण व्यक्त करत आहेत.

 

मागच्यावर्षी पासून झालेल्या या साथीच्या आजरामुळे अनेकांच्या मानसिकेतेत बदल झालेले दिसून येतात. वर्क फ्रॉम होममुळे कामाचे तास वाढले आहेत. मुलांच्या शाळा ऑनलाईन असल्याने पालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या सगळी गडबडीत लोकांना मानसिक स्वास्थ्य मिळाले नाही.

ज्यांच्या घरात कोरोनामुळे घरातली कमावती व्यक्ती गेली, अशा घरात अनेकांचे स्वास्थ्य बिघडले, तसेच ज्या लोकांना कोरोना झाला होता अशा व्यक्तींच्या मानसिकतेत सुद्धा बदल झाले आहेत. बहुदा तज्ञांचे म्हणणे असे आहे की कोरोना झाल्याचे हे दुष्परिणाम असावेत.

 

Getty Images

मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आज खरं तर अनेक संस्था कार्यरत असतात. मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी लोकांना अनेक उपाय करायला सांगतात. सकारत्मक लोकांच्या सहवासात रहा, योग करा, वाईट बातम्या, नकारत्मक विचार मनात आणून नाक अशा प्रकारचे सल्ले हमखास आपल्याला ऐकायला मिळतात.

जागतिक योग दिनानिमित्त दरवर्षीआपले पंतप्रधान योगाचे महत्व सांगतात, ते देखील दररोज व्यायाम, योगासने करतात. यासाठी ते आवर्जून वेळ काढतात. एकीकडे योगासनाचे महत्व सांगणारे मोदीजी, रामदेव बाबा तर दुसरीकडे एका मंत्री महोदयांनी चक्क तणावमुक्तीसाठी दारू पिण्याचा सल्ला दिला आहे.

 

dna india

 

मंत्री महोदया आहेत तरी कोण?

छत्तीसगडच्या बालविकास मंत्री अनिला भेडिया यांनी अशा प्रक्रारे वादग्रस्त विधान करून चर्चेत आल्या आहेत. सिंगोला विधानसभेतून त्या याआधीही दोनदा निवडणून आल्या आहेत. छत्तीसगडच्या रायपूर शहरापासुन १२० किमी अंतरावर त्यांचे गाव आहे.

 

 

नेमकं मंत्री महोदया म्हणाल्या तरी काय?

छत्तीसगड राज्य तसे आदिवासी राज्य म्हणून आपल्याकडे ओळखले जाते. तिथे अनेक आदिवासी जमाती आजही आहेत. अशाच एका कमार जमातीच्या महिलांशी त्या संवाद साधत होत्या. निवडणूक तोंडावर आल्याने अनेक ठिकाणी त्या फिरत आहेत.

महिलांशी संवाद साधताना त्या बोलता बोलता बोलून गेल्या की, ‘ रात्री दोन दोन पेग पिऊ द्या म्हणजे शांत झोपाल, तुम्हाला (स्त्रियांना) आधीच खूप कामे असतात, घराला कुटुंबाला सांभाळावं लागत. त्यामुळे आधीच तुम्ही तणावग्रस्त आहात.

 

मंत्री महोदयांच्या भाषणाचा व्हिडिओ लगेचच व्हायरल झाला, त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या, आपल्या टीका होती आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच सावरून घेतले आणि स्पष्टीकरण दिले की, ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, दारूच्या आहारी गेलेल्या पुरुषांबद्दल मी बोलत होते, स्त्रियांना अनेक जबाबदाऱ्या असल्याने ते तणावग्रस्त असतात असे म्हणायचे होते’.

धनुष्यातून सोडलेला बाण, तोंडातून निघालेला शब्द कधीच माघारी घेता येत नाही. पण आपल्याकडे असे अनेक मंत्री महोदय आहे जे अशा प्रकराची विधानं करत असतात आणि त्यानंतर मात्र घुमजाव करतात.

आज दारूबंदीसाठी प्रत्येक राज्यच सरकार काही ना काही कार्यक्रम हाती घेत असतात, मात्र अशा मंत्री महोदयांमुळे हाती घेतलेल्या एखाद्या कार्यक्रमाची नक्की थट्टा होऊ शकते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version