Site icon InMarathi

गुगलची “अख्ख्या जगाच्या नकाशाची चोरी” : एक थरारक सत्यकथा

google 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

अंतराळात घडणाऱ्या घडामोडी, नवीन तंत्रज्ञान या गोष्टींमध्ये अमेरिका आणि जर्मनी यांच्यात नेहमीच स्पर्धा सुरू असते. संशोधन हे जगातील सर्व देशातच सुरू असतं. पण, हे दोन देश नेहमीच काळाच्या पुढे विचार करतात, त्यानुसार यंत्रणा तयार करतात आणि कायमच सर्वांना चकित करतात.

गुगल आणि त्याचे ‘मॅप्स’, ‘अर्थ’, ‘इमेज’ सारख्या सर्व संलग्न सेवा या अमेरिकेतून दिल्या जातात हे सर्वश्रुत आहे. पण, २००६ मध्ये अशी एक घटना घडली होती की, ‘गुगल अर्थ’ ही पृथ्वीचे फोटो उपलब्ध करून देणारं तंत्रज्ञान हे गुगलने जर्मनीच्या ‘आर्ट+कॉम’ कंपनी कडून चोरलं आहे असा खळबळजनक दावा जर्मन कंपनीने केला होता. आयटी जगात या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती. काय होतं हे प्रकरण ? जाणून घेऊयात.

 

 

२००५ मध्ये गुगलने ‘गुगल अर्थ’ हे अंतराळातील सॅटेलाईटच्या माध्यमातून पृथ्वीचे फोटो काढणारी वेबसाईट आणि ऍप्लिकेशन लोकांसाठी उपलब्ध करून दिली होती. ‘गुगल अर्थ’च्या मदतीनेच आपल्या सर्वांना रोजच्या तापमानाची, पावसाच्या शक्यतेची माहिती उपलब्ध करून दिली जाते. गुगल पोझिशनिंग चीप च्या सहाय्याने आज गाडी, व्यक्ती, प्राणी सध्या कुठे आहेत हे सुद्धा ‘गुगल अर्थ’ मुळे सहज शक्य होतं. गुगल अर्थ आल्यानेच आपण ‘ट्रॅकिंग’ सारख्या गोष्टी वापरु शकतो.

 

the verge

गुगल अर्थ हे ऍप्लिकेशन लाँच करतांना गुगलने सर्वांना पृथ्वीच्या संदर्भातील सर्व ट्युटोरियल्स म्हणजेच संशोधनाची माहिती सुद्धा लोकांना उपलब्ध करून दिली होती. या माहितीचं पेटंट हे ‘आर्ट+कॉम’ कंपनीने आधीच नोंदणीकृत केलं होतं. गुगलने या माहितीचा वापर तर केला आणि ती माहीती ‘आर्ट+कॉम’च्या परवानगी शिवाय जगजाहीर करण्यात आली होती.

विलमींग्टन येथील फेडरल कोर्ट मध्ये ही केस दाखल करण्यात आली होती. तत्पूर्वी, ‘आर्ट+कॉम’ कंपनीने गुगलला ईमेल पाठवून याबद्दल स्पष्टीकरण विचारलं होतं. पण, डेव्हिड क्रेन या ‘माऊंटन व्यु कॅलिफोर्निया’ येथील संबंधित व्यक्तीने ‘आर्ट+कॉम’च्या कोणत्याही फोन, ईमेलला उत्तर दिलं नव्हतं.

 

 

‘आर्ट+कॉम’ ही बर्लिन येथील कंपनीची ‘टेराव्हिजन सिस्टीम’ ही संलग्न संस्था आहे जी की, अंतराळातून काढले जाणारे फोटो, उंचीवरून फोटो काढण्याचं तंत्रज्ञान यावर कित्येक वर्षांपासून काम करत आहे. ‘टेराव्हिजन सिस्टीम’ या संस्थेने असा दावा केला होता की, ‘गुगल अर्थ’ने आम्ही करत असलेल्या कामाची कॉपी केली आहे.

‘आर्ट+कॉम’ या कंपनीच्या एका अधिकाऱ्यासोबत गुगलने हा पेटंट विकण्याची मागणी सुद्धा केली होती. पण, गुगलने ‘आर्ट+कॉम’ला देऊ केलेली रक्कम इतकी कमी होती की, हा व्यवहार पुढे सरकू शकला नाही. २००६ मध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये या व्यवहारावर खूप चर्चा झाली होती. पण, गुगलने योग्य किंमत न ऑफर केल्याने ती चर्चा पूर्णत्वास पोहोचली नव्हती.

‘आर्ट+कॉम इनोव्हेशन पुल’ विरुद्ध ‘गुगल आयएनसी’ ही केस अमेरिकेच्या डेलव्हेअर येथील जिल्हा सत्र न्यायालयात ‘आर्ट+कॉम’ने आपण या तंत्रज्ञानाचं संशोधन १९९४ मध्येच तयार केल्याची माहिती न्यायालयात सादर केली होती.

 

edevlet.net

सदर न्यायालयाने आपला निकाल जाहीर करतांना, गुगलच्या माजी कर्मचारी मायकल जोन्स आणि ब्रायन मॅकलेडॉन या गुगल मॅप्सच्या प्रमुख व्यक्तींच्या कामाची पूर्ण पाहणी केली होती. तेव्हा गुगलच्या वकिलांनी हे न्यायालयात सिद्ध केलं होतं की, ‘आर्ट+कॉम’ च्या पेटंटचा दावा करत आहे ते गुगल मॅप्सने आधीच ‘वर्ल्ड-इमॅजनिंग-डॉमीनेशन’ या नावाने नोंदणीकृत केलं होतं.

गुगलने ही केस जिंकली होती. या प्रकरणावर प्रकाश टाकणारी ‘द बिलियन डॉलर कोड’ ही वेबसिरीज ७ ऑक्टोबर पासून नेटफलिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

 

mister snake

‘गुगल अर्थ’ने या निकालानंतर ‘टी-व्हिजन’ या तंत्रज्ञानाची सुद्धा घोषणा केली होती. ‘टी-व्हिजन’ हे प्रत्येक ऑफिसमध्ये असलेल्या पृथ्वीच्या प्लास्टिक मॉडेलला तंत्रज्ञानाने बदलून टाकेल असा गुगलचा दावा आहे.

‘गुगल अर्थ’ सारखे नवनवीन तंत्रज्ञान तयार होत राहो आणि आपलं सुसह्य झालेलं जगणं अजून सोपं व्हावं अशी आशा करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version