Site icon InMarathi

बॉयफ्रेन्डचा खून आणि त्यासमोरच अश्लिल चाळे, विकृतीचा कळस गाठणारी नीरज केस

neeraj case featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. काही लोक इतके चांगले असतात की जणू देवमाणसंच! पण काही लोक इतके विकृत असतात की सैतान सुद्धा त्यांच्या वागण्याकडे बघून आश्चर्य व्यक्त करेल. असली विकृत माणसे त्यांना संधी मिळताच सगळ्या क्रौर्याची, विकृतपणाची सीमा गाठत असे काही कृत्य करतात की ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

हल्ली तर असल्या विकृत लोकांची संख्या वाढत चालली आहे. माणसाच्या रूपात असलेले हे राक्षस इतके काहीतरी भयंकर गुन्हे करतात जे लोकांच्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात.

 

 

७ मे २००८ मध्ये मुंबईत असाच एक भयंकर प्रकार घडला ज्यात अपराध्याने क्रौर्याची परिसीमा गाठत मृत शरीराचे शेकडो तुकडे करत पुरावे नष्ट करण्यासाठी ते जाळून टाकले. आपण बोलतोय ते बहुचर्चित नीरज ग्रोव्हर हत्याकांडासंदर्भात!

नीरज ग्रोव्हर हा २६ वर्षीय तरुण मुंबईच्या सिनर्जी ऍडलॅब्समध्ये मीडिया एग्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. ७ मे २००८ रोजी त्याचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. ह्या हत्येला जबाबदार एक मारिया सुसिराज नामक एक स्त्री होती. मारिया सुसिराज त्यावेळी कन्नड चित्रपटांत अभिनेत्री म्हणून काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होती आणि तिला नीरज ग्रोव्हर तिच्या करियरमध्ये मदत करत होता. मग असे काय घडले की नीरजची अशी अवस्था झाली? वाचा.

 

 

असे म्हणतात की ६ मे २००८ रोजी मारिया सुसिराज तिच्या मुंबईतील मालाड येथील नव्या फ्लॅटमध्ये राहायला आली होती. त्यानंतर नीरज बेपत्ता झाला. त्याचा कुणाशीच संपर्क झाला नाही. त्याच्याशी २४ तासांहून अधिक काळ संपर्क झाला नाही तेव्हा त्याच्या मित्रांनी, कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली.

नीरजच्या कुटुंबाने पोलिसांकडे असा संशय व्यक्त केला की नीरजच्या बेपत्ता होण्यामागे त्याच्या मैत्रिणीचा हात असू शकतो. संशयाची सुई जेव्हा मारियाकडे वळली तेव्हा पोलिसांनी तिची चौकशी केली. तेव्हा तिने सांगितले, की तो तिला ६ मे ला भेटायला आला होता पण नंतर रात्री तो त्याच्या काही मित्रांना भेटण्यास निघून गेला. पोलिसांना तिच्या सांगण्यावर विश्वास बसला नसल्याने त्यांनी तिच्या चौकशीचा सपाटा लावला. तिने दहा दिवस पोलिसांना खोटी उत्तरे दिली. पण अखेर पोलिसांनी प्रकरणाचा शोध लावलाच.

 

 

या केसचा तपास करणाऱ्या पोलिसांनी त्यावेळी असे सांगितले होते की मारिया तिच्या नव्या घरी राहण्यास गेली तेव्हा नीरज तिची घर लावण्यात मदत करत होता. त्यावेळी मारियाला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आला. मारियाचा मॅथ्यू जेरोम नावाच्या व्यक्तीशी साखरपुडा झाला होता. मॅथ्यू जेरोम नेव्हीमध्ये लेफ्टनन्ट ऑफिसर होता. तो त्यावेळी कोचीनला होता.

त्याने फोनवर मारियाच्या घरी पुरुषाचा आवाज ऐकल्याने तो लगेच विमानाने मुंबईला आला. पण ह्याविषयी त्याने मारियाला सांगितले नाही. मारियाने नीरजला घरी जाण्यास सांगितले पण उशीर झाल्याने नीरजने त्या रात्री मारियाच्या घरीच राहण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ मे ला सकाळीच मॅथ्यू जेरोम अचानक मारियाच्या घरी आला. तो आला तेव्हा नीरज सुद्धा तिथेच होता. नीरजला मारियाच्या बेडरूममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत बघून तो प्रचंड संतापला. कारण मारियाने पूर्वी मॅथ्यूला सांगितले होते की नीरजच्या मनात तिच्याविषयी भावना आहेत. यामुळे त्याने नीरजशी भांडण केले. दोघांमध्ये मारामारी झाली आणि जेरोमने स्वयंपाकघरातील सुरी घेऊन नीरजवर हल्ला केला.

 

 

त्याने त्या धारदार सुऱ्याने नीरजवर इतके वार केले की त्याचा तिथेच मृत्यू झाला.

नंतर मारिया सकाळी ११ च्या सुमारास जवळच्याच एका मॉल मध्ये गेली आणि तिने बॅग, एयर फ्रेशनर, पडदे, चादरी आणि चाकू या सगळ्या वस्तू विकत घेतल्या. मग मारिया आणि मॅथ्यूने नीरजच्या मृतदेहाचे तब्बल ३०० तुकडे केले. क्रौर्याची हद्द पार करीत त्यांनी हे तुकडे वेगवेगळ्या बॅगांमध्ये भरले.

विकृतीची हद्द म्हणजे त्या दरम्यान म्हणजे नीरजच्या मृतदेहासमोरच मारिया आणि मॅथ्यू यांनी त्याच फ्लॅटमध्ये दोन वेळेला शारीरिक संबंध ठेवले.

 

 

त्यानंतर मारियाने तिच्या एका मित्राकडून त्याची कार उधार मागितली आणि नीरजच्या मृतदेहाचे तुकडे असलेल्या बॅग्स मारिया, मॅथ्यूने डिक्कीत भरल्या. पण हे करत असताना बिल्डिंगच्या सिक्युरिटीने त्यांना बघितले.

त्यानंतर ते गाडी घेऊन पेट्रोल पंपावर गेले. तिथे त्यांनी संध्याकाळी साडेचार वाजता पेट्रोलच्या दोन बाटल्या विकत घेतल्या आणि पुढे मनोरला गेले. मनोर मधील आमगावजवळील एका जंगलात त्यांनी नीरजच्या मृतदेहाचे तुकडे पेट्रोल टाकून जाळून टाकले. त्यानंतर ते रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबईत परत आले. त्यानंतर मॅथ्यू कोचीनला परत गेला.

गुन्हा उघडकीला कसा आला?

जेव्हा मारिया मॅथ्यूसह नीरजच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मित्राकडून गाडी उधार घेऊन मनोरला गेली होती तेव्हा तिने चुकून नीरजच्या फोनवर आलेला एक फोन उचलला होता. नीरजला मारल्यानंतर तिने नीरजचा फोन स्वतःकडे ठेवला होता. आणि जेव्हा नीरजचा फोन वाजला असता तिने तिच्या जीन्सच्या खिशातून फोन काढला आणि चुकून फोन रिसिव्ह झाला. पण नंतर तिने लगेच फोन कट केला.

पोलीस चौकशीत तिने खोटे सांगितले होते की ती त्यावेळी दादरला होती. पण नीरजचे मोबाईल लोकेशन मनोरचे दाखवत होते. पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा मारियाने गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली हे देखील सांगितले.

 

 

कोर्टाने मारिया सुसिराजला हत्येच्या गुन्ह्याखाली शिक्षा दिली नाही. तर पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिली. तिला तीन वर्षांची शिक्षा झाली. मॅथ्यूला हत्येच्या अपराधासाठी दहा वर्षांची आणि पुरावे नष्ट करण्याच्या अपराधासाठी तीन वर्षांची शिक्षा झाली.

 

 

असे हे नीरज ग्रोव्हर हत्याकांड आजही आठवले तरी ह्यातील विकृतीचा कळस बघून जीवाचा थरकाप उडतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version