आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सिद्ध अभिनेत्री, उत्तम नर्तिका आणि मनमोहक रूप असणाऱ्या श्रीदेवीजींना ओळखत नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही.आपल्या उत्तम अभिनयाने आणि नृत्याने त्यांनी करोडो लोकांच्या मनावर सदैव राज्य केले.
आज श्रीदेवीजीं आपल्यात नाहीत पण त्यांच्या कामामुळे त्या सतत आपल्या मनात राहतील यात शंका नाही.सिनेमा सृष्टीलीत प्रत्येक गाण्यामध्ये एक कथा आहे. हवा हवाई म्हणल्या बरोबर श्रीदेवीजींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो, त्यांच्याच गाण्याची ही सुंदर आठवण.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
१९८७ मध्ये आलेला श्रीदेवी,अनिल कपूर आणि अमरीश पुरी यांचा मिस्टर इंडिया हा चित्रपट खूप गाजला.कारण या चित्रपटाची कथा तर उत्तम होतीच पण या सिनेमातील सगळीच गाणी सुद्धा खूप सुंदर होती.
–
- अनिल माधुरीच्या ‘त्या’ सुपरहीट गाण्याचं शूटिंग चक्क किंग खानच्या ‘मन्नत’मध्ये झालं होतं!
- हिम्मतवाला ते इंग्लिश विंग्लिश : ‘हवाहवाई’ चा असामान्य प्रवास
–
या सिनेमात पत्रकार सीमा साहनी याचं पात्र श्री श्रीदेवीजींनी छान साकारल होत. याच सिनेमातील हवा हवाई या गाण्याने इतिहास घडवला.सिनेमा लोकप्रिय होण्यामागे किंवा गाजण्यामागे सिनेमातील गण्यांचाही तेवढाच महत्वाचा सहभाग असतो.
कित्येक सिनेमे त्यांच्या लोकप्रिय ठरलेल्या गाण्यामुळे ओळखले जातात.मिस्टर इंडिया या सिनेमाला कथा आणि गाणी दोन्ही उत्तम लाभले होते हे वेगळं सांगायची गरज नाही.
हवा हवाई हे त्यातलेच एक गाजलेले गाणे.या गाण्यासाठी संगीत दिले होते लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, गाणं बसवलं होतं सरोज खान यांनी, दिग्दर्शक होते शेखर कपूर,लेखक जावेद अख्तर तर गायिका होत्या कविता कृष्णमूर्ती.
सगळीच मंडळी खूप ताकदीची आणि दिग्गज होती.दिग्दर्शक शेखर कपूर यांना मधुबाला जी आवडात होत्या,या गाण्यासाठी त्यांना अशी नायिका हवी होती जीला बघून मधुबालाचे नृत्य,अभिनय आणि रुपाची आठवण होईल. हे पात्र रंगवताना श्री देविजि कुठेच कमी पडल्या नाहीत,पूर्ण ताकदीने त्यांनी ती भूमिका रंगवली.
कविता कृष्णमूर्ती यांनी आपल्या कारकीर्दीत खूप प्रसिद्ध गाणी गायली आहेत. पण कविता कृष्णमूर्ती या सिनेमासाठी फक्त शूटिंग पुरत्या गाणार होत्या सिनेमाच्या रेकॉर्डिंगच्या वेळी हे गाणं दुसऱ्या कोणाकडून तरी गाऊन घेतलं जाणार होत.
कारण संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची पसंती कविता कृष्णमूर्ती या नव्हत्या.कविता कृष्णमूर्ती यांच्या ऐवजी कदाचित आशाजींनी ते गायलं असतं.
कविता कृष्णमूर्ती यांनी या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. खूप मनापासून त्यांनी गाणं गायलं आणि काही दिवसांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा त्यांना फोन आला की तुम्ही जे गाणं शूटिंग पुरते गायलं आहे तेच गाणं सिनेमात सुद्धा ठेवण्यात येणार आहे तेव्हा कविताजी म्हणाल्या, ‘माझ्याकडून या गाण्यात एक चूक झाली आहे आपण परत एकदा गाऊया का ‘?? तेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल म्हणाले ‘मी तर खूपदा हे गाणं ऐकलय पण मला यात काहीच चुकीचं वाटलं नाही’. तेव्हा कविताजी म्हणाल्या या गाण्यात,
“जानू” जो तुमने बात छुपै या ऐवजी “जिनु” जो तूमने बात छुपाई अस गायले गेले आहे.
त्यावर लक्ष्मीकांत प्यारेलाल जी म्हणाले कदाचित पुन्हा गाताना अशी जादू होणार नाही आणि तुम्ही पण परत अस गाऊ शकणार नाही, हाच आवाज लागणार नाही. तेव्हा आपण हे असच गाणं सिनेमात ही घेत आहोत.
–
- या १० अभिनेत्रींनी लग्नाआधीच (!) केला होता ‘आई’ होण्याचा प्रताप…
- सरोज खान यांच्या मोहक हास्य व हावभावांच्या मागे एका दीर्घ खडतर जीवनाची सावली होती…
–
या गाण्यात जानू हा शब्द प्रयोग दोनदा करण्यात आला आहे. पहिल्या वेळी कवितजी “जानू” च ऐवजी “जीनु” म्हणाल्या आहेत आणि चूक लक्षात आल्याबरोबर दुसऱ्यांदा त्याबरोबर ‘जानू’ अस गायल्या आहेत.
कविता कृष्णमूर्ती यांची ही चूक काळा तीट लागल्याप्रमाणे तशीच राहिली आहे. कविता कृष्णमूर्ती यांच्यासाठी हे गाणं करिअरच्या शिखरावर पोहचविणारे सिद्ध झाले. या गाण्यामुळे श्री श्रीदेवीजींना एक ओळख मिळाली ती म्हणजे “मिस हवा हवाई” .
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.