तिच्या भेटीसाठी बेंगलोर टु नाशिक ड्राईव्ह, धर्मेंद्र-हेमामालिनीचे ६ मस्त किस्से!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
ड्रिमगर्ल हेमामालिनीचा आज वाढदिवस! गेली अनेक वर्ष या अभिनेत्रीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कित्येकांसाठी ती ड्रिमगर्ल होती आणि आजही आहेच. तिच्या मोहक दिसण्यावर, नृत्यावर आणि अभिनयावर लाखो लोक फिदा आहेत. अशा या ड्रिमगर्लबद्दलचे काही खास किस्से वाचूया –
१. तब्बल ४० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ सिनेमाने चित्रपटसृष्टीची गणितचं बदलून टाकली. या चित्रपटात हेमा मालिनीने ‘बसंती’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेचं गारुड प्रेक्षकांच्या मनावर इतकं आहे, की आजही तिला लोक ‘बसंती’ या नावानेच हाक मारतात.
२. धर्मेद्र आणि हेमामालिनी ही हिट जोडी आहे, त्यांची लव्हस्टोरी सुद्धा त्यांच्याइतकीच फिल्मी आहे. ‘तुम हसीं मैं जवां’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांचं प्रेम जुळलं. त्या दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेमभावना होत्या, पण धर्मेंद्र विवाहित असल्याने कोणी काहीच बोलत नव्हतं.
३. हेमा मालिनीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. धर्मेंद्र आणि हेमामालिनीचे भेटणे त्यांना अजिबात आवडत नसे, त्यांनी हेमामालिनी आणि जितेंद्रचे लग्न ठरवले होते.
४. हेमामालिनी आणि जितेंद्रचे लग्न होत असताना भर लग्नात धर्मेंद्र दारूच्या नशेत तिथे पोहोचला आणि त्याने हेमामालिनीला आपल्या प्रेमाची कबुली दिली.
५. शोलेच्या शूटिंग दरम्यान धर्मेंद्रने शूटिंगच्या टीमला लाईट कमी जास्त करण्यास मुद्दाम सांगितले होते, जेणेकरून त्याला हेमामालिनीसोबत पुन्हा पुन्हा सीन्स शूट करता येतील आणि त्याला तिच्यासोबत जास्त वेळ घालवता येईल.
६. एकदा हेमामालिनी नाशिकमध्ये शूटिंग करत होती आणि धर्मेंद्र बंगलोरमध्ये. अचानक धर्मेंद्र बंगलोरमधून गायब झाला, सगळे चिंतेत होते. दुसऱ्या दिवशी धर्मेंद्र हेमामालिनीला भेटण्यासाठी नाशिकला पोहोचला. तब्बल २४ तास ड्राईव्ह करून तो केवळ हेमाला भेटण्यासाठी आला होता. ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’ हे सांगण्यासाठी तो आला होता.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.