Site icon InMarathi

मॉलमध्ये फूड कोर्ट नेहमी सर्वात शेवटच्या मजल्यावर का असते? जाणून घ्या

mall image inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

हल्ली शॉपिंग मॉलमध्ये फक्त कपड्यांची खरेदी करायला जात नाहीत. सुईपासून ते टीव्ही आणि फर्निचरपर्यंत, स्टेशनरीच्या वस्तूंपासून ते वाण सामानापर्यंत सगळं एकाच छताखाली मिळतं. फक्त तुमची तासंतास उभे राहण्याची किंवा चालण्याची तयारी हवी. आणि मॉलमध्ये गेलं आणि खादाडी केली नाही असे होत नाही. किंवा बऱ्याचवेळा कंटाळा आलाय, बाहेर उन्हात-पावसात कुठे फिरणार? कुठे टाईमपास करणार? अशा वेळी अनेक लोक मॉलचा आसरा घेतात.

 

 

मस्त विंडो शॉपिंग करत थोडावेळ टाईमपास करायचा, आणि मग फूड कोर्टमध्ये जाऊन काहीतरी चमचमीत खायचं यासाठी सुद्धा लोक मॉल मध्ये जातात. किंवा हल्ली मल्टिप्लेक्स थिएटर्स सुद्धा मॉलमध्येच असतात. त्यामुळे सिनेमा बघायला गेलो आणि मग फूड कोर्टमध्ये गेलं नाही असं होत नाही.

फूड कोर्ट अगदी शेवटच्या मजल्यावर असते कारण आपण मॉलमध्ये फिरण्यास सुरुवात खालच्या मजल्यापासून करतो आणि फिरत फिरत वरच्या मजल्यापर्यंत येईस्तोवर आपण किती चाललोय हे आपल्याला कळत नाही.

 

 

फूड कोर्टमध्ये आपल्या तोंडाला पाणी सुटेल असे सगळे चमचमीत पदार्थ असतात. पाणीपुरी-पिझ्झापासून ते चायनीज -पंजाबी मेक्सिकन असे सगळे पदार्थ येथे असतात ज्यांच्या नुसत्या वासाने माणूस त्या ठिकाणी आपोआप ओढल्या जातो. तसेही मॉलमध्ये चालून चालून पाय दुखलेले असतात. तहान-भूक लागलेली असते. त्यामुळे थोड्यावेळ निवांत बसून गप्पा मारत काहीतरी चमचमीत खाल्ले की बरे वाटते.

१. मोठी जागा लागते

फूड कोर्ट म्हणजे एखाद्या हॉटेलपुरते मर्यादित नसते. फूड कोर्टमध्ये बरीच वेगवेगळ्या पदार्थांची दुकाने/हॉटेल्स असतात. त्यामुळे फूड कोर्टसाठी भरपूर मोठी जागा लागते. तसेच त्या ठिकाणी एका वेळेला कमीत कमी १००-२०० लोकांची बसायची व्यवस्था करावी लागते.

 

 

या सगळ्यासाठी अख्खा एक मजला लागतो. तसेच इतर दुकानांच्या गर्दीत खाण्याची दुकाने उठून दिसणार नाहीत म्हणून खाण्यासाठी एक वेगळाच विभाग असतो जिथे ग्राहकांना देखील पदार्थ घेऊन खाणे सोपे जाईल.

२. हॉटेलधारकांची सोय

वेगवेगळे फूड आउटलेट्स असल्याने तसेच अन्न शिजवायचे असल्याने त्यासाठी व्यवथित जागेची आवश्यकता असते तसेच योग्य व्हेंटिलेशन सुद्धा गरजेचे असते. त्यासाठी खाण्यासंबंधित एक वेगळाच विभाग असला तर ते सोयीचे पडते.

तसेच ग्राहकांना देखील एकाच ठिकाणी खाण्याचे विविध पर्याय मिळाले आणि त्यासाठी प्रशस्त जागा असली तर सोयीचे पडते. या कारणांमुळे फूड कोर्टसाठी एक वेगळा मजला ठेवलेला असतो.

 

३. ग्राहकांची मानसिकता

असे म्हणतात की माणसाचे लक्ष वेधून घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे त्याला रुचकर पदार्थांच्या सुगंधाने आकर्षित करून घेणे. काही व्यक्ती  सोडल्यास बाकीच्यांना चमचमीत पदार्थ खाण्याची आवड असते. आणि आपल्या आवडीच्या पदार्थांच्या सुगंधाकडे माणूस आपोआपच खेचला जातो.

 

forum malls

जर फूड कोर्ट खालच्या मजल्यावर ठेवले तर लोक बाकीचा मॉल फिरणारच नाहीत. फक्त फूड कोर्टकडे जातील आणि आपापल्या आवडीचे पदार्थ खाऊन घरचा रस्ता धरतील.

मग इतर दुकानांचा व्यवसाय कसा होईल? म्हणूनच सगळा मॉल फिरून झाल्यानंतर थकल्या-भागल्या, भुकेल्या लोकांना शेवटच्या मजल्यावरील फूड कोर्टमध्ये गेल्यावर निवांत बसवून पोटभर खायला घातले की मॉलमधील इतर दुकानांचा व्यवसाय तर होतोच शिवाय फूड कोर्टमधल्या हॉटेल्सचा देखील चांगलाच व्यवसाय होतो.

४. मार्केटींग स्ट्रॅटेजी

तुम्ही कधी पर्फ्युमची दुकाने मॉलमध्ये वरच्या मजल्यांवर बघितली आहेत का? यासाठी आपल्याला ‘ह्युमन बिहेवियर’ बद्दल जाणून घ्यावे लागेल. मॉल मध्ये दुकानांच्या जागा अगदी या ह्युमन बिहेवियरचा अभ्यास करून ठरवल्या असतात.

असे म्हणतात की जोवर माणूस फिरत फिरत मॉलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचतो तोवर तो कंटाळतो आणि त्याचा शॉपिंगमधला इंटरेस्ट कमी झालेला असतो. म्हणूनच फूड कोर्ट वरच्या शेवटच्या मजल्यावर असतात जेणे करून तिथे पोचेपर्यंत कंटाळलेली व्यक्ती तिथल्या चमचमीत पदार्थांचा सुगंध घेऊन फारशी भूक नसली तरी तिथे काही ना काही तरी नक्कीच विकत घेऊन खाईल.

 

bushmarketing.ca

या सगळ्या कारणांमुळे फूड कोर्ट मॉल मध्ये शेवटच्या मजल्यावर असते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version