आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
नवज्योत सिंग सिद्धू म्हटलं, की मध्यंतरी घडलेल्या या घटना नक्की आठवतील. आधी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धूमुळे दिलेला पदाचा राजीनामा, त्यानंतर स्वतः सिद्धूने पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देणं या गोष्टी अजूनही विस्मरणात गेलेल्या नाहीत.
नवज्योत सिद्धू म्हटलं, की वाद हे ओघाने आलेच, असं अनेकजण म्हणतात. क्रिकेट मालिका अर्ध्यातच सोडून मायदेशी परतणारा सिद्धू असो, किंवा कपिल शर्माच्या कार्यक्रमात ‘ठोको ताली’ म्हणत हसणारा आणि मनोरंजन करणारा सिद्धू असो. तो आला की काही ना काही वाद घडणार हे आताशा लोकांना ठाऊक झालंय.
हाच सिद्धू एक स्फोटक फलंदाज म्हणून भारतीय संघाचा भाग होता आणि तो काही काळ सचिनसोबत संघात खेळालाही आहे, हेसुद्धा तुम्हाला ठाऊक असेल. सचिनसोबत क्रिकेट खेळलेला सिद्धू त्याच्यासोबत फलंदाजी करत असतानाचा एका किस्सा आवर्जून सांगतो…
सिद्धू म्हणतो की…
सिद्धूच्या म्हणतो, की तो त्याचा वेस्ट इंडिजचा पहिला दौरा होता. अझरुद्दीनने टॉस हरला आणि भारतीय संघावर प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली. काहीशा ओलसर असणाऱ्या खेळपट्टीवर तो आणि सचिन फलंदाजीला उतरले.
लहानगा सचिन आणि त्याच्यासोबत सिद्धू मैदानावर असताना सिद्धूने प्रश्न केला, “गिला पीच हैं यार, क्या करेंगे”. यावर १६ वर्षांचा सचिन शांतपणे म्हणाला, “खेलेंगे रे”…
सिद्धू फलंदाजी करतोय, कर्टनी अँब्रोज गोलंदाजीला आलाय, त्याने एका नो बॉलसह एकूण ७ चेंडू टाकले. यातला एकही चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही. शरीराच्या वेगवेगळ्या भागावर चेंडू लागले. पहिली ओव्हर कशीबशी संपवून सिद्धू सचिनशी बोलायला गेला. त्यावेळी त्याने सचिनला सांगितलं, “तेंडल्या बॉल टप्पा पडतें ही शरारत कर रहीं हैं”…
पुढची ओव्हर टाकल्या इयन बिशप आला. १६० किमी (!) प्रति तास वेगाने तो गोलंदाजी करत होता, असं सिद्धू सांगतो. त्याने पहिला चेंडू टाकला आणि समोर सचिनला पाहताना सिद्धूच्या तोंडातलं चुईंग गम सुद्धा बाहेर आलं म्हणे. सचिन सरळ चालत पुढे आला बॉल फुलटॉस घेतला आणि त्याने सरळ षटकार ठोकला.
–
- पंजाब कॉँग्रेसच्या प्रेसिडेंटपदी ‘सिद्धू’ची निवड; वाचा त्याच्या वादग्रस्त कृत्यांचा पाढा!
- वसीम अक्रमच्या प्रश्नावर सचिनच्या ‘बॅट’ ने दिले तडाखेबाज उत्तर!
–
हे बघताच, सिद्धू सचिनशी बोलायला गेला आणि त्याने सचिनला प्रश्न केला “तेंडल्या, यह क्या किया रे?” यावर छोट्या सचिनचं उत्तर आलं, “शेरी, तुने बोला ना बॉल टप्पा पडते हीं शरारत कर रहीं हैं, तो मैने टप्पा ही नहीं पडने दिया रे”
सिद्धू थापाड्या आहे कारण…
आता त्याने हा किस्सा सांगितलाय तो व्हिडिओ एकदा पहा.
ऐकताना काही खटकलं का मंडळी? अहो सिद्धू धडधडीतपणे १९८७ म्हणतोय. पण सचिन तेंडुलकरचं पदार्पणच मुळी १९८९ साली झालं होतं. मग १९८७ साली ही घटना घडेलच कशी, नाही का? १६० किमीपेक्षा अधिक गतीने फक्त ५ गोलंदाजांनी चेंडू टाकले आहेत आणि त्या यादीत एकाही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समावेश नाही.
सचिन आणि सिद्धूने एकत्र सलामीला येण्याचं म्हणाल, तर सचिनने कारकिर्दीच्या सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. तो पहिल्यांदा सलामीला आला, पदार्पणानंतर जवळपास ३ वर्षांनी तेसुद्धा सिद्धू संघात नव्हता म्हणून…
सचिन १६ वर्षांचा होता, असं यात सिद्धूने म्हटलंय. १९८७ साली सचिन १६ वर्षांचा होता, हा जावईशोध त्याने लावलाय याविषयी अधिक काही बोलणे न लगे.
हाच किस्सा त्याने दुसऱ्या एका ठिकाणी सुद्धा सांगितला आहे. तोही जरा एकदा ऐका, म्हणजे सिद्धूच्या थापा नक्कीच स्पष्ट होतील.
एका ठिकाणी किस्सा सांगताना १९८७ हे वर्ष सांगणारा सिद्धू इथे मात्र १९८८ असं वर्ष सांगतो. सिद्धूचं पाठांतर काहीसं कमी पडलं असावं नाही का…! दोन्हीवेळा किस्सा सांगताना त्याने आणखी काही गोष्टी चुकवल्या आहेत. कमेंट्समधून पटापट सांगा बरं, काय काय फरक आहे, या दोन्ही व्हिडिओमधल्या सिद्धूच्या वाक्यांमध्ये…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.