Site icon InMarathi

लालूंच्या चारा घोटाळ्याचा पर्दाफाश करणारा हा ऑफिसर सध्या काय करतो?

chara inmarathi 3

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सुशांत सिंग केस प्रकरणापासून ते अगदी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यापर्यंत, यातील घटनांचं गूढ आजवर उकलले गेले नाही, सुशांत सिंग प्रकरणात पोलीस अपयशी ठरल्यानंतर सीबीआयला पाचारण करण्यासाठी जे राजकरण झालं ते आपण पहिलेच. सीबीआयलासुद्धा या केसमध्ये काही सापडले नाही आणि त्यांनी सुशांतच्या मृत्यूची फाईल बंद करून टाकली.

अंबानींच्या घरावरून झालेल्या प्रकरणावरून अनेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या, वरिष्ठांचे दबाव, पोलीस खात्यातील राजकारण, परमबीर सिंग यांना दोषी ठरवण, मग त्यांनी केलेले आरोप या एकूणच प्रकारातून केसचा निकाल अजून बाहेर आला नाही.

 

 

आपल्याकडे अनेक सिनेमातून आपण बघत असतो राजकारणी आपल्या फायद्यासाठी आयपीसी आयएएस ऑफिसर्स यांचा वापर करतात. गंगाजल सारख्या सिनेमातून एका प्रामाणिक एसपी ऑफिसर, भ्रष्ट यंत्रणा, नेत्यांची गुंडगिरी, जातीचं राजकारण, समाजाची मानसिकता या गोष्टी प्रकाश झासारख्या दिग्दर्शकाने उत्तमरीत्या दाखवल्या.

 

 

जसे भ्रष्ट अधिकारी आहेत तसे कर्तव्यदक्ष अधिकारी या देशात आहेतच अशाच एका अधिकाऱ्याची नेमणूक चक्क पंतप्रधान मोदींच्या सल्लगार पदी झाली आहे कोण आहे तो ऑफिसर चला तर मग जाणून घेऊयात…

कोण आहेत ते अधिकारी?

अमित खरे असे त्यांचे नाव असून अनेक मोठमोठाल्या पदांवर त्यांनी काम केले आहे. ३०सप्टेंबरला उच्च शिक्षा सचिव या पदावरून ते सेवानिवृत्त झाले, पण मोदींनी पुन्हा त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे ती म्हणजे सल्लगारपदाची. मंगळवारी म्हणजे कालच त्यांची निवड करण्यात आली आहे.

 

अमित खरे हे मूळचे बिहारचेच, सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला, बिहाराच्या केंद्रीय विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले तर महाविद्यलयीन शिक्षण दिल्लीमधून केले. पुढे मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिल्याने, मेहनत करून १९८५ च्या बॅच मधून पासआउट होऊन आयएसएस ऑफिसर बनले.

चारा घोटाळा कसा उघडकीस आणला?

बिहारसारख्या राज्यावर आजही अनेक प्रश्न आववासूनउभे आहेत, तो काळ होता १९९५, ९६चा जेव्हा बिहार राज्य आर्थिक संकट सापडले होते. लालूप्रसाद हे मुख्यमंत्री होते तर वित्त आयुक्त होते व्ही.एस दुबे. नोकरीचा भाग म्हणून त्यांनी विविध भागांचा आढावा घेत होते तेव्हा त्यांचा लक्षात आले की काही विभागांकडून पुरवलेल्या निधीपेक्षा जासत निधी काढला गेला आहे.

पश्चिम सिंहभूम जिल्ह्याचे दंडाधिकारी असताना त्यांच्या निदर्शनास आले की जिल्ह्याच्या पशु संवर्धन खात्याने २ कोटी रुपये दोनदा काढल्याचे आढळून आले.

 

 

तातडीने दुबेंनी त्या विभागाला कारणे दाखवा नोटीस पाठवली मात्र विभागाने कोणतेच प्रतिउत्तर त्याला दिले नाही.योगायोगाने अमित खरे यांची बदली पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात झाली होती त्यामुळे दुबेंनी खरेंना पशु खात्यावर धाड टाकण्याचे निर्देश दिले, जेव्हा प्रत्यक्ष अमित खरे यांनी धाड टाकली तेव्हा सगळ्या फायली नष्ट केल्या होत्या.

अमित खरे यांचा संशय वाढत गेला आणि त्यांनी एक एक करून या घोटाळ्यात चौकशी करायला सुरवात केली, आणि चारा खरेदीसाठी केलेली ही मोठी उलाढाल होती असे दिसून आले, चौकशी करता करता हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचले.

गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे खरे यांनी केवळ तत्कालीन सरकार नव्हे तर आधीच्या सरकराचा देखील यात सहभाग होता असे निदर्शनात आणले. नंतर हे प्रकरण गुंतागुंतीचे होत गेले अनेक मोठ्या व्यक्तींची नाव यात येत गेली, अखेर सीबीआयकडे हे प्रकरण गेले, एकूण १००० कोटींचा बिहारमधला सर्वात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला.

 

 

एखादा  राजकारणी जेव्हा घोटाळ्यात अडकतो तेव्हा त्याच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होते. लालूंचे नाव या घोटाळ्यात आल्याने विरोधी पक्षाने आक्रमक होऊन राजीनाम्याची मागणी केली. विरोधकांचा वाढत रोष बघता अखेर लालूंनी राजीनामा दिला, परंतु याच दिवशी लालूंच्या पत्नीला मुख्यमंत्री म्हणून पक्षाकडून घोषित करण्यात आले.

 

या सगळ्या घोटाळ्यात हिरो ठरले ते अमित खरे, मूळचे बिहरचेच असल्याने त्यांना राज्याची परिस्थितीची संपूर्ण माहिती होती. ज्या राज्याने देशाला सर्वाधिक अधिकारी दिले त्याच राज्यात जेव्हा असे घोटाळे होतात. अमित खरे यांना पहिल्यापासून शिक्षणक्षेत्राची आवड आहे, २०२० सालापासून त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक बदल केले आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version