Site icon InMarathi

या ५ गोष्टी दाखवून देतात, तुम्ही मानसिकरित्या एकदम फिट आहात!

emotional inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणूस निरोगी असणे म्हणजे काय? तर त्याची शारीरिक आणि मानसिक अवस्था चांगली असणे. माणसाची मानसिक अवस्था वाईट असेल तर त्याचे शारीरिक आरोग्य नक्कीच बिघडते. पण माणसाची इच्छाशक्ती दांडगी असेल तर तो असाध्य शारिरीक रोगातून देखील ठणठणीत बरा होतो अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला बघतो. म्हणूनच मानसिक आरोग्य चांगले राखणे आवश्यक आहे.

 

 

 

मागच्या वर्षी कोव्हीड आल्यापासून आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले. आयुष्यातील ताणतणाव वाढला. एकटेपणा, नैराश्य, अँग्झायटी व पॅनिक ऍटॅक्सने अनेक लोकांना ग्रासले. त्यामुळे निद्रानाशाचा विकास अनेक लोकांना जडला. हे एक दुष्टचक्र आहे. मानसिक त्रासामुळे शारीरिक विकार होतात आणि मग शारीरिक त्रास होऊ लागल्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच मानसिक स्वास्थ्याला महत्व देणे अत्यंत आवश्यक आहे.

कधीतरी चिडचिड होणे, निराश वाटणे, कशातच मन न रमणे, अस्वस्थ वाटणे, निराश वाटणे हे अगदी सामान्य आहे. कधीतरी निराश वाटणे म्हणजे आपल्याला नैराश्याचा विकार जडला आहे असे वाटून घेऊ नये. मग आपण मानसिकदृष्ट्या सुदृढ आहोत की नाही हे कसे ठरवायचे? तुम्ही जर पुढील पाच गोष्टी करत असाल तर तुम्हाला कुठलाही मानसिक आजार झालेला नाही आणि तुमचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे याची खात्री बाळगा.

 

 

 

१. आयुष्यातील सामान्य ताणतणाव सहज हाताळणे.

मानसिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती आयुष्यातील सामान्य ताणतणाव सहजपणे हाताळू शकत नाही. इतरांच्या दृष्टीने लहानसहान असलेल्या बाबींचे त्यांना टेन्शन येते. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होती. पण तुम्ही जर रोजच्या आयुष्यातील सामान्य तणावपूर्ण परिस्थिती शांत डोक्याने हाताळू शकत असाल आणि त्यातून पटकन मार्ग काढून समस्या सोडवत असाल तर तुमचे मानसिक आरोग्य चांगले आहे याची तुम्ही खात्री बाळगा.

 

 

तुम्हाला माहिती असेल की माणसाचे मूड बदलणे हे अगदी सामान्य आहे आणि नैसर्गिक आहे, तसेच आयुष्य सुंदर आहे आणि आपण ते आणखी छान ठेवू शकतो असा तुमचा विश्वास असेल तर काळजी करू नका तुम्ही मानसिक दृष्ट्या अत्यंत खंबीर आणि सामर्थ्यवान आहात.

२. तुमची मनस्थिती /मूड सामान्यपणे चांगला असतो.

तुमचे मानसिक आरोग्य चांगले असेल तर सामान्यपणे तुमचा मूड चांगला असतो. दिवसाची सुरुवात तुम्ही आनंदाने उत्साहाने करता. तुम्हाला सुख आणि समाधानाची भावना अनुभवता येते. लहान लहान गोष्टींतला आनंद तुम्ही शोधता.

 

दुसऱ्याविषयी तुम्हाला कणव वाटते आणि त्रासात असलेल्यांना तुम्ही आनंदाने मदत करू इच्छिता. जरी थोड्या काळासाठी तुमच्या मनात नकारात्मक भावना आल्या तरीही त्यांच्यावर तुम्ही पटकन मात करून सकारात्मक विचारांनी समस्येतून मार्ग काढता. कुठलीही समस्या आली तरी तुम्ही त्यासाठी सतत स्वतःला दोषी मानत नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही हे करत असाल तर तुमचे मानसिक आरोग्य चांगले आहे.

३. लोकांना नाही म्हणणे.

मानसिकसदृष्ट्या बलवान असलेल्या व्यक्तींना दुसऱ्याला नाही म्हणणे सोपे जाते. आपल्याला जर एखादी गोष्ट जमण्यासारखी नसेल तर समोरच्याला मोकळेपणाने नाही सांगणे यासाठी एक आत्मविश्वास लागतो. बहुतांश लोक भिडस्त स्वभावाचे असतात.

दुसऱ्याला नाही म्हणण्यापेक्षा ते स्वतःला त्रास करून घेणे पसंत करतात. दुसऱ्याला राग येईल, वाईट वाटेल, ती व्यक्ती दुखावेल किंवा आपल्याशी भांडेल किंवा संबंध तोडेल ह्या भीतीपायी आपण अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध करत असतो. याला मानसशास्त्रात “पीपल प्लिझिंग पर्सनॅलिटी” असे म्हणतात. असा स्वभाव तयार होण्यासाठी अनेक कारणे असतात पण याच गोष्टींचा आपल्याला नंतर शारीरिक -मानसिक त्रास होतो.

 

 

दुसऱ्याची संपूर्ण “इमोशनल रिस्पॉन्सिबिलिटी” आपली नव्हे. प्रत्येक जण आपापल्या मानसिक अवस्थेसाठी जबाबदार असतो हे लक्षात ठेवून तुम्ही मोकळेपणाने प्रसंगी समोरच्याला “नाही” म्हणू शकत असाल तर तुमचे मानसिक आरोग्य अगदी उत्तम आहे.

४. तुमचे नातेसंबंध निरोगी असतात.

आपल्या मानसिक आरोग्याचा आपल्या आयुष्यातील व्यक्तींशी फार जवळचा संबंध असतो. आपले मानसिक आरोग्य जर चांगले असेल तर अर्थातच आपली मनःस्थिती चांगली असते.

 

 

आपण दुसऱ्याशी सहसा वाईट वागत नाही आणि दुसऱ्याला वाईट वागवत देखील नाही. म्हणजेच तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी असाल तर तुम्ही तुमचे प्रेम आणि आदर त्यासाठी लायक असणाऱ्यांनाच देता आणि टॉक्सिक लोकांमागे व टॉक्सिक नात्यांमध्ये स्वतःचा वेळ व शक्ती खर्च करत नाही. तसेच तुमचे तुम्ही दुसऱ्याचे टॉक्सिक वागणे उगाच सहन करत नाही.

५. तुम्ही एकाच वेळेला सगळ्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही.

आपण एकाच वेळेला सर्वांना आनंदात ठेवू शकत नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. एकाच वेळेला सर्वांच्या मनाप्रमाणे घडणे अशक्य आहे हे अंतिम सत्य आहे. तुम्हीही काहीही केलंत तरी कुणी ना कुणी नाराज होणारच. तुम्हाला सगळ्यांचे वागणे पटत नाही तसेच सगळ्यांना तुमचे वागणे १०० टक्के पटायलाच हवे असे नाही. आणि हे सत्य ज्याने स्वीकारले ती व्यक्ती आयुष्यात सुखी होते.

 

मानसिक दृष्ट्या खंबीर असलेली व्यक्ती उगाच दुसऱ्याला त्रास द्यायला जात नाही किंवा वादविवाद – भांडणे ओढवून घेत नाही. पण प्रत्येकाला आपले वागणे आणि म्हणणे पटवून द्यायच्या भानगडीत देखील पडत नाही. काहीही केलं तरी लोक तर बोलणारच हे सत्य स्वीकारून जी व्यक्ती लोकांच्या बोलण्याचा स्वतःवर परिणाम करून घेत नाही त्या व्यक्तीची मानसिक शांतता कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.

तुम्हीही जर असे असाल तर काळजी करू नका तुमचे मानसिक आरोग्य अगदी चांगले आहे. कीप इट अप!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version