Site icon InMarathi

जगातल्या सर्वात उंच बुर्ज खलिफा इमारतीचं ‘टाटा’ शी असलेलं नातं फार कमी भारतीयांना माहित आहे!

tata group inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

एअर इंडियाची मालकी तब्बल ६८ वर्षांनी टाटा समुहाकडे आल्यानंतर पुन्हा एकदा टाटा ग्रूपची यशोगाथा गायली जात आहे. जे आर डी टाटांनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.

 

 

केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक कार्याचाही वसा घेतलेला टाटा समुह हा कायमच भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

देशासह परदेशातही टाटा समुहाने यशाची अनेक शिखरं सर केली आहेत. मात्र तुम्हाला ठाऊक आहे की, बुर्ज खलिफा या जगप्रसिद्ध इमारतीतही टाटा समुहाचं योगदान आहे.

कोणतंही क्षेत्र असो, टाटा समुह नेहमीच आपली चमक दाखवतो. मात्र याची खरी प्रचिती येते ती बुर्ज खलिफाच्या बांधकामावरून!

बुर्ज खलिफाबद्दल…

दुबई सहलीत बुर्ज खलिफावरून संपुर्ण दुंबईदर्शन केलं नाही तर त्या सहलीची मजाच येत नाही असं म्हटलं जातं. झगमगत्या इमारतीत मजल्यावर मजले चढणं हा कोणत्याही पर्यटकासाठी आनंदाचा, चित्तथरारक क्षण असतो.

जगातील सर्वात मोठी इमारत असलेल्या बुर्ज खलिफाची उंची २७२२ फुट इतकी आहे.

 

youtube.com

 

२००४ साली याचं बांधकाम सुरु करण्यात आलं, त्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर हा अविष्कार साकारला गेला. दुबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर उंची प्राप्त करून देण्यात या इमारतीचा सिंहाचा वाटा आहे.

सुरवातीला या इमारतीचं नाव बुर्ज दुबई असं ठेवण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर अबुधाबीचे राजा खलिफा बिन जायेद यांच्या नावावरून बुर्ज खलिफा असं नामांतरण करण्यात आलं.

टाटांचं योगदान

काही वर्षांपुर्वी टाटा समुहाने सोशल मिडीयावर एक प्रश्न उपस्थित केला होता. बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीच्या बांधकामात कोणाचं योगदान आहे ठाऊक आहे का?

त्यावर अनेक युजर्सनी वेगवेगळी उत्तरं दिली.

त्यावर टाटाग्रुपकडून उत्तर देण्यात आलं की, १९४३ साली बांधण्यात आलेला हावडा ब्रीज ते दुबईतील बुर्ज खलिफापर्यंतच्या अनेक बांधकामांमध्ये टाटा समुहाचं योगदान आहे.

बुर्ज खलिफाच्या बांधकामासाठी जे स्टील वापरण्यात आलं आहे ते टाटा समुहाचं उत्पादन आहे. टाटा युरोपने तब्बल ३९००० टन स्कीलचं उत्पादन केलं असून त्यातूनच हा जागतिक विक्रम करणारा अविष्कार साकारला आहे.

 

 

किंबहुना व्होल्टासच्या सहकार्याने १३००० टन च्या एसीच्या मदतीने या इमारतीचं तापमान थंडगार ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

याचाच अर्थ जगातील सर्वात उंच इमारतीतही टाटा समुहाची हुशारी, कार्यक्षमता, कुशलता यांची प्रचिती येते.

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच ही बाब आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version