' नवरात्रोत्सवात कंडोमची सर्वात जास्त विक्री होण्यामागे ही आहेत धक्कादायक कारणं! – InMarathi

नवरात्रोत्सवात कंडोमची सर्वात जास्त विक्री होण्यामागे ही आहेत धक्कादायक कारणं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

संपूर्ण भारतात ज्या थाटात गणेशोत्सव, दिवाळी, असे सण साजरे केले जातात, त्याच भारतात नवरात्रोत्सवसुद्धा अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो. नवरात्र म्हंटलं की आपल्यासमोर बऱ्याच गोष्टी येतात.

९ दिवस निर्जळी उपास करणारे लोक, अनवाणी फिरणारी लोकं, ९ दिवस ९ रंगाचे कपडे परिधान करून सेलिब्रेशन करणारी लोकं आणि खासकरून महिला, ९ दिवसातली देवीची रूपं,  घागरी फुंकणे वगैरे वगैरे.

या सगळ्यापलीकडे मेट्रो सिटीजमध्ये किंवा गुजरातमध्ये या ९ दिवसांत सर्वात जास्त क्रेज असते ती गरब्याची.

 

garba inmarathi

 

गेलं वर्षं तर कोरोनामुळे कोणताच सण साजरा करता आला नव्हता त्यामानाने यावर्षी बऱ्यापैकी सूट मिळाली असली तरी सार्वजनिक ठिकाणी गरबा खेळण्यास अजूनही परवानगी नाही.

खासगी सोसायटी किंवा आवारात दांडिया खेळल्या जात आहेत पण मोठमोठ्या शहरांमध्ये भल्या मोठ्या पटांगणावर खेळला जाणाऱ्या गरब्याचं स्वरूप सध्या बघायला मिळत नाहीये.

गुजराती, मराठी, पंजाबी, बंगाली कुणीही असो प्रत्येकाला या गरब्यामध्ये थीरकायला भाग पाडणारे ऑर्केस्ट्रा, रंगीबेरंगी कपडे घालून त्या तालावर ठेका धरणारे तरुण तरुणी तसेच मोठी मंडळी, एकंदरच एक स्वतंत्र मोकळं वातावरण हे चित्र आपल्याला प्रत्येक नवरात्रीत अनुभवायला मिळतंच.

garba playinginmarathi

 

या सगळ्याबरोबरच याच देवीच्या नवरात्रोत्सवात कंडोम म्हणजेच निरोधची विक्री ही सर्वात जास्त होते ही कल्पना तुम्हाला आहे का? ऐकून धक्का नक्कीच बसला असेल ना, आज या लेखातून नवरात्र, गरबा आणि कंडोम यांचं नेमकं कनेक्शन काय ते जाणून घेऊया.

तुम्हाला ही गोष्ट कितीही हास्यास्पद वाटत असली तरी ती तितकीच खरी आहे. नवरात्रीच्या कालावधीत कंडोमची विक्री ही वेगाने वाढते. गरबा कोरिओग्राफर, सेलिब्रिटीजप्रमाणे वेगवेगळ्या कंडोम ब्रॅंडचीसुद्धा या काळात चांगलीच चलती असते.

मुंबई दिल्ली इथे २५ टक्के तर गुजरातसारख्या राज्यात ५० टक्क्यांनी कंडोमची विक्री या काळात वाढते असं एका अहवालात स्पष्टपणे मांडण्यात आलं आहे.

 

navratri condoms inmarathi

 

मुळात नवरात्रोत्सवात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात सकाळी प्रचंड उष्ण हवामान आणि रात्रीची हलकी थंडी अशा वातावरणामुळे एकंदरच एक सुखद माहोल तयार झालेला असतो.

याच दरम्यान बरेच तरुण तरुणी नटून सजून गरबा खेळायला एका ठिकाणी एकत्रित येतात, एकमेकांसोबत मनसोक्त गरबा खेळतात आणि वेळ घालवतात आणि याच मोकळ्या वातावरणात मनावरचा तसेच शारीरिक ताण हलका होतो आणि याच दरम्यान बरीचशी जोडपी आपसूकच कॅज्यूअल सेक्सला प्राधान्य देतात.

या काळात बऱ्याचशा घरातून मुलामुलींना थोडीफार सूट, मोकळीक देण्यात येते म्हणून तर बराच तरुण वर्ग या सणाची आतुरतेने वाट बघत असतो, की या निमित्ताने आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत शारीरिक जवळीक निर्माण करता येईल.

आपल्या देशात सेक्स याकडे ते टॅबू म्हणून बघितलं जातं, याविषयी उघडपणे चर्चा करायला सुद्धा भलेभले लोकं संकोच करतात पण याच देशात नवरात्रिसारख्या पवित्र देवीच्या सणादरम्यान कंडोम तसेच गर्भनिरोधक गोळ्यांचा खप जास्त वाढतो हा केवढा मोठा विरोधाभास आहे.

 

condoms inmarathi 2

 

गुजरातमध्ये अहमदाबाद किंवा सूरतसारख्या शहरात या उत्सवादरम्यान जिथे गरबा आयोजित केला जातो तिथे कित्येक वॉलंटियर हे सेफ सेक्स तसेच एड्सबद्दल जनजागृती करताना आढळून येतात.

काही तज्ञांच्या अभ्यासानुसार वातावरणातील बदलामुळे होणारे हारमोनल बदल आणि रात्रभर बाहेर भटकण्यासाठी घरातून मिळणारी सूट ही यामागची २ मुख्य कारणं आहेत.

फक्त कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्याच नव्हे तर गुजरातमध्ये या ९ दिवसात प्रायव्हेट डिटेक्टिवलासुद्धा चांगलीच मागणी असते. आपली मुलं किंवा मुली जेव्हा गरबा खेळण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यावर नजर ठेवायला प्रायव्हेट डिटेक्टिव नेमले जातात असंसुद्धा एका रिपोर्टमध्ये म्हंटलं आहे.

बऱ्याचदा कित्येक हिंदी सिनेमांमध्येसुद्धा गरब्याच्या गाण्यानंतर हमखास हीरो हिरॉईनमधला रोमान्स दाखवला जातो. शिवाय ज्या लोकांना या सगळ्या थिओरीज चुकीच्या वाटतात त्यांनी एका गोष्टीचे जरूर निरीक्षण करावे.

 

navratri songs inmarathi

जर एखादी वस्तु सर्वात जास्त विकली जात असेल तर तिचं मार्केटिंग, जाहिरात जोरदार केली जाते, जसं उदाहरणार्थ आईसक्रीमची जाहिरात मोठ्याप्रमाणावर केल्यावर आईसक्रीम सर्वात जास्त विकलं जातं. पण कंडोमच्या बाबतीत तसं होत नाही, इतर उत्पादनांप्रमाणे त्याचं एवढं मार्केटिंग केलं जात नाही, आणि तरी या कालावधीत कंडोम सर्वात जास्त विकले जात असतील तर या सगळ्या कहाणीमागे काहीतरी तथ्य नक्कीच आहे.

आपण या सगळ्या गोष्टी कितीही नाकारल्या तरी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यात काहीच गैर नाही. पोटाप्रमाणेच शरीराचीसुद्धा भूक असते, गरजा असतात. फक्त त्या गरजा भागावताना इतर गोष्टींचेसुद्धा भान असायलाच हवे, आणि पुढे काही समस्या उद्धवल्यास तिला तोंड देण्यासाठी तुम्ही सक्षम असायला हवं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?