दुसऱ्या महायुद्धादरम्यान तब्बल २ टन सोनं वाहून नेणारी पाणबुडी अजूनही बेपत्ता आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
समुद्राच्या पोटात असंख्य गोष्टी दडलेल्या आहेत ज्यांची आपल्याला कल्पनाही नाही. असे म्हणतात की पृथ्वीवर असलेल्या महासागरांपैकी फक्त पाच टक्के समुद्र माणसाला ठाऊक आहे. उरलेल्या ९५ टक्के समुद्रात कुठली रहस्ये लपलेली आहेत हे सध्यातरी आपल्याला माहित नाही. पण माणसाला कायमच समुद्राची ओढ आहे आणि समुद्राच्या तळाशी जाऊन तिथले एक वेगळेच जग बघण्याची इच्छा आहे.
निसर्गाने साथ दिली तर ठीक, नाहीतर खराब हवामानामुळे कितीतरी मोठमोठी जहाजे समुद्राच्या तळाशी गेली आहेत. पूर्वी बुडालेल्या या जहाजांचा पाणबुडीतून शोध घेण्याच्या मोहीमा देखील सुरूच असतात. त्यातील काही जहाजे समुद्राच्या पोटात सापडतात पण काही अशीही जहाजे असतात ज्यांचे काय झाले याचा पत्ताही लागत नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
अशीच एक पाणबुडी होती जिच्यात म्हणे दोन टन सोने होते, ती गायब झाली आणि तिचा आजही पत्ता लागत नाही.
I-52 (Dai Gojūni Sensuikan) असे या जपानी पाणबुडीचे नाव होते. तिचे कोड नेम momi असे होते. ही सामानाची वाहतूक करणारी सी थ्री प्रकारातील पाणबुडी होती. इंपिरियल जॅपनीज नेव्हीची ही पाणबुडी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला एका गुप्त मिशनसाठी फ्रान्सहुन पाठवण्यात आली होती.
या पाणबुडीला जपानची “गोल्डन सबमरीन” असे म्हणत असत. कारण जेव्हा ही पाणबुडी शेवटची निघाली तेव्हा तिच्यात सोने होते. हे सोने जर्मनीला पाठवण्यात येत होते. जर्मनीकडून शस्त्रास्त्रे आणि इतर काही यंत्र विकत घेतल्याची किंमत म्हणून हे सोने जर्मनीला या पाणबुडीतून पाठवण्यात आले होते.
असे म्हणतात की जर्मनीहून परत येताना या पाणबुडीतून ८०० किलो युरेनियम ऑक्साइड फ्रान्सला पाठवण्यात येणार होते. नंतर हे युरेनियम ऑक्साइड जपानला पाठवून एक रेडिओलॉजिकल शस्त्र (अणुबॉम्ब) तयार करण्यात येणार होते.
१० मार्च १९४४ रोजी ही पाणबुडी पहिल्यांदाच जपानच्या कुरे बंदरावरून निघाली आणि सिंगापूरचे सासेबो बंदर पार करून पुढे निघाली. या पाणबुडीत ९.८ टन molybdenum, ११ टन टंगस्टन, २.२ टन सोने , ३ टन ओपियम आणि ५४ किलो कॅफिन असे सामान होते. सोन्याच्या १४६ विटा होत्या आणि ह्या विटा ४९ धातूच्या पेट्यांमध्ये पॅक केल्या होत्या.
नाझी जर्मन ऑप्टिकल टेक्नॉलिजीची किंमत म्हणून हे सोने जर्मनीला पाठवण्यात येत होते. पाणबुडीत १४ प्रवासी देखील होते. हे प्रवासी म्हणजे जपानी तंत्रज्ञ होते. या तंत्रज्ञांना अँटी एअरक्राफ्ट गन्स आणि टॉर्पेडो बोटींमध्ये लागणाऱ्या इंजिनांमध्ये असलेल्या जर्मन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी पाठवले होते.
जपानहून निघाल्यानंतर या पाणबुडीने सिंगापूरला एक हॉल्ट घेतला. सिंगापूरहून या पाणबुडीत आणखी १२० टन टिन, ५९.८ टन कच्चे रबर आणि ३.३ टन क्विनाईन भरले. क्विनाईन हे औषध मलेरिया रोगावर आहे. तर ही पाणबुडी नंतर हिंद महासागर पार करून अटलांटिक महासागरात पोचली.
–
- आजवर कोणालाही सोडवता न आलेली ७ रहस्यमय कोडी! वाचा
- पंतप्रधान पोहायला गेले आणि बेपत्ता झाले, यामागचं रहस्य आजतागयत उलगडलेलं नाही!
–
६ जून १९४४ रोजी बर्लिन मधील जपानी नेव्हीच्या राजदूतांनी ऍडमिरल कोहिमा हिदाओ यांना सिग्नल पाठवला की शत्रू नॉर्मंडी येथे येऊन पोचले आहेत आणि पाणबुडीवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे त्यांना पाणबुडी फ्रांस ऐवजी नॉर्वे येथे नेण्यास सांगण्यात आले.
तसेच वाटेत २२ जून १९४४ रोजी रात्री ९:१५ वाजता जर्मन पाणबुडीची भेट घेण्यास सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना आवश्यक ती माहिती, ठिकाण सांगण्यात आले. परंतु हा संदेश अमेरिकन हेरांच्या कानावर पडला. सिंगापूरहून निघाल्यापासून I-52 वर जपान आणि जर्मनीचे बारीक लक्ष होते.
२२ जून १९४४ रोजी आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून १५७४ किमी लांब I-52 ची यु-५३० या बोटीशी भेट झाली.
या बोटीतून आय-५२ मध्ये इंधन भरण्यात आले आणि Naxos FuMB 7 रडार डिटेक्टर आणि एनिग्मा कोडिंग मशीन पाणबुडीला देण्यात आले. तसेच दोन रडार ऑपरेटर्स आणि एक जर्मन ऑफिसरसुद्धा पाणबुडीत आले.
शत्रूंनीसुद्धा पाणबुडीवर नजर ठेवलेलीच होती. नाझी यु-५३० बोटीशी भेट झाल्यानंतर शत्रूंनी त्यांचे सबमरीन हंटर युनिट या पाणबुडीवर हल्ला करण्यासाठी पाठवले. २४ जून १९४४ रोजी शत्रूंनी टॉर्पेडोने हल्ला करून ही पाणबुडी यशस्वीरीत्या नष्ट केली आणि ही पाणबुडी समुद्राच्या तळाशी गेली.
त्यानंतर अनेक वर्षे या पाणबुडीबद्दल कुणालाही आठवण नव्हती. परंतु १९९० च्या दशकात समुद्रातील खजिना शोधणाऱ्या शोधकर्त्यांनी या पाणबुडीचा शोध घेण्याचे मिशन हाती घेतले. कारण या पाणबुडीत थोडेथोडके नव्हे तर २.२ टन सोन्याच्या विटा होत्या.
पाणबुडीच्या शोधात असलेल्या पॉल टिडवेल यांना एक धातूची पेटी देखील मिळाली पण दुर्दैवाने त्यात सोने नाही तर ओपियम होते. तरीही टिडवेल यांनी हार न मानता पाणबुडी आणि सोन्याचा शोध सुरूच ठेवला परंतु आजतागायत त्या सोन्याचा पत्ता लागलेला नाही.
१२५ मिलियन डॉलर्स इतक्या किमतीचे सोने आजही अटलांटिक महासागराच्या तळाशी पडून आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.