आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
कोई बी धंदा छोटा नाही होता, असं थाटात शाहरुख खान रईस सिनेमात आपल्या आईला सांगतो. अगदी खरं आहे कोणतेही काम, व्यवसाय हा छोटा किंवा कमी दर्जाचा नसतो तुम्ही तो किती प्रामाणिकपणे करताय यावर अवलंबून असते. आज कोरोनामुळे अनेकनाचे उद्योगधंदे बसले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे आता देशात रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे
आज सरकारी नोकरी सोडली तर इतर खाजगी नोकऱ्यांमध्ये कुठेच स्थिरता नाही. मोठमोठाल्या कंपन्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. हे झालं नोकरीचं आणखीन एक असं क्षेत्र आहे जिथे आज काम आहे उद्या असेलच याची शाश्वती नाही, ते क्षेत्र म्हणजे सिनेमा आणि मनोरंजनाचं क्षेत्र…
आज देशभरातुन अनेक कलाप्रेमी, अभिनेते, तंत्रज्ञ या बॉलीवूडच्या झगमगाटाला आकर्षित होऊन मुंबईत दाखल होतात. अनेकांच्या डोळ्यात आपण देखील शाहरुख खानसारखे स्टार बनू ही स्वप्न तरळत असतात, मात्र शाहरुखसारखा एकमेवच होऊ शकतो हे बहुदा ते विसरतात..
मुंबईसारख्या शहरात तर कोणीच उपाशी पोटी झोपत नाही मात्र मनोरंजनाच्या क्षेत्रात मात्र कधी काम मिळेल याच शाश्वती नाही, अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो, स्ट्रगल खरा तर कोणालाच चुकलेले नाही.
वर्षानुवर्षे मेहनत घेऊन सुद्धा अनेक कलाकरांना काम मिळत नाही, नैराश्य येऊन ते आपली वेगळी वाट धरतात, अशाच एका कलाकाराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्या कलाकाराने काही काळ एका ढाब्यावर काम केले आहे, कोण आहे तो कलाकार चला तर मग जाणून घेऊयात…
–
- भारतीय चित्रपटसृष्टीतला एकमेव अभिनेता ज्याला उत्कृष्ट “अभिनेत्रीचा” पुरस्कार मिळाला!
- हॉलिवूडच्या ‘गॉडफादर’ला अभिनयाचे धडे गिरवायला लावणारा दिग्गज भारतीय अभिनेता
–
हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून रोहित शेट्टीच्या कंपूतला हुकमाचा एक्का असलेला अभिनेता म्हणजे संजय मिश्रा, संजय मिश्रा हा खऱ्या अर्थाने कलाकार आहे. त्याच्या विनोदी अभिनयाची बाजू तर आपण बघितली आहेच मात्र गंभीर भूमिका तितक्याच ताकदीने त्याने वठवल्या आहेत, पण त्याच्या ही आयुष्यात एक असा क्षण आला होता की सगळं सोडून तो एका ढाब्यावर काम करत होता.
झालं असं की ऑफिस ऑफिस या गाजलेल्या सिरीयलवर सिनेमा बनत होता. ज्यात संजय काम करत होता शूटिंग दरम्यान त्याच्या पोटात दुखू लागले म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर डॉक्टरांनी सांगितले की पोटात पल्स झाला आहे, ऑपरेशन करून तो पल्स बाहेर काढला, काही दिवसांनंतर तो बरा तर झाला मात्र त्याला आणखीन एक धक्का बसला तो म्हणजे त्याच्या वडिलांच्या निधनाचा.
वडिलांच्या निधनाचा संजयच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला, मुंबईला परत न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याने पोटापाण्यासाठी काहीतरी करावे लागेल म्हणून थेट ऋषिकेश गाठले. तिथे त्याने चक्क एक ढाब्यावर १५० रुपये रोजंदारीवर काम करण्यास सुरवात केली.
काही दिवसांनी ढाब्यावर येणाऱ्या लोकांनी संजयला ओळखण्यास सुरवात केली. आपल्याकडे काम करणारा हा माणूस गोलमाल सिनेमात केलेला कलाकार आहे, याचा थांगपत्ता मालकाला नव्हता. लोकांनी संजय सोबत फोटो काढायला सुरवात केल्यावर मालकच्या लक्षात आले आणि त्याने संजयची पूर्ण चौकशी केली आणि तेव्हा मालकाला समजले की हा सिनेमात काम करणारा कलाकार आहे.
आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती असतात जेव्हा कधी आपण निराश होतो, मनातून खचतो तेव्हा आशेचा किरण बनून येतात. दिग्दर्शक रोहित शेट्टीने संजयला मुंबईला पुन्हा बोलवून घेतले आणि कामही दिले, ऑल द बेस्ट या सिनेमात संजयने असे काही काम केले की प्रेक्षकांना हसवुनहसवुन बेजार केले. मात्र त्याच हसवणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याला मात्र दुःखाची किनार लागली होती.
–
- लावारीस ते अव्वल अभिनेता, वाचा अर्शद वारसीचा खडतर प्रवास!
- वयाच्या सत्तरीतही कित्येक नटांना लाजवणारा हा ‘फिट’ अभिनेता मागे का पडला? वाचा
–
सेटवर मज्जा मस्तीत सीन्स करणारा संजय व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन वडिलांच्या आठवणीत रडायचा, कलाकाराचं जीवन हे असच असतं एकदा का कलेला आपलं जीवन समर्पित केलं की आपलं आयुष्य आपलं राहत नाही, सुखदुःख बाजूल सारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हाच एकमेव ध्यास घ्यावा लागतो.
बॉलीवूडमध्ये यायच्या आधीही संजयचा प्रवास संघर्षमयी होता, एनएसडीसारख्या नावाजलेल्या संस्थेतून त्याने अभियानाची पदवी मिळवली होती. इरफान सारख्यादिग्गज कलाकारांसोबत त्याने काम केले आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.